Wednesday 5 August 2015

मजूराची विकास वारी

मजूराची विकास वारी

`            
विशाल मोहेकर 
           नूकतेच छात्रसंघ सचिवांच्या निवडनुकींचे वारे आमच्या छोट्याशा महाविद्यालयात वाहायला लागले होते.त्यातच आपलाही एक प्रतिनिधी असावा म्हणूण आमच्या मित्रांनी एक नाव मोठ्या उत्साहने पुढे आणलं.कोणत्याही कामात पुढे असनारं,प्रसंगी मदतीला धावनारं, ते नाव म्हणजे विशाल साहेबराव मोहेकर. महाविद्यालयात होतकरु,कष्टाळु अन प्रामाणीक विद्यार्थी म्हणून त्यांची ओळ्ख होती.म्हणुन मग हेच नाव छात्रसंघ सचिव पदाच्या योग्य वाटणं यात काही गैर नव्हतच मूळी.पण व्यक्तिशः मात्र माझा त्यांच्या निवडनूक लढवण्यालाच विरोध होता आणि त्या बाबत स्पष्टपणे मी बोललोही.पण मित्रांचा आग्रह दादा अव्हेरु शकले नाहीत.आणि या निवडनूकीला सामोरे जाण्याचा निर्णय त्यानी घेतला.एक सांस्क्रूतिक प्रतिनिधी म्हनुन त्यांनी निवडनुक लढवली.त्यांच्या प्रेमामुळे मलाही निवडणुकीच्या त्या धामधूमीतून वेगळे रहता आले नाही.शेवटी निवडणुकीचा दिवस उजाळला.आपलीच जागा पक्की आहे हा आत्मविश्वास आमच्या ह्रूदयात धळ्धळत असतांनाच निवड्नुक प्रक्रिया सुरु झाली.पुढे काही काळानंतर निकाल लागला.पण आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर  पसरलेल्या स्मित हास्याने दुःखाची जागा घेतली.'विशाल मोहेकर एका मताने परभुत' अशी ती बातमी ऐकूण खाडकण एक क्षण डोळ्यात अश्रू तराळ्ले.अन त्याच वेळी विशालदादा,राहूल उके आणि मी तिघे जायला निघालो.आम्हा पैकी कुणालाच शब्द फुटत नव्हते.शेवटी विशाल दादाच बोलले, "अश्या छोट्या-मोठ्या गोष्टी सुरुच असतात, त्यात येवढं मनाला लावून घ्यायचं नसतं” त्यांचे ते शब्द आजही आठवता.मात्र दुसऱ्याच दिवशी त्याच पूर्वीच्या उत्साहाने ते कामाला लागले.त्या वर्षी निवडनुक कोण जिंकलं ते आज नाही आठवत आणि महविद्यालयात असतानाही ते नाव फारसं पूढ आलच नाही तो भाग वेगळा.पण त्या वेळी त्याचं महत्व खुप मोठ होतं.आमचा एक मतदार दबावाला बळी पडला,त्यातुन हे सारं घडलं होतं.मात्र त्यावेळी समजलेलं एका मताचं मूल्य आजही चांगलच लक्षात आहे.

         

चंद्रकांत वानखेड़े यांच्या समवेत विशालदादा आणि मी. 

      विशाल साहेबराव मोहेकर या नावाचा माझा परिचय झाला तो २०१० मध्ये 'स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक' या स्पर्धेच्या निमित्ताने.आणि या मैत्रीच रुपांतर घनिष्ट मैत्रीत केव्हा झाल ते मात्र आमच आम्हालाही कळल नाही.पुढे संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही वादविवाद-वक्तृत्व स्पर्धांच्या निमित्तनं फिरलो,सोबत कार्यक्रम केले,भाषणं दिलीत,लेख लिहिलीत,चांगली पुस्तकं,नियतकलिकं वाचत अनेक विषयांवर गप्पा मारल्या.आज ते सारं कसं  काल घडल्यासारखं वाटतं.पुढे मी पुणे विद्यापीठात प्रवेश घेतला आणि त्याच वेळी विशाल दादा अमरावती विद्यापीठातून मराठी साहित्य घेऊन एम.ए. करत होते.मात्र याच काळात त्यांच्यातला कार्यकर्ता घेत होता शोध समाज कार्याच्या संधीची.पडेल ते काम करीत स्वतःला सावरतच इतरांना सावरणारी माणसं तशी दुर्मिळच पण याच परंपरेत मोडणारं ते नाव होतं.


