Monday, 5 January 2015

              लोकशाहीच्या हितासाठी              

     

     
भारतीय संसद 
माझी चार वर्षांची पुतणी
'व्हिवा' पोलिओचा डोज घेऊन नुकतीच आली आणि घराच्या आजी-आजोबांना डॉक्टरांनी तिच्या बोटावर केलेली खून दाखवत एखादी मोठ्ठी मोहीम फत्ते केल्याच्या थाटात तिने कसे इतर मुलांसारखे न रडता कसे 'दो बुंद जिंदगीके' घेतले याचे आपल्या बोबळ्या बोलीत सुंदर वर्णन केले.तेवढ्यातच माझा मोठा भाऊ 'अरविंददादा' मतदान करून आला आणि आपल्या छोट्या मुलीसोबत बोलत राहिला. काही वेळानंतर व्हिवाचे लक्ष दादाच्या बोटाकडे गेले ज्यावर मतदान केल्याची खून होती. त्या वेळी आपल्या निरागस प्रश्नाने तिने सर्वांनाच चकित करून सोडले.ती म्हणाली,''बाबा तुम्हीपण पोलियो डोज घेतलात का?'' मुळात हा संवाद सहज असला तरीही यातील भाव मोठा मार्मिक आहे.अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या पोलियोच्या जाहिरातीच्या मध्यमातून अगदी शहरी उच्च मध्यम वर्ग पासून ते गावकुसांमध्ये राहणाऱ्या गरीब जनतेपर्यंत या आजारा विषयी जागृती केली आहे.मात्र भारतासारख्या विकसनशील जगाचा भाग असलेल्या देशाला झालेल्या पोलीयोबाबत मात्र कोणीही बोलायला तयार नाहीत असे दुर्दैवाने म्हणावे लागेल.भारताने स्वातंत्र्यानंतर आपल्या व्यवस्थेच्या निर्वहनाकरिता लोकशाही मार्गाचा अवलंब केला.राजकीय लोकशाही आपण  स्वीकारली मात्र सामाजिक आणि आर्थिक लोकशाही पासून आपण शेकडो मैल लांबच राहिलो. ज्या काळामध्ये जगभरातील अनेक देशांमधील लोकशाही व्यवस्था उन्मळून जात होत्या त्याच वेळी भारताने लोकशाहीचे केलेले बीजारोपण आज महावृक्षामध्ये रुपांतरीत झाले आहे.जगाच्या कुतूहलाचा विषय असलेली आपली लोकाशाही म्हणजे स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्वाच्या चौकटीवर विराजित एक आदर्श व्यवस्था असल्याचे प्रतीपादन वारंवार केले जाते.            
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर 
 
महान ग्रीक विचारवंत अरस्तूने लोकशाहीची निर्भेत्सना अध:पतित शासन प्रणाली म्हणून केली होती मात्र आपल्या राज्यघटनाकरांनी जी लोकशाहीची व्याख्या स्वीकारली ती "लोकांनी, लोकांसाठी, लोकांकडून चालवलेली शासन यंत्रणा म्हणजे लोकशाही" ही अब्राहम लिंकन यांची सुप्रसिद्ध व्याख्या होती. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की,"लोकांच्या जीवनात शांततापूर्ण रूपाने आणि रक्ताविहीन मार्गाने राजकीय, सामाजिक,आर्थिक परिवर्तन घडवण्याची प्रक्रिया म्हणजे लोकशाही होय." एके काळी 'साप और सापेरोका देश' म्हटल्या गेलेला भारत लोकशाहीच्या उपयोजनासाठी लायक नाही,अशी प्रतिक्रिया त्या काळी देश विदेशातील काही तथाकथित विद्वानांनी दिली होती.मात्र भारताने स्वातंत्रोत्तर काळामध्ये लोकशाहीचे यशस्वी उपयोजन करून जगाला तर दाखवलेच शिवाय जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था हा गौरवही प्राप्त करून घेतला.
           
