Sunday 21 January 2018

कृत्रिम स्त्रीत्व को नकारता 
‘सिमोन दी बोहुआर’ का नारीवाद !




        वैश्विक परिपटल पर देवत्व तथा अमानवीयता के बीच फसे समुचे नारी समाज को पुरुषसत्तात्मक शोषण से सर्वथा मुक्त कर एक मानव कि भाती जीवन जिने कि बात रखने वाली महान विदुषी सिमोन दी बोहुआर का आज 9 जनवरी को जयंती दिवस है । स्वयं को सर्वप्रथम स्त्रीवादी घोषित कर समता के पक्ष का आग्रह रखने वाली सिमोन अपने संघर्षमय जीवन से आज भी हमे प्रेरणा देती है ।

         मूलतः, स्त्री – पुरुष दोनो ही समाज रथ के कथित दो मुल चक्र माने जाते है । मात्र, इसी वक्त सातत्य पूर्ण ढंग से व्यवस्था ने स्त्री अधिकारो को नकार कर उन्हे हजारो वर्षे सर्वांगीण दृष्टी से गुलाम रखने का प्रयास किया । तथापि यह गुलामी केवल वैचारिक क्रांती एवं समता के विचारो के मूलगामी उपयोजन के बिना कदापि ही संभव नही हो सकती । सर्वांगीण परिपेक्ष मे नारी मे तथाकथित स्त्रीयोचित गुण मूलतः कुटुंब व्यवस्था एवं समाज द्वारा ही समाहित कर दिये जाते है । कोई भी मानवी जीव अर्थात स्त्री, पुरुष अथवा अन्य सभी एक ही प्रकार से जन्म लेते है । अर्थात, सभी मे सभी समान क्षमताऐं, कांक्षाऐ एवं गुण होते है । सिमोन के यह विचार पुरुषसत्तावादी सत्ता एवं अधिसत्ता को ध्वस्त करते है । उनका विश्व विख्यात ‘स्त्री पैदा नही होती, बना दी जाती है’ यह वाक्य कृत्रिम स्त्री, पुरुष तथा अन्य लिंग भेदात्मकता को नकार कर एक मानव के संदर्भ मे सभी के समान अधिकारो का पक्ष लेता है ।

          वैश्विक स्त्रीवाद का ‘बायबल’ कहे जाने वाले फ्रेंच भाषा मे लिखित ‘द सेकंड सेक्स’ मे सिमोन ने व्यक्तिगत, सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, धार्मिक आदी परिपेक्ष मे स्त्री अधिकारवादी विचारधारा का मंडन कर नारी अस्तित्ववाद को प्रभावी तरीके से प्रस्तुत किया है ।

          सिमोन जीवनो पर्यंत स्त्री समता के पक्ष मे जनआंदोलन मे सहभागी रही जीस मे उन्हे थोर बुद्धिजीवी ज्यां पॉल सा‌र्त्र ने साथ दी । मुक्त और ढाचा रहित संबधो का यह अनोखा उदाहरण है । जो सिमोन और सा‌र्त्र ने जिया । आज जहा स्त्रीवाद मे सभी के प्रतिनिधित्व होने कि बात कही जाती है, निःसंशय इसका श्रेय सिमोन के तत्वज्ञानात्मक मंडन को जाता है ।

        आज दिनांक ९ जनवरी २०१८ को सिमोन के जन्म दिवस के अवसर पर विनम्र अभिवादन । लिंगभेद के अंत मे हम सब एक है ।

*****

पूर्व प्रकाशित - 
शुन्यकाल, दिनांक ९ जनवरी २०१८ 
http://shunyakal.com/feminism-of-simon-de-bohur-denies-artificial-femininity/ 

Monday 8 January 2018

शोषणाधिष्टीत वास्तविकता मे सम्यक समतावादी भूमिका 
 डॉ. सुनील अभिमान अवचार जी कि समकालिन भूमिका पर हृद अभिनन्द 






समकालीन शोषणाधिष्टीत सार्वत्रिक भयग्रस्त वास्तविकता मे प्रस्थापित साहित्यिक परिपेक्ष से अपनी सामाजिक भूमिका निर्वहन होना अत्यावश्यक है । मात्र, निजी तथा व्यवस्थात्मक हितबंधो मे लिप्त कथित विचारक, लेखक अनपेक्षित एवं आश्चर्यजनक चुप्पी साधे प्रतीत होते है । 

