Monday 20 October 2014

विधानसभेची लोकशाही                                                                                                                             

         विधानसभेची लोकशाही  

                                                                                                                                             

भारतीय लोकशाही व्यवस्था एक आदर्श  म्हणून जागतिक मानस पटलावर आपले गौरवपूर्ण स्थान प्रदीर्घ  वाटचाली नंतर प्रस्थापित करण्यात यशस्वी ठराली आहे.सातंत्र्या नंतरचा कालखंड हा भारतीयांनी मोठ्या श्रमाने आपल्या राष्ट्रस्या पुनर्निर्माणाच्या प्रक्रियेत घालविला भारताचे भविष्य  मात्र याच लोकशाही परम्परसंचे फलित होय.कोणत्याही लोकशाही व्यवस्थे मधे निवडणुका या एखाद्या महोत्सवासारख्या असतात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांनी तर  जगाला आश्चर्य चकित करुन सोडले आहे. भारताच्या या व्यवसतेचे सरे श्रेय मात्र आपणास  द्यावे लागेल ते मात्र भारताच्या संविधानाला.भारताचे संविधान म्हणजे भारतीय अस्मितेचा जागतिक जहीरनामच होय.भारताचे अस्तित्व समस्थ नागरिकांची जबाबदारी आहे.लोकशाहीची मूळ संकल्पनाहीच मूळी लोक सहभागातून झालेले सत्तेचे विकेंद्रीकरण अशी आहे. लोकशाही ची निर्भत्सना अरस्तूने अद्धपतित शासनपद्धती म्हणून केली मात्र डॉ. बाबासाहेब आम्बेडकरनी जी व्याख्या स्वीकारली ती अब्राहम लिंकन यांची जगप्रसिद्ध व्याख्या होती,'' लोकांनी लोकांसाठी लोकिांकडून चलवालेवली शासन प्रणाली म्हणजे लोकशाही.''
महाराष्ट्र विधानसभा 

         नुकत्याच महाराष्ट्र राज्यात पार पडलेल्या विधान सभा निवडणूक २०१४ या सत्तांतरस कारणीभूत ठरल्या असून कांग्रेस सरकार जउन भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर चललेला मोदी फ्याक्टर या विधान सभा निआवडणुकीत चालेल तो किती याछे विश्लेषण करण्याचा प्रयत्न विचारवंत करीत असतांनाच या निवडणूक निकलांनी मात्र मोदींच्या जादू विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असल्याचे मत विरोधकांनी व्यक्त केले आहे.प्रस्तुत सरकारच्या घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर जनमताचा हा कौल निच्छितच बदलस कारणीभूत असल तरीही सकारात्मक सत्तांतर हे आहेका हे मात्र येणारा काळच ठरवेल.भारतामध्ये असलेली लोकशाही प्रक्रिया आज साऱ्या जगाचे लक्ष्य वेधून घेत आहे.निवडणुकांमधे होणारा भरष्टाचार मात्र या लोकशाहीचे धिंडवडे काढतो आहे.सत्ता स्थापनेच्या संदर्भात सुरु होणारा घोड़ेबाजार तर 'आमबात' आहे.युती आणि आघाडीची तुटलेली गणित आता काय रूप धारण करतात ते तर विचारायलाच नको.पक्षांमधे सुरु जलेली आया राम गया राम यांची जंत्री नुकतीच थंडावली असतांनाच आता पुढे काय ? हा प्रश्न महाराष्ट्रीय जनता व्यक्त करात आहे.जातिवाद,धर्मवाद,भाषावादी राजकारणस येथे कोणीही वाली नहीं हा कल जनतेने दिल आहे.मात्र सम्प्रदायवादाचा न ओसरलेला ज्वर चिंतेचे कारण ठरावा.विकास हाच महत्वाचा मुद्दा असून सत्ताधारी सरकारने हेच आपले धेय ठरवावे.