     याच काळात  दादांचा परिचय अश्याच एका प्रेरणादायक व्यक्तिमत्वाशी झाला.अमरावती जिल्ह्यातील अतिदुर्गम अश्या मेळघाट या भागात कोणत्याही प्रसिद्धी पासून दूर राहत अव्याहत काम करणारं ते व्यक्तिमत्व म्हणजे मा.प्रमोद थोरात हे होत. एका धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने विशाल दादा आणि प्रमोद सरांची भेट झाली आणि याच एका प्रसंगाने दादांच्या जीवाणाला कलाटणी मिळाली.प्रमोद थोरात मुळातच एक साधं व्यक्तिमत्व.अत्यंत गरीब परीस्थितीतून येऊन,आपलं शिक्षण पूर्ण करीतच समाज सेवेचा ध्यास घेऊन आदिवासींच्या सुखदुखांशी समरस होत आपल्या 'ह्युमन डेव्हलपमेंट सोसायटी ऑफ इंडिया'या संस्थेच्या माध्यमातून रचनात्मक आणि विधायक कार्याची सुरुवात त्यांनी केली होती.विशालदादांच्या या व्याक्तीत्वासोबत झालेला परिचय मुळातच नवी सुरुवात होती.सरांशी झालेल्या दीर्घ चर्चा,त्यांच्या भोवती असलेला प्रचंड कामांचा डोंगर आणि आदिवासी बांधवांबद्दलची त्यांची असलेली बांधिलकी बघून दादा प्रेरित झाले आणि त्यातूनच नव्या कार्याची दिशाच जणू त्यांना गवसली. 
        याच वेळी 'फिल्डवर्क' सोबतच विविध अभ्यास दौरे,कार्यक्रम आणि परिषदांसाठी राज्यभर फिरण्याचाही अनुभव त्यांना गाठीशी बांधता आला. मागील तीन वर्ष सोसयटीच्या अंतर्गत 'व्हिजन मेळघाट' हेच धेय्य ठेऊन दादा काम करत राहिले यात प्रमोद थोरातांचे लाभलेले मार्गदर्शन आणि प्रेरणा महत्वाची ठरली.मेळघाटच्या दुर्गम भागात इतर रचनात्मक कार्यासोबतच इंग्रजी शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार कार्य जोमाने पुढे नेण्याची आवश्यकता प्रमोदजींना जाणवत होती. त्यातूनच पुढे आदिवासी समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होता येणार होतं. याच कामात विशाल दादा हिरारीने पुढे झाले. आणि शिक्षण हक्कांच्या अमलबजावणी संदर्भात प्रमोदजींच्या वेगळ्या प्रयोगात कार्यरत राहिले. याचा सोबत रोजगार,बचत गट आणि त्याचे संघटन,ग्रामीण विकास,स्वच्छता,पाणी पुरवठा,अंधश्रद्धा निर्मुलन,आरोग्य आदी क्षेत्रात कामाचा अनुभव घेतच आदिवासी संस्कृती आणि कलांचा अभ्यासही दादांनी केला. सुमारे तीन वर्ष प्रमोदाजींच्या मार्गदर्शनात विकासाच्या या चळवळीचा एक वारकरी म्हणून ते काम करत होते.
       
     
         याच सुमारास फिलिपिन्स मधील मनिला या राजधानीच्या शहरात आशिया खंडात आपला वेगळा ठसा उमटवलेली,अत्यंत प्रतिष्टीत अश्या 'आशियन सोशल इन्स्टीटयुट' या समाज शिक्षण संस्थेत चालवला जाणारा 'समुदाय विकास या विषयातील आंतरराष्ट्रीय पदविका' या अभ्यासक्रमात 'ह्युमन डेव्हलपमेंट सोसायटी ऑफ इंडिया'च्या माध्यमातून सहभागी होण्याची संधी दादांना मिळाली.अत्यंत हलाकीच्या परिस्थितीतून येऊनही एका ग्रामीण तरुणाची ही निवड आंतरराष्ट्रीय स्थराच्या अभ्यासक्रमासाठी होणे हीच मुळात खऱ्या अर्थाने एक 'अचिव्हमेंट' होती. कौतुकाची थाप समाजाकडून पडत असतांनाच अंतर्मुख होऊन काम करण्याचा संदेश मात्र प्रमोदजींनी त्यांना त्या वेळी दिला होता.निश्चितच ही निवड म्हणजे मेळघाट च्या दुर्गम भागात केलेल्या परिश्रमांचीच जणू फलश्रुती होती.हा सारा प्रवास मुळातच सोपा नव्हता. घरची गरिबी,सर्वांगीण आभाव, त्यातच मिळालेली शिक्षणाची संधी आणि महापुरुषांचे विचार सोबत घेऊन केलेला हा प्रवास रोमांचित करणारा आहे.
           