संसदीय गतिरोध 
आज जेव्हा या प्रणाली कडे आपण बघतो तेव्हा अभिमानाने उर भरून येतो की आपण याच प्रक्रियेचे अभिन्न अंग आहोत. मात्र गेल्या काही काळामध्ये याच लोकशाहीला कलंकित करण्याचे काम याच देशातील लोकतंत्राच्या मंदिरांमध्ये विद्यमान असलेल्या  असलेल्या अंतर्गत घटकांकडून केले जात आहे. निश्चितच आपल्या सर्वांसाठी ही बाब घातक तर आहेच शिवाय जागतिक मानसपटलावर भारताविषयीचे जनमत गढूळ करणारेही आहे.ज्या संसदे मध्ये देशाच्या प्रगतीची स्वप्न रेखाटायला हवी होती तिथेच आपले जन प्रतिनिधी जर अश्लील चित्रफिती बघण्यात वेळ घालवत असतील तर हे चित्र खरच खूप निंदनीय आहे.संसदीय परंपरांची मोडतोड तर रोजचेच झाले आहे.जिथे जणतेसाठी धोरणे ठरावीत तिथेच जर साधनांचा गैरवापर होत असेल तर या पेक्ष्या भयावह बाब ती नेमकी काय असू शाकते? आपले म्हणणे रेटण्यासाठी 'पेपर स्प्रे' चा वापर व शस्त्रांचा धाक दाखवत केलेले नितीमुल्ल्यांचे अवमुल्यन म्हणजे संसदीय वारश्यास लागलेला घोर कलंकच होय.लोकशाही मध्ये जन प्रतिनिधी म्हणजे लोकांच्या आशा आणि आकांक्षांचे प्रतिनिधित्व करतात.आपल्या संविधानाने एक आदर्श संहिता आपल्या समोर ठेऊन लोककल्याणकारी मुल्ल्ये राबवण्याची दिशा निर्धारित केली आहे. मात्र तुमचे संविधान कसे आहे त्या पेक्षा ते राबवणारे कसे आहेत? हे जास्त महत्वाचे असून संविधानिक सिद्धांत आणि सूत्रांच्या सकारात्मक उपयोजनातूनच भावी भारताची वाटचाल अवलंबून आहे हे प्रकर्षाने नमूद करावे लागेल.             
   २०१४ च्या निवडणुकीच्या माध्यमातून नुकतेच आपल्या देशामध्ये सत्तांतर घडून आले आहे. कोणत्याही लोकशाहीवादी देशामध्ये होणार्या निवडणुका म्हणजे एखाद्या महोत्सवा सारख्याच असतात. मात्र या निवडणुकीच्या महोत्सवालाही ग्रहण लागलेकी काय ही शंका यावी.निवडणुकीत होणारी धांदल,मतांची खरेदी-विक्री,जाती आणि धर्माचे राजकारण करत उमेद्वारांकडून केला जाणारा विषारी प्रचार आज लोकांच्या सवईचाच एक भाग झाल्याने 'रोजचेच मढे त्याला कोण रडे?' ही अवस्था झाली आहे. त्यातही जे मतदान करतात ते विचार करत नाहीत आणि जे विचार करतात ते मतदान करत नाहीत,ही वास्तविकता असल्याने पाच वर्ष सरकारच्या नावाने ओरडण्याच्या पलीकडे इथला 'आम आदमी' फार काही करू शकत नाही.पर्यायानेच २०१४ मध्ये झालेल्या केंद्रीय निवडणुकीत निर्वाचित झालेल्या संसद सभासदांमध्ये सुमारे ३४%  सभासद हे विविध गंभीर आरोपाचे 'धनी' आहेत. पक्षांनुसार जर विचार केला, तर त्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे २८१ पैकी ९८ (३५%), काँग्रेस ४४ पैकी ८ (१८%), AIADMK ३७ पैकी ६ (१६%), शिवसेना १८ पैकी १५ (८३%) आणि AITC च्या ३४ पैकी ७ (२१%) सभासद गंभीर गुन्ह्यांसाठी आरोपी आहेत. (संदर्भ-Association of Democratic Reforms) मुळात आपला देश ही आपली जबाबदारी आहे.