Sunday 19 October 2014

बारीपाडयाची गोष्ट… 

                    बारीपाडयाची गोष्ट… 



    
मा.चैतराम पवार 
 भारत म्हणजे खेड्यांचा देश. हे नेहमीच वाचत आणि ऐकत आलेलं घोटीव वाक्य,पण त्याच खेड्यात वास्तव भरतच दर्शन घडत असतांनाही विकासाच्या मार्गापासून कोसो दूर असलेला ग्रामीण भारत म्हणजे अभावाचे मूर्तिमंत प्रतीकच होय. गाव म्हटलं की आठवत ती म्हणजे गावाचे गचाळ रस्ते,गोदार्या,अपुर्या आरोग्य सुविधा,सांडपाणी आणि चिखल.जसा रस्त्यावर तसाच माणसांच्या आयुष्याचाही. म.गांधी म्हणाले होते की,"तुम्हाला जर तुमच्या देशाचा विकास करायचा असेल तर आधी खेड्यांचा विचार करावा लागेल."स्वातंत्र्या नंतर मात्र राजकीय पोळी भाजाण्याच्याच प्रयत्नात असणार्या राजकारण्यांनी गावाच्या समस्यांचा वापर स्वार्थासाठी करून घेतला.गावाच्या सेवेसाठी सर्वस्व अर्पण करणारे निस्वार्थी कार्यकर्ते मात्र विरळाच निर्माण होत राहिली.महापुरुषांचा संदेश सांगणारे पुष्कळ असतात मात्र उपयोजन करणारे महाभाग काही औरच. अश्याच कर्मयोग्यांच्या परंपरेत आजच्या काळात एक नाव आदरानं घ्यावं लागेल ते म्हणजे चैतराम पवार यांचे. बारीपाडा,तालुका सक्री,जिल्हा धुळे या जिल्ह्याच्या  नकाशावरही धड दिसू न शकणार्या गावाने चैतारामजींच्या नेतृत्वात एक नवा मैलाचा दगड रचला आणि देशाच्या विकासात आपल्या गावाचे महत्व उद्घृत केले.
सामुहिक श्रमदान 
                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                            एका सर्वसामान्य गावासारखाच असणार शंभर टक्के आदिवासी असणाऱ्या पाचशे लोकसंखेच छोटस गाव बारीपाडा. समस्यांनी घेरलेल्या गावात माणसे तर होती,पण प्राण मात्र हरवला होत.विहिरी तर विहिरीत्र होत्या पण जीवन मात्र हरवलं होत. होता तो केवळ अभाव आणि अंधश्रद्धा. आपण आपल्या गाव साठी काही करायचं हा भाव होताच तिथल्या तरुणानामध्ये दिशा मात्र मिळत नव्हती.आशा होती पण मार्ग नव्हता.अश्याच तरुणांपैकीच एक चैतराम पवार.गावातील पहिले पदव्युत्तर शिक्षण M.Com मधून पूर्ण केल्या नंतर घर-दार,नोकरी,पैसा,पत्नी आणि कुटुंब या चक्रव्युहात न अडकता आपला  गाव हाच आपला मार्ग हा विचार करून कार्याला लागण्याचा संकल्प करण्याचा निर्धार करणारा तरुण.स्वतः एका गरीब कुटुंबातून येऊनही 'अहं' पेक्षा 'वयं' चा हा विचार त्या काळात त्यांच्या प्रबुद्ध मानसिकतेची साक्ष देतो.आपल्या गावासाठी काही करता येईल का ? या प्रश्नाने चैतारामजींच्या मनात हलकल्लोळ निर्माण केला होता.करायचं पण नेमकं काय?हा प्रश्न 'आ' वासून उभा रहिला.'गाव करी ते राव न करी' अशी एक म्हण आपल्या कडे प्रसिद्ध आहे. म्हणूनच गावातल्या समस्यांच्या निर्मुलनासाठी एका माणसाच्या प्रयत्ना पेक्षा रचनात्मक कार्यासाठी संघटन बांधणी गरजेची ठरली. गावात जुगाराचा प्रश्न मोठा त्यातूनच परगावातून जुगारासाठी येणाऱ्या लोकांशी झालेल्या संघर्षातून हे संघटन निर्माण करणं आणि दृढ करणं शक्य झालं. सूरुवातीला गावातल्या चार दोन तरुणांना संघटीत करून चैतारामजींनी आपला मोर्चा संपूर्ण ग्रामसभेकडे वळवण्याचा निर्णय केला.विरोध आणि अंतर संघर्षातून निर्माण झालेला कलह भविष्यात मात्र खरेच एक नाव सृजन ठरेल याचा थांग मात्र त्या काळात त्या भोळ्या जीवांना काही लागला नसेल.परंतु व्यक्ती विकासाची सुरु झालेली ही चळवळ आता व्यक्ती व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचा ध्यासच जणू चैतारामजींच्या अंतःकरणाने घेतला होता.या कामात  डॉ.आनद फाटक यांची लाभलेली साथ आणि प्रेरणा मोलाची ठरली.चैतारामजींच्या कार्याला या व अश्या प्रकारे झालेली सुरुवात बदलांची नांदी ठरली. मा.अण्णा हजारे यांच आदर्श गाव राळेगण सिद्धी बघण्याचा योगही याच काळात चैतरामजींना आला.अण्णांच्या ग्राम परिवर्तनाची प्रेरणा त्यांनी आपल्या गावात ओतली आणि सकारात्मक बदलांची प्रक्रियाच या नंतर जणू सुचारू झाली . 
       शेती हा ग्रामीण अर्थ व्यवास्थेचा कणा.म्हणून शेतीच्या सुधारणांची गरज भासू लागली.सिंचन सुधारनांच्या अभावा मुळे कोरडवाहू शेतीचे रुपांतर बागायती शेती मध्ये करणे भाग होते. त्या साठी शेत तळे आणि बंधारे यांची बांधणी लोक सहभागातून करण्याचा प्रस्थाव गावकर्यांनी सर्वानुमते ग्रामासाभेमध्ये पारित केला.श्रमदानाच्या कृती कार्यक्रमातून काम होणार होते.मात्र या श्रमदानात सहभागी न होणार्यांसाठीही गावाने तरतूद  करून ५० रुपये दंड आकारण्याची योजना केली.हात कामाला लागले.वाहते पाणी अडवल्या गेले.जमिनीतील पाण्याची पातळी वाढली.विहिरी तुडुंब भरू लागल्या.याच श्रमदानाचा परिणाम म्हणून एके काळी केवळ  ११ असलेली विहिरींची संख्या आता ४० वर जाऊन पोहचली.निश्चितच हे श्रेय गरीब सध्या भोळ्या आदिवसिंच्या कष्टांना आणि चैतरामजींच्या प्रयत्नास आहे.या कार्यास पाहून शेती विकासासाठी अनेक अभ्यासाक मंडळी पुढे आली.त्यातूनच या मार्गदर्शनच उपयोजन डोळ्यात भारणार्या पिकांमध्ये होऊ लागलं.ज्वारी,बाजरी,तूर,मुग,सोबतच अनेक प्रकारची कडधान्य तसेच उस,कांदा बटाटा,लसून या नगदी पिकांच्या उत्पादनातून कास्ताकारांची मने आनंदाने भरून गेली. हल्ली तर गावात स्टोबेरीची होत असलेली निर्मिती हा कौतुकाचा विषय ठरला आहे.गावाने निर्माण केलेला इंद्रायणी तांदूळ एक ब्रांड म्हणून पुढे आला असून जे गाव आन्ना - पाण्या साठी इतरांवर अवलंबून होते तेच गाव आज पुरवठादार झाले आहे.

