Sunday 24 May 2020

JAFS and HDSI working on the principle of ‘payback to society’ in the midst of COVID-19




On the caste based hegemonic society of India, the architect of Indian constitution Dr. B. R. Ambedkar has given an inspirational principle with a sense of social responsibility to the people namely, ‘payback to society’. When marginalised or common people were feeling hopeless because of the structural and systemic failure of that time, responsible citizens and various social organisations should have taken responsibility for empowering the marginalised. In this worst situation, governmental institutions like hospitals and so called quarantine centers in rural India were in the negative circle of question. Now, the only hope for the marginalised community are responsible citizens and social organisations. Various social organisations are working on the problems of socio-economically backward castes/communities. Two organisations namely, ‘Human Development Society of India (HDSI)’ and ‘Japan Asian Social Society (JAFS)’ are working at the grassroots level in Vidarbha region of Maharashtra.


In a developing country like India not only the ‘COVID-19’ pandemic but also other socio-economic problems like inaccessibility to basic resources,  unemployment, livelihood and systemic discrimination against marginalised communities are important issues. For the holistic eradication of all these social problems we need to understand the model of sustainable social work which is performed by ‘Human Development society of India (HDSI) with the coalition of ‘Japan Asian Friendship Society (JAFS)’. Amidst the pandemic of ‘COVID-19’ the above-mentioned socio-economic issues have become the central problem. The social workers and volunteers of ‘HDSI’ and ‘JAFS’ are the only hope and are fearlessly doing their work for annihilating this structural hopelessness of the weaker sections.


Not only in India but also across the globe the number of patients contracted with ‘COVID-19’ are increasing. While writing this article there were more than 44,500 patients suffering from ‘COVID-19’’ in the state of Maharashtra. From this fear of pandemic common man is scared but the warriors of JAFS and HDSI are trying to do their best. They are providing all types of help and support to affected people of Amravati, Chandrapur and other parts of Vidarbha. The National lockdown was declared on 25th March 2020, since then JFSI and HDSI are providing ration and economical support to the affected people and other needy communities.


HDSI was founded in 2002 with the inspirational and hardworking leadership of  Mr. Pramod Thorat with other founder members of the organisation. All were desirous to work in the remote tribal areas of Melghat, Vidarbha of Maharashtra. Since the day of inception the vision, missions and goals were to achieve the aim of ‘Inclusive, comprehensive and sustainable development of the last man standing in the society. The organisation is doing very effective and fundamental work in the field of education, human rights, health, agriculture, livelihood, water and environment, upliftment of women and children, and social leadership development.


 As Dr. Ambedkar said education is the success key for social reform. HDSI has continued working on this issue till today. Today, more than 2,000 disadvantaged students have come into the mainstream of education through HDSI. More than 36, 967 civic communities in more than 45 villages of Amravati and Chandrapur districts have been part of the community development program. Through the medium of  ‘Environmental Development Program’ and ‘Green Scott Summer Camp’ more than 1000 environmentally and socially literate students, youth and citizens are tremendously working in the society. Under the ‘Livelihood Development Program’ of the organization more than 1200 women and their 124 self-help groups (SHG) were trained for self-reliance. Goat farming project was also helpful for local villagers and tribal communities. In view of the drought situation in Vidarbha, handpump facilities were provided to solve the drinking water problem. More than 26,000 citizens in 13 villages have benefitted from this project and through many other sustainable development programs. In today's situation of  ‘COVID-19’ HDSI is working and maintaining its legacy of commitment to the common man.


Founder director of HDSI Mr. Pramod Thorat has given the credit of his organisational social work to the Dr. Kimihiko Murakami (Founder Director of JAFS) and others. When I asked Mr. Thorat from where do you get inspiration for doing this work ? He smiled and said ‘payback to society’.    