डॉ.आंबेडकर म्हणाले होते की,"जेव्हा आपण पारतंत्र्यात होतो तेव्हा आपण दुसर्यांवर बोट ठेऊ शकत होतो मात्र स्वातंत्र्य भारतात संपूर्ण जबाबदारी ही आपल्यावरच असेल."हे भाण भारतीय नागरिक म्हणून जोपर्यंत आपण बाळगत नाही तो पर्यंत प्रगल्भ लोकशाहीचे स्वप्न दूरच आहे असे मानले पाहिजे.संसद हे पवित्र लोकशाहीचे मंदिर आहे.लोककल्याणकरी शासन यंत्रणेचे मुलकेंद्र आहे.मात्र कामकाजात व्यत्यय आणून केवळ अवधान खेचणे हेच जर आपले उद्दिष्ट असेल तर त्याचे विपरीत परिणाम समोर येतील.त्यातही संसदीय कामकाजाचा जर विचार केला तर आपल्या पहिल्या लोकसभेत म्हणजे १९५२-५७  मध्ये ३७८४ तास कामकाज चालले होते तर २००९-१३ मध्ये मात्र ११५७ तसाच कामकाज होऊ शकले.'साठी बुद्धी नाठी' ही म्हण आपल्या  लोकशाही साठीही खरी ठरते की काय हा प्रश्न उपस्थित व्हावा.
                भारतीय लोकशाही समोर आज अनेक संकुचित शक्तींनी आवाहन उभे केले आहे. जातिवाद,धर्मवाद,भाषावाद,प्रांतवाद आदींच्या अतिरेकी जाणिवांमुळे देशाची अखंडता धोक्यात आली आहे.समाज घटकांच्या दुरावस्थेचा आपल्या राजकीय हितासाठी वापर केला जाऊन 'लोकशाही म्हणजे दावणीला बांधलेली गरीब गाय असते' हा कूसिद्धांतच काही तथाकथित लोकशाहीवादी 'शाही'लोकांनी अमलात आणल्याने प्रतीनिधीत्वहीन भावना समाजामध्ये निर्माण होत आहे.विवेकानंद म्हणाले होते,"आपण जाती,धर्म,पंथ,पक्ष,भाषांच्या भिंती तर उभारल्या मात्र एकामेकांना जोडणारे पूल बंधू शकलो नाही." याच संकुचित भावनांमुळे होणारे मतांचे राजकारण देशाला तोडू पाहते आहे.राष्ट्र नौकेस सहा हजार पेक्षा जास्त जाती-उपजातींची भोके पडली असून अश्या मुलातात्वावादी भावनाआपापल्या धार्मिक व वांशिकतेस राष्ट्रवादाशी जोडून काही 'संघ'टीत तत्व तथाकथित समरसतावादी सिद्धांताची घोषणा करीत आहेत, मात्र अश्या व्यवस्थेमध्ये इतरांचे काय स्थान असेल? ते मात्र निश्चित होऊ शकले नाही.समाज घटकांच्या दुरावस्थेचा आपल्या राजकीय हितासाठी दुरुपयोग  करून संकुचित राष्ट्रवाद हा किती आणि कसा घातक ठरू शकतो याचे उदाहरण जगाने हिटलर,मुसलोनी आणि महायुद्धांच्या रूपाने अनुभवले आहे.             
समस्याग्रस्थ भारताचे प्रातिनिधिक चित्रण 