     अर्थ संपन्नतेसोबतच शिक्षणाच्या सुधारणांसाठीही प्रयत्न करणे गरजेच होते.शाळा हा गावाचा आत्मा,म्हणून शाळेला जाणं प्रत्येक विद्यार्थ्याला सक्तीच करण्यात आलं. वेळेवर न येणाऱ्या गुरुजिंसाठीही दंडाची कार्यवाही करण्याचा निर्णय गावाने घेतला. दंड मात्र वेळेवरच घेतल्या जाण्याची सोयही गावाने केली.रस्त्यावर फिरणाऱ्या मुलांनी या मुळे धरलेली शिक्षणाची वाट प्रौढ शिक्षणासाठीही तेवढीच प्रेरक ठरली आहे.गावातील सुधारणांसाठी लोकांचा मिळालेला सकारात्मक सहभाग हा नव्या बदलास कारणीभूत ठरला.पाण्याचे निर्जंतुकीकरण,मुलांचे लसीकरण, घर तेथे सौचालाय, वृक्षारोपण, स्वच्छता अश्या विधायक कार्याच्या माध्यमातून बारीपाड्याने कात टाकायला सुरुवात केली. ज्या बाबी शहरात दुर्मिळ ठराव्यात त्या खेड्यात घडवण्याचा चमत्कार या गावकर्यांनी प्रत्यक्षात उतरवला.त्यात कुटुंब नियोजनासाठी स्वतः पुरुषांनी घेतलेला पुढाकार म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राच्या वैचारीक भूमोकेचे यथार्त प्रतिबिंबच म्हणावे लागेल.आज सुमारे ९०% पुरुष नसबंदी झाली असून कुटुंब नियोजन क्षेत्रातील एक नवा विक्रमाच गावाने केला आहे.
चैतराम पवार : एक संबोधन 