हाल ही मे जहा 'भीमा कोरेगाव' के रूप मे हुवा नृशंस तथा अमानुष हमला समुची संविधानिक मूल्य व्यवस्था एवं वैश्विक मानवता पर हमला है । वही, दिन ब दिन बढती अन्याय, अत्याचार, वंचना के बीच लेखक, कवी, विचारवंत बगैर किसी भूमिका के कैसे जी सकते है ? हा निःसंशय जी सकते है । अस्तू, व्यवस्था का वहन कर आत्मलाभात्मक हेतू इसका मूलाधार भी हो सकता है । 

मात्र, इसी व्यवस्था मे जहा यह वर्ग मौन है वही कुछ लेखक कवी विचारवंत इस व्यवस्था के सुधार तथा शोषण के प्रतिरोध कि पुरजोर बात रखते है । 

इसी कडी मे जागतिक कवी, विचारवंत, प्रा. डॉ.सुनील अभिमान अवचार इन्ही समतावादी भूमिका लेकर सकारात्मक परिवर्तन का आग्रह रखने वाले वैचारिक तबके कि और से प्रातिनिधिक भूमिका स्पष्ट करेंगे । समकालीन स्थिती कि चिकित्सा एवं परिवर्तन कि यह भूमिका निश्चित ही ऐतिहासिक सिद्ध होगी । सुनील जी का अभिनंदन । आभार ।

Saturday 6 January 2018

'जय भीम' : आमच्या स्वाभिमानाची घोषणा आहे...!
बाबू हरदास यांच्या जयंती निमित्त एक टिप्पणी 



 

     भारतीय उपेक्षित, वंचित, शोषित, दलित आणि एकंदरीतच पुरोगामी चळवळीचे प्रेरणापूंज तथा सार्वत्रिक सर्वांगीण सकारात्मक क्रांती आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेली 'जय भीम' ही घोषणा आमच्या अखंड स्फुर्तीचा झरा आहे. शोषणाधिष्टीत व्यवस्थेच्या विरोधात उभे ठाकत प्रतिरोधात्मकतेतून समतावादी सिद्धांतांच्या उपयोजनाचा आग्रह या घोषणेतून व्यक्त होतो. 

       आमच्या अस्मितेचा मानबिंदू असलेल्या 'जय भीम' या घोषणेचे जनकत्व जाते ते हरदास लक्ष्मणराव नगराळे उपाख्य बाबू एल. एन. हरदास (१९०४-१९३९) यांना. स्वातंत्र्यपूर्व भारतातील एक दलित पुढारी, कामगार नेते व समाजसुधारक असलेले बाबूजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या 'स्वतंत्र मजूर पक्षा'चे 'मध्य प्रांता'चे सामान्य सचिव होते. त्यांनीच सर्वप्रथम 'जय भीम' या शब्दाचा अभिवादानासाठी उपयोग करण्यास प्रारंभ केला. आज दिनांक ६ जानेवारी २०१७ रोजी बाबू हरदास यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...

Thursday 4 January 2018

विद्यार्थी नेत्यांना अटक 
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हत्येचा प्रयत्न आहे…!



“नियोजित आणि पूर्व परवानगी असतानाही विनाकारण ‘छात्रभारती’च्या आम्हा कार्यकत्यांना करण्यात आलेली ही अटक म्हणजे घटनात्मक मूल्यांची विटंबना असून प्रशासनाचे हे कृत्य लोकशाही विरोधी आहे. संविधानिक मार्गाने होत असलेले हे अधिवेशन हाणून पाडण्याचा सरकारचा हा डाव असून त्याचा निषेध करीत या पुढेही विवेकाचा आवाज नेहमीच बुलंद करण्याचा आमचा प्रयत्न असेल.”
सचिन बनसोडे
अध्यक्ष, छात्रभारती, मुंबई विभाग.