आज बहुसंख्य भारतीय समाज हा विकासाच्या मुख्यधरेपासून वंचित असूनजोपर्यंत या घटकांकडे विशेष लक्ष्या दिल्या जात नाही तो पर्यंत तथाकथित महासत्तेचे स्वप्न पूर्ण होणे निव्वड अश्यक्यच आहे. २०१० मध्ये आपली लोकसंख्या ११५ कोटी होती त्या पैकी ३५ कोटी लोक उच्च्य मध्यम वर्गात होते तर ८० कोटी पेक्ष्या जास्त लोक दारिद्र्यात जीवन जगत होते. काळ बदलला की समाज बदलतो आणि प्रगतीचा नवा मार्ग दिसतो पण आपण कदाचित त्यासही अपवाद तर नाहीना? ही शंका यावी अशी परिस्थिती आहे.'स्ट्राटेजिक फोरसाईट गृप'च्या वतीने नुकतीच या विषयी एक आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली असून २०१५ मध्ये भारताची लोकसंख्या १४० कोटी असेल त्या पैकी ६० कोटी लोक सुखवस्तू असतील तर ८० कोटी लोक पुन्हा त्याच दारिद्र्याच्या अवस्थतेत खितपत असतील.अर्थातच "गरिबी जर बहु आयामी असेल तर विकासही बहुआयामीच असावा लागतो" असे मत थोर अर्थ शास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी व्यक्त केले होते. म्हणूनच जोपर्यंत सर्वसमावेशक धोरणांची अमलबजावणी होत नाही तो पर्यंत विकासाच्या मुख्य धारेपासून हा वर्ग दूरच राहणार असल्याने त्यातून निर्माण होणारा सामाजिक असंतोष राष्ट्राच्या प्रगतीस घातक ठरेल.               भारतीय शिक्षण व्यवस्था जगातील तिसर्या क्रमांकाची शिक्षण व्यवस्था असून पहिल्या शंभरात आपले एकही महाविद्यालय अथवा विद्यापीठ असू नये, हे आपले दुर्भाग्य आहे. महात्मा जोतीबा फुल्यांनी हंटर आयोगासमोर राष्ट्रीय बजेटच्या किमान सहा टक्के वाटा यासाठी असावा हि शिफारस केली होती मात्र आजही केवळ ३.३% वाटच आपण ठेवतो आहोत.समान शिक्षणाच्या ध्येय्यापासून तर आपण आजही दूरच असून समाजास संधी आणि शिक्षण मिळाले नाही तर राष्ट्रासाठी सक्षम माणसे निर्माण होणार नाहीत. अपुर्या आरोग्य सुविधा आपली कसोटी बघत असून जर स्वातंत्र्यानंतरही 'रोटी-कपडा-मकान,आरोग्य आणि शिक्षण' याच चक्रात गुरफटून पडलो असू तर आता पर्यंत आपण काय केले? हा सवाल स्वतःस विचाराने गरजेचे झाले आहे. माणूस केवळ भाकरीवर जगात नाही आणि सभ्यतेचा उद्देशही फक्त माणसाला धष्टपुष्ट बनवणे नसून इथल्या जनतेस आर्थिक व राजकीय न्याय, विचार आणि अभिव्यक्ती चे स्वातंत्र्य, दर्जा आणि संधीची समानताव्यक्तिगत प्रतिष्ठा, राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणारी बंधुता आदी संविधानिक मूल्यांचे उपयोजन करून नवा समाज निर्माण करणे हा आहे.             
लोकशाहीप्रती जागृत तरुणाई 