       गावाच्या प्रगतीत जसा वाटा पुरुषांचा तसाच महिलांचाही.मात्र नैसर्गिक संकोच्याच्या भावनेतून स्त्रियांना वाटच जणू मिळत नव्हती.म्हणूनच चैतरामजींनी क्यानडाहून पी.एच. डी.च्या संशोधना साठी आलेल्या एका विद्यार्थ्याच्या सल्ल्या वरून खास महिलांसाठी 'वन भाजी स्पर्धा' आयोजित करण्याचा निर्णय घेतला.यात महिलांचा आढळून आलेला लक्षणीय सहभाग १००० प्रकारच्या वनस्पती पासून ७०० प्रकारच्या औषधी वन भाज्यांच्या शोधास कारणीभूत ठरला.आज या अनोख्या स्पर्धेची दाखल देशभरातील माध्यमांनी घेतली असून महिलांच्या कमगिरीचे कौतुक अनेक मानाच्या पुरस्कारांनी करण्यात आले आहे.जर तुम्हाला झाडे लावायची नसतील तर किमान तोडू तरी नका,हा साधा विचार घेऊन आदिवासीबांधावांचा प्राण असलेल्या जंगलांकडे लक्ष देणेही गरजेचेच होते.बरीपाडयाचा जंगलच मुळी समृद्ध.मात्र गरज होती ती या वनांच्या संरक्षणाची.त्या साठी एक ठोस कृती समिती गावातील जेष्ठ मंडळींच्या नेतृत्वात आणि तरुणांच्या पुढाकाराने स्थापणकरण्यात येउनमहत्वाचे पूल उचलण्यात आले.बारीपाड्याच्या जंगलात आज गावाच्या सामुहिक सहभागातून ३४५ प्रकारचे वृक्ष,४८ प्रकारचे पक्षी,१० प्रकारचे प्राणी संरक्षित केल्या गेले तसेच ११०० हेक्टर जंगल क्षेत्रही सुरक्षित केले गेले.१९९१ मधेच या कार्याची मुहूर्तमेढ रोवल्या गेली होती ती 'कुऱ्हाड बंदी' करून त्याची मधुर फळे आज चाखायला मिळत आहेत.

        बारीपाडा आणि चैतरामाजींच्या या सार्या कार्याची दखल आज आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही घेतल्या जात असून त्यात त्यांना मिळालेला 'आंतरराष्ट्रीय जैवविविधता पुरस्कार','इंटर न्याशनल फंड फोर अग्रिकल्चर डेवलपमेंट'रोम,इटली चा पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याची पावतीच होय.महाराष्ट्र शासनानेही 'शेतीनिष्ठ पुरस्कार' चैतारामजिंना सन्मानाने प्रदान केला.या व अश्या किती तरी देश विदेशातील सन्मानांचे मानकरी ठरलेले चैतराम पवार हे व्यक्तिमत्व म्हणजे बारीपाड्याच्या विकासाचे महान शिल्पकार होत.व्यक्तिगत साधेपणा आणि कार्याची समर्पितता या गुणांमुळे ते आपल्या हृदयात आदराचे स्थान निर्माण करतात.
आबासाहेब गरवारे महाविद्यालय पुणे च्या वतीने घेण्यात आलेला हृद सत्कार 