      अमरावती जिल्ह्यातील जसापूर सारख्या अवघ्या हजार दीड हजार लोकसंख्या असलेल्या गावात १ फेब्रुवारी १९८८ रोजी जन्मलेल्या दादांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबी आणि हलाखीची.कोरडवाहू का असेना पण शेती नावाची साधी 'पट्टी'ही हाती धरायला नव्हती. मोडके घर आणि हातमजुरी एवढीच काय ती वाडवडिलांची संपत्ती. याच भांडवलावर 'जिंदगीचा' प्रवास होणार होता. मात्र फुले,शाहू,आंबेडकरांचा शिक्षणाचा विचार घेऊन आपली परिस्थिती कशीही असली तरी आपली मुलं शिकली पाहिजेत हाच विचार दादांच्या वडिलांनी त्या वेळी केला असावा. त्यांचे आजोबा हे धर्मोपदेशक म्हणूनच घरातलं वातावरणही तसं धार्मिकच होतं. म्हणूनच चांदूर बाजार येथील 'बॉईज & गर्ल्स ख्रिश्चन होम' या संस्थेत इयत्ता पहिली पासूनच दादांना दाखल करण्यात आलं, ते इयत्ता १० वी पर्यंत. पुढे लातूर येथे १२ आणि त्या पुढील पदवी शिक्षणासाठी चांदूर बाजार,जिल्हा अमरावती येथे प्रवेश घेतला.तिथेच त्यांची माझे एक सिनियर म्हणून आणि त्याही पलीकडे एक मित्र म्हणून गट्टी जमली. पुढे त्यांनी अमरावती विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए. केल आणि आज 'त्रिवेंद्रम विद्यापीठ कर्नाटक' येथे धर्मसिद्धांत या विषयात उच्च शिक्षण घेत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानत त्यांच्या ''शिका,संघटीत व्हा आणि संघर्ष करा'' या सूत्राची प्रेरणा जागी ठेवत त्यांचा प्रवास अव्याहत सुरु आहे.
फिलीपींस येथे विद्द्यार्थी मित्रांसमवेत 
       महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाच भारतीय युवक विद्यार्थी चळवळीने प्रभावित होऊन आता देश्याच्या राजकारणातच थेट तरुणांनीच सहभागी झालं पाहिजे असा विचार करीत असतानांच त्याची सुरुवात स्वतः पासून आणि स्वतःच्या गावापासून करण्याचा निर्णय विशाला दादांनी घेतला. त्यातही   ८०% समाजकारण आणि १०% राजकारण हे सूत्र घेऊन तरुणांनी आता राजकारणात आलं पाहिजे, हा विचार त्यांनी आमलात आणण्याचा संकल्प गावातल्या काही तरुणांना बोलुन दाखवला. पुढे २०१० मधेच वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी आपल्या जसापूर ग्राम पंचायतीची निवडणूक लढवत ग्रामपंच्यायत सदस्य पद पटकावले. आता मात्र गावकऱ्यांचा आपल्यावरील विश्वास सार्थकी लावण्यासाठी 'ग्राम विकास' हेच धेय्य घेऊन काम करणे गरजेचे होते. तरुणांचे सक्षम प्रतिनिधी आणि अत्यंत कमी वयातील ग्रामपंच्यायत सदस्य म्हणून आपल्यावरील जबाबदारीचे भान तर त्यांना होतेच शिवाय गावासाठी काही तरी करून दाखवायचेच हा संकल्पही होताच.