Sunday 17 May 2020

‘कोविड १९’ च्या काळात या सेवाकार्यासाठी आम्ही आमचा जीव का धोक्यात घालत आहोत ? 
‘ह्युमन डेव्हेलपमेंट सोसायटी ऑफ इंडिया’ द्वारा जनतेस आवाहन   


भारतच नाही तर जगभरातल्या महासत्ता म्हणवल्या जाणारे देश सुद्धा आज ‘कोविड १९’ च्या जागतिक महामारी समोर हतबल झालेले दिसत असतांनाच ‘ह्युमन डेव्हेलपमेंट सोसायटी ऑफ इंडिया (एचडीएसआई)’ या आमच्या स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते-स्वयंसेवक सामाजिक मदत आणि सेवाकार्यास स्वतःचा जीव धोक्यात घालून पुढे येत आहेत. आजच्या या महामारीच्या काळात समाजाच्या सर्व स्तरातील शोषित-वंचित-गरीब-पीडित नागरिक दुर्दैवाने परिस्थिती समोर हवालदिल झालेले असतांनाच  ‘एचडीएसआई’ चे कार्यकर्ते अत्यंत कठीण परिस्थितीत या नागरिकांना राशन पुरवठ्या सोबतच आर्थिक आणि सर्व प्रकारच्या संभव मदतीसाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. आज ‘एचडीएसआई’चा सर्वसामान्य जनतेच्या हिताचा हा विचार अनेकांना प्रेरणादाई ठरणारा आहे. 


समाजातील आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास वर्गाच्या उन्नतीसाठी मा. प्रमोद थोरात यांच्या नेतृत्वात ‘ह्युमन डेव्हेलपमेंट सोसायटी ऑफ इंडिया - (SRA No. MH/81/2002 (CHD);  PTR Registration No. F-7666) ची स्थापना सन २००२ मध्ये करण्यात आली. ‘एचडीएसआई’ला सरकारद्वारा मान्यता प्राप्त असून समाजातील अंतिम माणसाच्या हितासाठी स्थानिक तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर नागरिक, समाज, स्वयंसेवी संस्था आणि सरकार या सर्व स्तरांवर संस्था कार्यरत आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या अंतिम माणसाच्या हितासाठी ‘सर्वसामावेशी तथा सर्वांगीण विकास कार्यक्रम’ राबवणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. याच धेय्याने प्रेरित होऊन आजवर ‘एचडीएसआई’ने शिक्षण, आरोग्य, कृषी, आजीविका, पाणी, पर्यावरण, मानवाधिकार, महिला व मुलांचे उत्थान आणि सामाजिक नेतृत्व विकास या व अशा अनेक क्षेत्रात अत्यंत प्रभावी व मूलभूत काम केले. 


आज ‘एचडीएसआई’च्या माध्यमातून २००० पेक्षा जास्त शिक्षणापासून वंचित असलेले विद्यार्थी शिक्षणाच्या मूळ प्रवाहात येत आहेत. अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ४५ पेक्षा जास्त गावांमध्ये ३६९६७ पेक्षा जास्त नागरिक समुदाय विकास कार्यक्रमाचा भाग झाले आहेत. पर्यावरण विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून आजवर ५ प्रशिक्षण कार्यक्रमांमधून २००, ‘ग्रीन स्कॉट समर कँप’ मधून ६०० पेक्षा जास्त पर्यावरण साक्षर विद्यार्थी, युवक तथा नागरिकांचे नेतृत्व निर्माण झाले आहे. संस्थेच्या आजीविका विकास कार्यक्रमा अंतर्गत महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी २३० बचत गटांना ‘गोट फार्मिंग’साठी पशु विरतरण तथा ५० पेक्षा जास्त ‘पोल्ट्री फार्मिंग’ उद्द्योगासाठी साहाय्य तसेच या चळवळीस प्रोत्साहन देण्यासाठी सुमारे १२०० पेक्षा जास्त महिला व त्यांच्या १२४ बचत गटांना प्रशिक्षित करण्यात आले. विदर्भातील दुष्काळ जन्य परिस्थिती बघता १३ गावांमधील २६००० पेक्षा जास्त नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हँडपंप सुविधा उपलब्ध करवून देण्यात आली. या व अशा अनेक शाश्वत विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून ‘एचडीएसआई’ कार्यरत असून आजच्या या अत्यंत आणीबाणीच्या काळातही सामान्य माणसाविषयीच्या बांधिलकीचा वारसा जपत आहे.