        नुकत्याच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने चैतरामजींच्या भेटीचा योग पुण्यात आला.त्यांच्याशी बोलतांना जाणवलेला एक निस्सीम माणूस मनात घर करून गेला आहे.त्या वेळी मी त्यांना म्हणालो होतो,''सर,ज्या काळात आमच्या पिढीचा जन्म झाला,त्या काळात आपण कामाची सुरुवात केली आपण  स्वतः उच्च शिक्षित आहात मात्र तरीही मोठ्या पगरची नौकरी न करता आपण ग्रामसेवेस प्राधान्य दिले,पण आजचा युवक ग्रामीण भागात काम करण्यास उत्सुक दिसत नाही्. हे अपयश नेमकं कुणाचं? आमच्या मानासिकतेचं की  शिक्षण व्यवस्थेचं?''त्या वेळी त्यांनी दिलेलं उत्तर मोठ मार्मिक होत,ते म्हणाले होते की,''शिक्षित युवक शहरात जातो,पैसा कमवतो यात वाईट काही नाही पण आपण ज्या समाजात जन्मास आलो त्या समाजाच्या प्रगती साठी प्रयत्न करणं ही त्याच युवाकांची जबाबदारी असते.'' याच वेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असलेले जेष्ठ पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ उभे राहिले या समस्येची आर्थीक कारणेही आमच्या समोर मांडली. समस्या आज कोणतीही असो त्यावर उपाययोजना करता येणे गरजेचे आहे. त्या साठी  मात्र गरज आहे मानसिकता आणि प्रयत्नांची. हाच आदर्श आपल्या जगण्यातून चैतारामजींनी घालून दिला आहे.                                                    खरच बारीपाडा हे चैतरामजींच्या परिश्रमांचे फलीत आहे.बारीपाड्याच्या प्रगतीची ही गोष्ट आशीच पुढेही सुरूच राहिल,जोवर गावातल्या प्रत्येकात चैतराम आणि प्रत्येक गावाचं बारीपाडा होत नाही.                                                                                                        

#chaitrampawar #baripada  

Saturday 4 October 2014

सुशिक्षित उमेदवाराची महाराष्ट्राला गरज 

                 सुशिक्षित उमेदवाराची महाराष्ट्राला गरज                                                                                                                                                          

             असं म्हणतात की,"सत्ते पुढे शहाणपण चालत नाही",पण जर शहाण्या लोकांच्या हातामध्ये सत्ता गेली तर भविष्य काही वेगळच असेल. नुकत्याच झालेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकी नंतर आत्ता शंखनाद झाला आहे तो महाराष्ट्र विधान सभा निवडनुकीचा. लोकशाही व्यवस्थे मध्ये निवडणुका या महोत्सवा सारख्या असत. या उत्सवाला मात्र गाल बोट लागू नये म्हणून आपल्या उमेदवाराने आणि आपण सगळ्यानीच प्रयत्न करायला हव. लाच देऊन मिळवलेली गठ्ठा मते आणि त्या मतांच्या बळावर निवडून आल्या नंतर स्वार्थासाठी त्याच रयतेला वेठीस धरत भ्रष्टाचार करून रग्गड पैसा मिळवायाचा हीच मानसिकता असणार्यांची काही कमी नसत्तानाच हे दृष्ट चक्र थांबवण्याची मात्र गरज आजच्या पिढीला भासते आहे. आमचा विधायक कसा असावा यावर आपण केलेला विचार अमलात आणण्याची हीच खरी वेळ आहे. निवडणुकीतील भ्रष्टाचार थांबून स्वच्च वातावरणात व्यक्तिगत हेव्यादाव्यांच्या पलीकडे जाऊन उमेदवाराने निवडणुकीस सिद्ध होत विकासाचे राजकारण करावे हीच आम आदमीची अभिलाषा आहे.स्वातंत्र्याच्या प्रदीर्घ कला नंतरही सातत्याने जाणवणारा लोक शिक्षणाचा अभाव आज गंभीर समस्या बनला असतांनाच सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन प्रामाणिक,सच्च्या कार्यकर्ता, ध्येय्य्वादी व कर्तव्यनिष्ठ अश्या सुशिक्षित उमेदवाराची गरज महाराष्ट्रास आहे.आपल्या समस्या आपलीं कमजोरी नाहीत तर प्रेरणा व्हाव्यात या साठी नेता हवा आहे सकारात्मक दृष्टिकोनाचा.शिक्षणाचे बाजारीकरण आणि बेरोजगारी ची भीषण समस्या आज असतांनाच नव्या धोरणांच्या आखानिचीही आज गरज भासते आहे. विकास पासून दूर असलेल्या रियल आम आदमीस विकासाच्या मुख्य धारेत जोडत आपण सारे एक या भावनेतून काम कारणरा उमेदवार असावा हीच मनो कामना व्यक्त करूयात.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                      