फाईल फोटो : छात्रभारतीचे राज्य कार्यकारी अध्यक्ष संदीप आखाडे यांची ची अटक 


‘छात्रभारती’ या राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी, युवक आणि शिक्षणाच्या प्रश्नावर काम करणाऱ्या संघटनेच्या ३५ व्या वर्षपूर्ती निमित्य काल आणि आज दोन दिवस ‘अखिल भारतीय विद्यार्थी संमेलन’ आणि अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनासाठी दोन महिन्यांपूर्वीच रीतसर शासकीय परवानगीही काढण्यात आली होती. मुळात संविधानिक तत्वांच्या अंमलबजावणीच्या सकारात्मक आग्रहासाठी काम करणाऱ्या ‘छात्रभारती’ संघटनेचे हे अधिवेशन म्हणजे समकालीन वास्तवाचे चिकित्सक करून त्यावर ठाम भूमिका घेत उपयोजनाच्या मार्गाची मीमांसा करणारे ठरणार होते. पूर्वनियोजित, पूर्वसूचित आणि पूर्वपरवानगी असलेले हे अधिवेशन म्हणजे कोणत्याही प्रकारची कथित ‘पब्लिक मिटिंग’ नसून ‘छात्रभारती’च्या देशभरातील कार्यकर्त्यांचे राष्ट्रीय वार्षीक अधिवेशन होते. त्यासाठी देशभरातील निवडक कार्यकर्त्यांची रीतसर नोंदणीही करण्यात आली होती. मुंबईच्या विले पार्ले परिसरातील ‘मिठीबाई महाविद्यालया’च्या ‘भाईदास सभागृहा’त आयोजित या अधिवेशनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवर आपले विचार विद्यार्थ्यांपुढे मांडणार होते. काल पासून सुरु झालेला हा अधिवेशन सोहळा अत्यंत शांततेने आणि संविधानिक पद्धतीने सुरु होता.

आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या सत्रांमध्ये देशभरातील काही युवा व छात्रनेते उपस्थित राहून विद्यार्थी कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका मांडणार होते.  त्यात गुजरात विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवानी, उमर खालिद, रिचा सिंग आदींची प्रमुख उपस्थिती असणार होती. अर्थातच हा कार्यक्रमही निमंत्रित विद्यार्थी कार्यकत्यांसाठीच होता. उपरोक्त म्हटल्या प्रमाणे या कार्यक्रमाची परवानगीही व्यवस्थेने आधीच दिली होती. मात्र, आज तथाकथित शांतता व सुव्यवस्थेचा हवाला देत पोलिस प्रशासनाने ‘छात्रभारती’च्या कार्यकर्त्यांना ऐन वेळी १४९ अंतर्गत नोटीस बजावत हा कार्यक्रम न घेण्याबाबत धमकावण्यात आले. मात्र, शांततेच्या मार्गाने आपला घटनात्मक अधिकार बजावणाऱ्या विद्यार्थ्यांना कार्यक्रम स्थळी पोहचताच दडपशाहीचा दंडुका वापरात पोलिसांनी संघटनेचे अध्यक्ष दत्ता ढगे, कार्यकारी अध्यक्ष संदीप आखाडे, छात्रभारतीच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष सचिन बनसोडे, मुंबई विभागाचे उपाध्यक्ष विशाल कदम यांच्यासह अन्य कार्यकत्यांना अटक केली. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून असलेले प्रदीप नरवाल व रिचा सिंग यांना देखील यावेळी अटक करण्यात आली. त्यानंतरही हे अटक सत्र न थांबता देशभरातून आलेल्या ३०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांचीही धरपकड करून सुरुवातीला ‘जुहू पोलीस स्टेशन’ व नंतर अन्यत्र हलवण्यात आले. त्याबद्दल पत्रकारांकडून पोलीस प्रशासनास विचारणा केली असता कोणत्याही प्रकारचे समाधान कारक उत्तर मिळू शकले नाही. 

खरे तर, पोलिसांना काही तणाव निर्माण होण्याची शक्यता दिसत असेल तर त्यांनी पोलिस संरक्षण द्यायला हवे होते. मात्र, असे न करता या बेकायदेशीर कारवाई मधून शोषणाधिष्ट व्यवस्थेचा छुपा अजेंडाच अमलात आणण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे दिसून येते. अशा प्रकारे कार्यकत्यांची ही अटक म्हणजे भारतीय संविधानिक मूल्यांवर हल्ला असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हत्येचा प्रयत्न असल्याचे मत अनेक विद्यार्थी, युवक व्यक्त करत आहेत.

**********


पूर्व प्रकाशित -

सदर लेख वजा वार्तांकन वृत्तांत दिनांक ४ जानेवारी २०१७ रोजी सुप्रसिद्ध 'ऍक्टिव्हिस्ट पोस्ट'वर प्रकाशित करण्यात आला. या लेखाची लिंक - https://marathi.activist-post.com/opinion-editorial/police-pickedstudents-sloganeeringcampaign/