‘कोविड १९’ च्या महामारी च्या आजच्या या काळात ‘एचडीएसआई’चे कार्यकर्ते अहोरात्र काम करत आहेत. त्यामागची प्रेरणा निश्चितच ‘पे बॅक टू सोसायटी’ ही आहे. ज्या समाजाचा पण भाग आहोत त्याच्या हितासाठी झटणे हे ‘माणूस’ म्हणून आपले कर्तव्य मानून संस्थेचे संस्थापक, कार्यकर्ते आणि स्वयंसेवक कार्यरत आहेत. मात्र, आपण घेतलेला सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा खंडित होऊ नये म्हणून समाजातील सर्व स्तरातील नागरिकांस ‘एचडीएसआई’ आवाहन करू इच्छिते की जागतिक आणीबाणीच्या या काळात दुःखी कष्टी जनतेस यथाशक्ती सहकार्य करावे. यासाठी निश्चितच संस्था आपली ऋणी राहील.



मा. संचालकांच्या वतीने कुणाल रामटेके,

'हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ ऍडव्होकसी अँड रिसर्च',  

‘ह्युमन डेव्हलपमेंट सोसायटी ऑफ इंडिया (HDSI)’, 

गायस हाऊस, प्लॉट नंबर ८ - ९, मु. पो. धोतरखेडा, ता, अचलपूर, जिल्हा अमरावती, पिन कोड - ४४४८०६.

संपर्क क्रमांक - ९४२२१५२१३८, ८८०६०२४९३८. 

ईमेल - hdsi08@gmail.com ; वेबसाईट - www.hdsiindia.org.  

  