   दैनिक पुण्यनगरी (दि. २६ सप्टे.२०१४-आपलं व्यासपीठ या सदरात प्रसिद्ध)                                                                                    

                                         

Thursday 2 October 2014

युवा प्रेरक सुब्बाराव 

                                        युवा प्रेरक सुब्बाराव 



आदरणीय सुब्बरावाजी

     भारत महासत्तेच्या महामार्गाने प्रस्थान करण्याच्या संकल्पार्थ कटिबद्ध आहे तेथेच भावी भारताच्या नव निर्माणासाठी युवकांमध्ये प्रेरणा निर्मितीचा प्रयत्न करणारे डॉ.एस.एन.सुब्बाराव यांचे कार्य ही त्याच मार्गावर दीपस्तंभ ठरणारे आहे. युवक हाच राष्ट्र निर्माता आणि याच युवकांच्या सक्षम खांद्यावरच महासत्तेची धुरा असल्याचा विचार बरेचदा बोलून दाखवला जातो. मात्र जेव्हा राष्ट्र उभारणी साठी युवकांचे निर्माण या ध्येयाने प्रेरित होऊन सुब्बरावांसारखी एखादी हस्ती कार्य हाती घेते,तेव्हा या कार्याला प्राप्त होणारे चीरंतनाचे मुल्य भावी पिढीला मार्गदर्शन करणारे ठरते.                                                                                                डॉ.एस.एन.सुब्बाराव यांचा परिचय करून देण्याची मुळातच गरज नाही. य़ुवकांचे प्रेरणास्थान असणाऱ्या सुब्बारावजी यांना भाईजी म्हणून होणारे उस्फुर्त संबोधन म्हणजे  त्यांचे आपल्या प्रतीचे नाते उद्घृत करण्यास समर्थ नाहे. आपल्या सुसंस्कृत,सध्या व्यक्तित्वाच्या बळावर चक्क चंबळ च्या डाकूनाही अहिंसात्मक मार्गाची वाट धरायला लावणारा हा ८५ वर्षांचा युवा नेता युवकानाही मोहिनी घालतो आपल्या व्यक्तित्वाची, विचारांची .समाजातील सज्जन शक्ती जेव्हा विपरीत काळातही शांत बसते तेव्हा घडून येणारी हानी ही दुर्जनांच्या वितंडा पेक्षाही भयावह असते.याच विचारातून सुब्बरावांचे कार्य आज सक्षम व रचनात्मक कार्यासाठी विधायक मार्गाचा वापर करून लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निर्माणासाठी होत आहे.भाईजींचा जन्म मुळात कर्नाटक मधील ब्यांगलोर मधला,त्यांचे पूर्वज तमिळनाडूतील सालेम या गावातील म्हणूनच ७ फ़ेब्रु.१९२९मध्ये जन्मलेले सुब्बाराव यांचे नाव ठेवण्यात आले सालेम नान्जूदेय्या सुब्बाराव आपल्या कुटुंबातील संस्कार,तत्कालीन सामाजिक वातावरण,पेटलेले स्वातंत्र्याचे रणशिंग, महापुरुषांचा समाज मनावरील प्रभाव,माध्यमांची ठोस भूमिका आदी सर्वांचा परिणाम सुब्बाराव यांच्या बाल मनावर झाला असावा. त्यातूनच साकार झाले ते देशासाठी चळवळ कर्त्या सुब्बरावांचे क्रांतिकारक व्यक्तिमत्व.वयाच्या १० व्या वर्षी स्वतःच्या शाळेत जुलमी ब्रिटीश राजवटीच्या विरोधात केलेल्या बाल संघटने पासून ते १३व्या वर्षी भारत छोडो आंदोलनाला साथ देत शाळेतून निघून जाऊन गांधींच्या ब्रिटीश शिक्षण व्यवस्थेला त्यागण्याच्या आव्हानाला ओ देत केलेले पलायन त्यातच निदर्शनांमुळे झालेली अटक हाच मुळात रोमांचित करणारा अद्भुत कालखंड वाटतो.ज्या वयात आपण गोटया खेळलो त्याचा काळात सुब्बाराव देशासाठी जेलावाऱ्या करीत होते हेही एक नवलच म्हणावे लागेल.   