भ्रष्टाचार ही आपल्या लोकशाहीस लागलेली कीड असून जेवढा इंग्रजांनी १५० वर्षात केला नाही त्या पेक्ष्या कितीतरी जास्त स्वकीयांनी केला ही वास्तविकता आपणास नाकारता येणार नाही. 'पूर्वीचे नेते आदर्श होते मात्र आजचे घोटाळे आदर्श आहेत' असे उपरोधाने म्हणावे लागेल. म्हणूनच या विरोधात जनमनात असलेली प्रचंड चीड अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या रूपाने दिसून आली. आंदोलने ही लोकशाही जिवंत असल्याची उदाहरणे आहेत. या आंदोलनाने युवा पिढी आणि आत्ममग्न वर्ग यांच्यात जागृती आली असे चित्र निर्माण झाले होते मात्र राष्ट्रभक्ती म्हणजे सणासारखी साजरी करून विसरून जाण्याने आपले प्रश्न सुटूशकणार नाहीत याची जाणीव समाजास होत आहे 'व्यवस्था परिवर्तन' हा असाच एक शब्द  जो या आंदोलनांमधून वारंवार वापरल्या गेला, मात्र सत्ता परिवर्तन म्हणजे व्यवस्था परिवर्तन नसून सत्ता हे परिवर्तनाचे एक माध्यम आहे.आज भारतीय समाजावर व्यक्तिवादी राजकारणाचे ग्रहण असून असा व्यक्तीकेंद्रित राष्टवाद समाज स्वास्थ्यास हानिकारक आहे. कार्लाइल यांचे प्रसिद्ध वाक्य या वेळी प्रासंगिक वाटते,"ज्या वेळी व्यक्तीची छाया खूप मोठी दिसायला लागते तेव्हा आपण समजायला हवे की सूर्यास्त आता जवळ येत आहे." निश्चीतच जबाबदारी आपली आहे. परिवर्तनाची सुरुवात स्वतः पासून व्हावयला हवी.संविधानाने प्रत्येक भारताच्या सुजण नागरिकास मतदानाचा अधिकार दिला आहे. आजही जिथे जगातील अनेक देशांत सर्वांना मतदानाचा अधिकार नसतांनाच आपल्याला मिळालेली शांततापूर्ण परिवर्तनाची ही संधी व्यर्थ घालवता कामा नये. आपले प्रत्येक मत म्हणजे भ्रष्ट व्यवस्थेस मारलेला दगड असून सामुहिक प्रयत्नातून ही भिंत आपण उध्वस्थ करू शकतो हा आत्मविश्वास जागृत होणे गरजेचे वाटते.           
आज आपल्या समोर समस्यांचे डोंगर असतांनाच भावी उज्वल भवितव्य आणि आपला वैभवशाली वारसा या दोहोंमध्ये आपण उभे आहोत याची जाणीव आपणास आहे. आपले उच्च आदर्श आपणास खुणावत आहेत. भारताकडून आज जगाला अपेक्षा असून भारत विश्वाचे भवितव्य ठरेल,हा आशावाद स्वामी विवेकानंदानी व्यक्त केल्याचे स्मरण होत आहे, मात्र त्याच भारताचे भवितव्य मात्र आपली युवापिढी असल्याचेही नमूद करावेसे वाटते. सशक्त, निर्व्यसनी, आदर्श, अभ्यासू , कार्यतत्पर आणि सामाजिक जाणीवांनी परिपूर्ण अशी तरुणाई देशाची खरी संपत्ती आहे. भगतसिंग म्हणाले होते,"मी देश सोडून जात आहे, ते युवकांच्याच भरोशावर." गरज आहे ती 'लोकशाहीच्या हितासाठी' याच युवा पिढीने पुढे येण्याची. छोट्या व्हिवाने विचारलेला 'पोलीयो'चा प्रश्न निरागसतेतून होता मात्र आपल्या व्यवस्थेसाठी आपणही कर्तव्याचा डोज घेणे महत्वाचे आहे तरच आपले महान राष्ट्र सुदृढ आणि सश्यक्त होईल,अन्यथा राष्ट्राला झालेला पोलियो बघून आपली भावी पिढीही आपणास 'डोज' घेतला नव्हता का? हा प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही.निश्चितच जबाबदारी आपली आहे.