         जसापूरच्या विकासासाठी भरीव व मुलभुत कामाची 'ब्ल्यू प्रिंट' तयार करत असतांनाच उपसरपंचपदाची माळही त्यांच्या गळ्यात आली. मग गावात विविध शासकीय योजना अंतिम घटकांपर्यंत पोहचवण्याचा ध्यासच जणू त्यांनी घेतला.म्हणूनच पुढे सकारात्मक लोक सहभागातून परिवर्तन हे ग्रामविकासाचे सूत्र ठेऊन अनेक योजनांची प्रभावी आमलबजावणी केली. त्यात ग्रामीण आरोग्य,स्वच्छता,शिक्षण,रोजगार हमी,रस्ते,शुद्ध पाणी, दलित वस्ती विकास, तंटामुक्त गाव, सांडपाणी व्यवस्थापन,जवाहर विहीर योजना या व अश्या कितीतरी प्रकल्पांच्या माध्यमातून विकासकामे करून घेण्यात पुढाकार त्यांनी घेतला. पर्यावरन संरक्षण हा आजचा कळीचा मुद्दा, म्हणून गावात 'वृक्षारोपण मोहीम' तरुणांच्या साथीने राबवतच सुमारे १५०० वृक्ष्यांची यशस्वी लागवड त्यांनी केली.शिवाय ग्रामपंचायतच्या सामान्य फंडातून 'ट्री गार्ड' ची व्यवस्थाही त्यांनी केली. गावात 'रोजगार हमी कायद्या'ची प्रभावी अमलबजावणी व्हावी या साठी सतत पाठपुरावा करून त्यातून अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्याला मदत झाली. याच योजनेतून गावातील विहिरींची पुनर्बांधणी,रस्ते आदी योजनांची अमलबजावणी त्यांनी केली. 'ग्रामपंचायत सदस्य प्रशिक्षण' यशस्वी करण्यातही मोलाचा वाटा उचलतच ग्रामसभेचे प्रभावी उपयोजन करीत ग्रामपंचायतच्या कामात सर्वसामान्य नागरिकांना जोडत 'प्रशासन आणि लोक' असा समन्वय साधण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. गावात दलित समुदायाची परिस्थिती अत्यंत बिकट होती, मात्र असे असतांनाही त्यांचा विकास निधी इतरत्र वळवल्या जात असल्याचे लक्ष्यात येताच त्या विरोधात आवाज उठवत विशालदादांनी 'दलित वस्ती विकास योजनेची' प्रभावी अमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. त्यातच ज्या दलित वस्तीमध्ये स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही रस्ते नव्हते, तिथेच विकासाची वाट निर्माण करण्याचे श्रेय ही त्यांच्याच वाट्याला जाते.
         गावात पाण्याचा प्रश्न बिकट होता.म्हणूनच ही समस्या सोडवण्यासाठी सिंचन योजनेतून पाण्याची सोय त्यांनी केली. गाव स्वच्छ राहिले तरच देश समृद्ध होतो, हे ओळखूनच 'ग्राम स्वच्छता मोहीम' राबवत नाल्या व गटारे दुरुस्ती आणि बांधकाम करीतच कचरा व्यवस्थापनासाठीही काम करण्याचा संकल्प त्यांनी केला. एवढेच काय तर आपल्या कार्यकाळात सर्वाधिक घरकुल योजनांची अमलबजावणी करण्याचे श्रेय ही त्यांनाच जाते. याच सुमारास  जसापुरच्या सिमेअंतर्गत घनकचरा प्रकल्प उभारण्याचा घाट काही मंडळींनी आखला होता. मात्र त्या नागरिकांच्या आरोग्यावरचे विपरीत परिणाम लक्ष्यात घेत या प्रकल्पाच्या विरोधात मोहीम हाती घेत जनमत संघटीत करतच या विरोधात चक्क महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हान यांना घेराव घालण्याची तयारी ही त्यांनी केली होती.