           त्या नंतरच्या काळातही सुब्बाराव यांनी आपले कार्य जोमाने सुरुच ठेवत गांधीवादाचे उपयोजन राष्ट्रीय समस्यांच्या निर्मुलनार्थ करण्याचे प्रयत्न केले.  अर्थात कोणतही विचार काळाचे अपत्य ठरावा.सुब्बाराव यांनी आपला वेध हा मुळात युवा निर्माण ते राष्ट्र विकास याच दिशेने ठेवला.सुरुवातीच्या काळात गांधी साहित्य संघाच्या छायेखाली आयोजीत कृती कार्यक्रम आणि राष्ट्रसेवा दल व विद्यार्थी कॉंग्रेस मधील सेवेने केलेला प्रारंभ नव्या कार्याचा पाया ठरावा. भारत स्वातंत्र्या नंतर मात्र जे स्वप्न आपली नेत्यांनी बघितले ते पूर्णत्वास गेले नाही ते दुदैव, मात्र या समस्या ग्रस्त भारता साठी यत्न करणे ही  गरजेचे होते ते आपल्या राष्ट्रीय युवा योजना या युवाचा चळवळीच्या माध्यमातून केले. युवकांचे सकारात्मक विधायक कार्यासाठी संघटन करीत देशाच्या कानाकोपऱ्यात आयोजित शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी अंतर भारतीय राष्ट्रीय एकात्म युवकांची नवी पिढीच निर्माण केली.  

    स्वातंत्र्यानंतर राजकीय लोकशाही भरतात अवतरली मात्र सामाजिक-आर्थिक लोकशाही पासून आजूनही दूर असलेला देश  विषमतेच्या  खाईतच उभा आहे. त्या दृष्टी ने यत्न करतांनाच सुब्बारावांचे लक्ष्य गुन्हेगार समजल्या गेलेल्या चंबळच्या प्रदेशाकडे वेधले गेले त्यातही गुन्हेगारीचा पेहेराव पांघरलेल्या माणसाने त्यांना आकृष्ट केले मदहो सिंग सिंग आणि उधम सिंग सारख्या १०० डाकुंना त्यांनी आत्मसमर्पण करवत राष्ट्राच्या मुख्य धारेत समाविष्ट केले. १९५४ मधील ही घटना आजही आपल्या साठी तेवढीच प्रेराणास्पद आहे. उपरोक्त तथाकथित गुन्हेगारांना त्यांनी मध्यप्रदेशातील गांधी सेवा आश्रमात आश्रय दिला आणि श्रमदान करीत आपले जीवन जगणारी आदर्श माणसे घडविण्याचा प्रयोग करत अनोखे उदाहरण समाजासमोर प्रस्थापित केले. १९७२ मध्ये ६५४ चंबळ खोऱ्यातील डाकू तर १९७४ मध्ये राजस्तानातील १२३ डाकुनीही सुब्बाराव यांच्या मार्गाचा अवलंब केला.