Monday, 24 November 2014

विधानसभेच्या रिंगणातून…

      
कोणत्याही लोकशाही व्यवस्थे मध्ये निवडणुका म्हणजे एखाद्या महोत्सवासारख्या असतात. नुकत्याच महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या निमित्त्याने राज्याचे समजकारण आणि राजकारण हे निवडणूकमय झाले आणि एका नव्या अश्या अद्भुत उर्जेने जनमनात प्रवेश केला. राजकारण म्हटले की सत्ता संघर्ष हा आलाच म्हणून चांगल्या लोकांच्या हाती सत्ता देणे हे महत्वाचे ठरते.शहाण्या लोकांनी सत्तेच्या मागे लागू नये असा एक समाज आपल्या कडे प्रचलित आहे मात्र सत्ता जर शहाण्या लोकांच्या हातात आली तर मात्र आपलं भविष्य काही औरच असेल यात काही शंका नाही.आपल्या सर्व समस्यांना एकच उपाय आणि तो म्हणजे सत्तांतर हा भाव इथल्या लोकांमध्ये काँग्रेस सरकारच्या कामांचा (न केलेल्या आणि करून चुकलेल्या) परिणाम म्हणून निर्माण झाला. मतदानाच्या शांततापूर्ण मार्गाने जनतेने लोकसभा निवडणुकीत जे केले तेच या निवडणुकीत करून काँग्रेस सरकार ला मोठा धक्का दिला. सत्तांतर हेच आत आपल्या सर्व समस्यांवर उपाय हा ग्रह लोकांनी करून घेतला कि हा अपरिहार्य परिणाम होता हे मात्र येणारा कालच ठरवणार आहे.राजकारण म्हटलेकी सत्ता संघर्ष हा आलाच म्हणून चांगल्या लोकांच्या हाती सत्ता देणे हे महत्वाचे ठरते.शहाण्या लोकांनी सत्तेच्या मागे लागू नये असा एक समाज आपल्या कडे प्रचलित आहे मात्र सत्ता जर शहाण्या लोकांच्या हातात आली तर मात्र आपलं भविष्य काही औरच असेल यात काही शंका नाही.आपल्या सर्व समस्यांना एकच उपाय आणि तो म्हणजे सत्तांतर हा भाव इथल्या लोकांमध्ये काँग्रेस सरकारच्या कामांचा (न केलेल्या आणि करून चुभेमधील सर्व २८८ जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. १९ ऑक्टोबर २०१४ रोजी मतमोजणी व निवडणुकीचे निकाल घोषित केले गेले. यात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक १२२ जागा मिळाल्या. शिवसेनेस ६३, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ४२ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा मिळाल्या.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक स्तीत्त्यांतरे महाराष्ट्राने अनुभवली आहेत. त्यात २०१४ लोकसभा निवडणुकांमधील अपयशाच्या पार्श्वभूमीवर सत्तेवर असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्यांनी आपली आघाडी मोडत निवडणुक वेगळ्याने लढवण्याचे ठरवले. तसेच जागावाटपावरून एकमत होऊ न शकल्यामुळे भारतीय जनता पक्ष व शिवसेना ह्यांची २५ वर्षे सुरू असलेली युतीदेखील संपुष्टात आली. ह्यामुळे महाराष्ट्रामधील सर्व प्रमुख मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढत झाली.या सगळ्या वातावरणात प्रादेशिक पक्षांचीही भूमिका मोठीच रंजक आणि महत्वपूर्ण ठरली आहे.प्रादेशिक वाद आणि विकासाचे राजकारण या सोबतच जाती,धर्म,भाषा हे महत्वाचे मुद्दे असले तरीही राज्यातील जनतेने नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या अराखड्यावरूनच भारतीय जनता पक्षाला जड मते दिली मात्र एकंदरीतच राज्याचा कल मात्र चौरंगीच राहिल्याने आणि पर्यायाने स्पष्ट  बहुमत न मिळाल्याने दुर्दैवाने अस्थिर शासन मिळाले आणि विकासाच्या राजकारण वरून चर्चा या विश्वासमातावरच हलकल्लोळ उडाला आहे. विधान सभा निवडणुका होऊन देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन झाले त्या मुले पुन्हा एकदा विदर्भ राज्याच्या मागणीने जोर धरला आणि विकासाच्या वाटेवरून दूर राहिलेल्या विदर्भास आता चांगले दिवस येतील असे वाटू लागले.

        महाराष्ट्रासमोर अनेक समस्या ‘आ’ वासून उभ्या असतांनाच भ्रष्टाचार,बेरोजगारी, प्रादेशिक असमतोल, शेतकरी आत्महत्या,शिक्षण, आरोग्य, पाणी,शेती आदी च्या प्रशांनी सरकार समोर आव्हाहन उभे केले आहे.सोबतच असलेली अस्थिरतेची भीती सरकारला भासत असून शिवसेनेसारखा खंबीर मित्र पक्षही या प्रवासात त्यांचे सोबत नसल्याने राष्ट्रवादीच्या तेकुने तात्पुरती तरलेली सरकारी नाव कधी बुडेल हे मात्र सांगता यायचे नाही.विधान सभा निवडणुकीने सरकार बदलले पण या परिस्थितीत ज्या राष्ट्रवादी पक्षाला खुद्द नरेंद्र मोदींनीच ‘भ्रष्टाचारवादी’ म्हटले आणि सत्ता स्तपणे सोबतच भ्रष्ट मंत्र्यांना जेल मध्ये टाकण्याचे अभिवचन इथल्या मतदारांना दिले मात्र नियतीचा उलटा फासा परत बी.ज़े.पी.च्या बाजूने पडला.राष्ट्रवादीचा आधार घेऊन आवजी मतदानाने तथाकथित विश्वास संपादन करून वेळ घालून तर नेली पण या सरकार चे भाविष्य येणारा कालच ठरवेल…

Sunday, 9 November 2014

मायन घेतलेल्या उधयाची कविता...


माय… 

त्या घेतलेल्या उधयाची कविता 

जल्मान कवाच लिवून टाकली! 