     विशाल मोहेकर हे तरुणांचे प्रतिनिधी म्हणूनच त्यांच्या प्रश्नावरही त्यांनी सातत्याने काम केले. रोजगार,समुपदेशन,स्पर्धा-परीक्षा मार्गदर्शन,प्रेरणा कार्यक्रम,महापुरुषांच्या जयंत्या आदी उपक्रमांसोबतच चांदूर बाजार येथील 'कृषी उत्पन्न बाजार समिती' मध्ये स्थानिक तरुणांना ५०% आरक्षण असावे या मागणीसाठी जोरदार आंदोलन उभे केले. शिवाय ग्रामपंचायतचा कर नियमित भरण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीस धडक त्यानी दिली.

      महिला या ग्राम विकासाच्या मुलघटक मात्र तरीही त्यांचा सहभाग आजही प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत फारच कमी असल्याचे दिसून येते मात्र बदलत्या कळानुसार स्त्रियांना समोर आणणे महत्वाचे आहे. याच विचारातून केवळ महिला हाच विचार केंद्रस्थानी ठेऊन अनेक कार्यक्रमांचे यशस्वी  आयोजन त्यांनी केले. त्यासाठी सर्व समाजातील महिला एकत्र याव्यात म्हणून साध्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमापासून सुरुवात करीत विविध रचनात्मक उपक्रम त्यांनी राबवले. गावात महिलांसाठी स्वच्छता गृहाची कमतरता होती म्हणून ही मागणीही त्यांनी ग्रामपंचायती मध्ये लावून धरली.                       
         काही वर्षांपूर्वी २००६ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्रामीण आणि कृषी विकास या क्षेत्रात काम करणाऱ्या 'एम.एस.स्वामिनाथन फौऊन्डेशन'  संस्थेची स्थापना जसापूर मध्ये झाली होती. नंतरच्या काळात या संस्थेच्या कार्यकारिणी समिती सदस्य ही संचालक पदाची जबाबदारी सांभाळत असतांनाच शेतकरी आभ्यास दौरे, मृदा परीक्षण, शेतकरी प्रशिक्षण,पिक पाहणी ,प्रात्याक्षिके कार्यशाळा आदी अनेक उपक्रम त्यांनी राबवले. 
   
आशियन सोशल इन्स्टीटयुटच्या
 अध्यक्षा डॉ.रेमिरेज़ यांच्या समवेत 
    या व अश्या कितीतरी विधायक कार्यातून वेगळा आदर्श वाट चुकलेल्या तरुणाई पुढे ठेवत त्यांनी इतरांचीही काठी होण्याचा प्रयत्न केला. या त्यांच्या साऱ्या कार्याची दखल सामाजिक माध्यमे आणि संस्थात्मक विचारपीठानेही सातत्त्याने घातली आहे.मला अस वाटतं की सातत्त्यान सत्कार्य करणाऱ्यांच्या भाळी सत्काराचं भाग्य असतं. मग हीच कौतुकाची थाप आपली प्रेरणा होते. विशाल दादांना असे अनेक पुरस्कार लाभले आहेत. त्यात २०१२ मध्ये डॉ. बि. आर. आंबेडकर विद्यार्थी रत्न पुरस्कार, २०१३चा विध्यार्थी भूषण पुरस्कार, २०१५ मध्ये 'डॉ.एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फौऊन्डेशन चेन्नई' ची 'जमशेदजी टाटा राष्ट्रीय अकादमी' द्वारे दिल्याजाणारी कृषी आणि ग्रामीण विकास या क्षेत्रातील अत्यंत मानाची समजली जाणारी 'रिसर्च फेलोशिप' त्यांना प्रदान करण्यात आली. २०१५ मध्ये 'जनसेवा कला क्रीडा सांस्कृतिक अभियानाचा 'राष्ट्रीय क्रांतीजोती पुरस्कार' मा.जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला. मनोहर जोशी यांच्या हस्ते २०१५ चा 'संस्कृती वैभव पुरस्कार' मुंबई येथे त्यांना प्रदान करण्यात आला. भ्रष्टाचार निर्मुलन जन आंदोलन समिती यांचा 'आदर्श समाज सेवक पुरस्कार' देऊनही २०१५ मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आलं. 

       एकादा सहजच मी विशालदादांना विचारलं होत "दादा या सगळ्या  कार्याची प्रेरणा तरी तुम्हाला कशी मिळते ?" त्या वेळी मनमोकळं हसत ते मला म्हणाले  होते की, "आपण  ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचे ऋण फेडणेही आपलेच कर्तव्य आहे आणि त्यातूनच काम करत धडपडनं यातच सारं आलं. खरच मोठी माणसं काही एका क्षणातच मोठी होत नसतात. त्यासाठी प्रेरणा लागते, विश्वास आणि ध्यास लागतो. सोबतच लागते ती प्रचंड कष्टाची तयारी आणि बांधिलकीची ओढ. तीव्र समाज जाणीवाही असाव्या लागतात मगच पाय जमिनीवर आणि हात आभाळाला टेकवत विचारांचं अधिष्टान मांडून जन्माला येतो एखादाच विशाल साहेबराव मोहेकर.     
   




copyright_kunalramteke_aug.2015