Sunday 3 May 2020



 माझी लॉकडाऊन डायरी 


बरेचदा रोजच्या ‘रुटीन’ला कंटाळून आपण सारेच कधी ना कधी तरी रविवारची वाट बघतच असतो. कधी एकदाची सुट्टी मिळते असं सुद्धा आपल्याला वाटत असतं. मग अशा वेळी कधी तरी - काही तरी खोटी - मोठी  कारणं आपल्यापैकी बऱ्याच जणांनी दिली असतील. पण 'सुट्टी' ही तेव्हाच चांगली वाटते जेव्हा ती मिळणं कठीण असतं आणि तरीही आपण ती हक्कानं मागून घेतो. 
आज ‘कोविड १९’च्या साथीत आपण सर्व जण घरी आहोत. घरातच राहून काम करणं म्हणा किंवा सक्तीची सुटी म्हणा पण सुरुवातीचा काळ सोडला तर आपल्या पैकी बऱ्याच लोकांना या वेळात काय करावं तेच समजत नव्हतं आणि समजलं तरी उमजत नव्हतं. माझी अवस्था सुद्धा काही वेगळी नव्हती. सुरुवातीला जेव्हा ‘लॉकडाऊन’ जाहीर झालं त्याचवेळी वाटलं होतं की, "काय आठ - दहा दिवस तर आहेत ! जातील आरामात निघून..." पण पुढं - पुढं मात्र 'टेन्शन' वाढायला लागलं. त्याचं कारण म्हणजे जगभरात कोरोना काय थैमान घालतोय, आपल्याकडे काय होतय त्याच-त्या बातम्या आणि तोच-तो टिव्ही बघून बघून डोक्यात येणारे 'निगेटिव्ह' विचार.       
मग एक दिवस ठरवलं. म्हटलं खूप झालं आता. किती दिवस असेच आणि उगाच टेन्शन मध्ये काढणार. या वेळेचा चांगला उपयोग करून घेतला पाहिजे. मग काय करणार ? 
वाचायची 'बोम्ब' असली तरी माझ्याकडे भरपूर पुस्तकं घेऊन ठेवलेली असतात त्यातली निवडक बाहेर काढली. पण कोणत्याही पुस्तकाची १० - १५ पानं जरी वाचली तरी मन लागत नव्हतं. मग विचार केला, "अरे, 'यु-ट्यूब' आहे की..." नुसताच 'टाईम पास' न करता भरपूर विषयावरची सामग्री यावर आहे. फक्त आपल्याला त्याचा उपयोग करून घेता आला पाहिजे. 
मग कुठे तरी व्हिडीओज बघत असतांना पुन्हा एकदा लक्षात आलं की आज जशी 'लॉकडाऊन'ची स्थिती आहे. तसच आधीही बऱ्याचदा होऊन गेलय जगात. मग त्यात प्लेग ची साथ असेल किंवा जगाला घाबरवून सोडणाऱ्या इतर रोगांच्या साथी किंवा युद्धं. माणसावर अनेक संकटं येत असतात. त्या प्रत्येक संकटातून माणुस सतत काहींना काही शिकत असतो. त्यातून नवा धडा घेत असतो. संकटं येतात जातात पण त्यावेळी असलेलं माणसाचं वागणं मात्र इतिहासाचा भाग बनून जातो. आज ‘कोविड १९’ च्या या काळाचा उल्लेखही पुढे इतिहास म्हणून केला जाईल. लोक पुढं विचारतील, “त्यावेळी तुम्ही कसं काय मॅनेज केलत ? तुम्ही काय करत होतात तेव्हा ?” पुण्यात नाही का, १८९६-९७ च्या काळात प्लेगच्या वेळी सावित्री बाई स्वतः पुढं धावून समाजकार्य करत्या झाल्या. आजची परिस्थिती जरी वेगळी असली तरी घरात राहूनही खूप काही करता येणं शक्य आहे. ही जाणीव झाली. आणि उगाच व्हिडियो बघत पेंगत बसण्यापेक्षा ‘ऑनलाईन’ कामाला सुरुवात झाली. त्यात परराज्यात अडकलेले मजूर, विद्यार्थी यांचे प्रश्न असोत किंवा आजच्या या महामारीच्या काळात निर्माण होणारे इतर विषय असोत, त्यावर इतर मित्रांच्या सोबतीनं माझ्या परीनं काम करण्याचा प्रयत्न चाललाय. 
ऑनलाईन काम सुरु तर झालं पण यामुळं निर्माण झालेले सामाजिक प्रश्न बघून मन खूपच नकारात्मक होतं. कधी तरी आपणही आजारी-बिजारी तर पडलो नाही ना ? असही उगाचच वाटून जातं. ‘सायकोसमॅटिक’ मॅटर म्हणा याला हवं तर. पण गेल्या अनेक दिवसत घरात एकटा असूनही एकदाही मी ‘बोअर’ झालो नाही. याची कारणं स्वतःला नेहमी कशात तरी गुंतवून ठेवण्याच्या माझ्या सवयीत कदाचित असतील. 
कधी कधी उगाच‘टाईम पास’ होत असेल तर वेळ निघून गेल्यावर वाईट वाटतं आणि कधी स्वतःला वेळ देणं सुद्धा किती महत्वाचं आहे हे सुद्धा पटतं. मग यातून बुद्धाचा मध्यम मार्ग काढत पुढं जाणं गरजेचं होऊन जातं. खरंच आहे, आलेला दिवस नक्कीच मावळणार असतो आणि रात्र संपून सूर्य उजळणार असतो. आपण प्रतीक्षा करत राहू…           

(आकाशवाणी मुंबई'साठी)