 

    

सुब्बारावजींनी आपले विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्या साठी त्यांनी अनेक पुस्तकांचेही लेखन केले.अपना सुख बिसार ज्या हे अलीकडील पुस्तक त्यांच्या महान कार्याची कहाणीच आहे.सुब्बाराव यांनी छोट्या खेड्यांपासून ते देश विदेशातील प्रवासाने युवकांना प्रेरित केले.अनेक नामांकित पुरस्कार प्राप्त सुब्बाराव मात्र या प्रवासातही फळांनी वाकलेल्या वृक्षांप्रमाणे नम्रच राहिलेत.१९९५ चा राष्ट्रीय युवा पुरस्कार भारत सरकार ने त्यांना प्रदान करून युवकांप्रती त्यांनी केलेल्या कार्यांची कृतज्ञताच जणू व्यक्त केली. १९९७  मध्ये त्यांना मानद डी.लिट ने सन्मानित केले गेले.सोबतच २००२ मध्ये विश्व मानवाधिकार प्रोत्साहन पुरस्कार ,२००३ मध्ये राष्ट्रीय संप्रदाय सद्भावना पुरस्कार (भारत सरकार) ,भारतीय एकता पुरस्कार,२००८ साली म.गांधी जीवन गौरव पुरस्कार या व अश्या किती तरी राष्ट्रीय अंतर राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित भाईजी आज वयाच्या ८५ व्या वर्षातही तारुण्याला लाजवेल अश्या उत्साहाने सतत कार्य मग्न असतात.                                                               काही दिवसांपूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्य आयोजित सोहळ्याचे औचित्य साधून भाईजी गुरुकुंज आश्रम मोझरी , ता. तिवसा, जी.अमरावती (महाराष्ट्र) या छोट्याश्या गावात आले होते.अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे गुरुजी यांनी प्रेमाने  करून दिलेला परिचय हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय असाच अनुभव होता. त्या वेळी त्यांच्याशी बोलण्याचे लाभलेले सौभाग्य अनेक दिवसांच्या संकल्पांची जणू सिद्धीच होती.अनेकदा याच ठिकाणी बाल वयात मी त्यांची ऎकलेलि भाषणे आणि भाईजींसोबत खेळलेले सामुहिक खेळ अजूनही स्मरणात होतेच मात्र प्रत्यक्ष भेट ही पहिलीच.त्या वेळी ते मला म्हणाले होते की,"बाळ,काळ बदलतो तशीच परिस्थितीही बदलत जाते महापुरुषांच्या  विचारांचे संदर्भ नव्या काळानुसार शोधत तुम्हालाच आता पुढे यावयाचे आहे... "अनेक भाषा अवगत असणाऱ्या भाईजींचे ते शब्द आजही मनात घर करून आहेत. खरच मोठी माणसेजी बोलतात त्याला चिरंतनाचं मुल्य असतं. त्यातही जे शब्द मुखातून बाहेर येतात ते कानापर्यंत पोहोचतात आणि जे हृदयातून येतात तेच ह्रुदय पर्यंत पोहोचतात. भाईजींचे ते शब्द आज हृदयात आहेत अनामोल अशी शिदोरी बनून. पुढे भाईजींच्या भाषणाची वेळ झाल्याने आम्ही सारे त्यांच्या सोबत कार्यक्रम स्थळी जायला निघालो.वाटेत उस्फुर्तपणे माझ्या खंद्या वर हात ठेऊन ते चालत राहिले. आजही तो हात मायेची उब देत आहे. त्यांच्या या परिस स्पर्शाने आई भेटल्याचा आनंद मला त्या वेळी झाला होता.                                                                                                             

आदरणीय सुब्बरावाजींच्या समवेत (गुरुकुंज आश्रम ,मोझरी )

सुब्बराव म्हणजे दोन स्थितींना जोडणारा दुवा ठरावेत एक अद्भुत नवा भारत आणि दोन आपला ऐतिहासिक वारस्याचा आदर्श.खरच भारतीय युवकांच्या हृदयाचे पोषण करणारे भाईजी  एक जिवंत विद्यापिठाच होत.