पेरन अन सवंगन 

लागलाच हाय तुया मांग, 

पण पिक हाती येत नाही 

साता जलमा पासून…  


करून जंगल जीवाचा 

गोठून माठून रगत


पायाले चिखल्या पावसायात 

हाताले फोय हिवायात 

उन्हायात आंगाले घाम 

फाटक्या झाम्परावर तुया 

चितारून रायला नकाशा 

माया भारत देशाचा 


'ऋतू हिरवा,ऋतू बरवा'

कवाच तुले दिसत नाई 

रोजनच मानल जात जाय 

थेही एका पारगिन 

पण हाये आठव नवल 

तुई दोनी परागीन जाची कमाल 


माय,

त्या घेतलेलं उधय,

कवा हुइन पूर 

भाकरीच्या चंद्राले इथ गरीबीच गिरान हाय 

थांब आजच्या दिस… 

सुर्यच आनतो सकाय…     

उधयान तुयासाठी… 

Monday, 20 October 2014

विधानसभेची लोकशाही                                                                                                                             

         विधानसभेची लोकशाही  

                                                                                                                                             

भारतीय लोकशाही व्यवस्था एक आदर्श  म्हणून जागतिक मानस पटलावर आपले गौरवपूर्ण स्थान प्रदीर्घ  वाटचाली नंतर प्रस्थापित करण्यात यशस्वी ठराली आहे.सातंत्र्या नंतरचा कालखंड हा भारतीयांनी मोठ्या श्रमाने आपल्या राष्ट्रस्या पुनर्निर्माणाच्या प्रक्रियेत घालविला भारताचे भविष्य  मात्र याच लोकशाही परम्परसंचे फलित होय.कोणत्याही लोकशाही व्यवस्थे मधे निवडणुका या एखाद्या महोत्सवासारख्या असतात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांनी तर  जगाला आश्चर्य चकित करुन सोडले आहे. भारताच्या या व्यवसतेचे सरे श्रेय मात्र आपणास  द्यावे लागेल ते मात्र भारताच्या संविधानाला.भारताचे संविधान म्हणजे भारतीय अस्मितेचा जागतिक जहीरनामच होय.भारताचे अस्तित्व समस्थ नागरिकांची जबाबदारी आहे.लोकशाहीची मूळ संकल्पनाहीच मूळी लोक सहभागातून झालेले सत्तेचे विकेंद्रीकरण अशी आहे. लोकशाही ची निर्भत्सना अरस्तूने अद्धपतित शासनपद्धती म्हणून केली मात्र डॉ. बाबासाहेब आम्बेडकरनी जी व्याख्या स्वीकारली ती अब्राहम लिंकन यांची जगप्रसिद्ध व्याख्या होती,'' लोकांनी लोकांसाठी लोकिांकडून चलवालेवली शासन प्रणाली म्हणजे लोकशाही.''
महाराष्ट्र विधानसभा 

         नुकत्याच महाराष्ट्र राज्यात पार पडलेल्या विधान सभा निवडणूक २०१४ या सत्तांतरस कारणीभूत ठरल्या असून कांग्रेस सरकार जउन भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर चललेला मोदी फ्याक्टर या विधान सभा निआवडणुकीत चालेल तो किती याछे विश्लेषण करण्याचा प्रयत्न विचारवंत करीत असतांनाच या निवडणूक निकलांनी मात्र मोदींच्या जादू विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असल्याचे मत विरोधकांनी व्यक्त केले आहे.प्रस्तुत सरकारच्या घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर जनमताचा हा कौल निच्छितच बदलस कारणीभूत असल तरीही सकारात्मक सत्तांतर हे आहेका हे मात्र येणारा काळच ठरवेल.भारतामध्ये असलेली लोकशाही प्रक्रिया आज साऱ्या जगाचे लक्ष्य वेधून घेत आहे.निवडणुकांमधे होणारा भरष्टाचार मात्र या लोकशाहीचे धिंडवडे काढतो आहे.सत्ता स्थापनेच्या संदर्भात सुरु होणारा घोड़ेबाजार तर 'आमबात' आहे.युती आणि आघाडीची तुटलेली गणित आता काय रूप धारण करतात ते तर विचारायलाच नको.पक्षांमधे सुरु जलेली आया राम गया राम यांची जंत्री नुकतीच थंडावली असतांनाच आता पुढे काय ? हा प्रश्न महाराष्ट्रीय जनता व्यक्त करात आहे.जातिवाद,धर्मवाद,भाषावादी राजकारणस येथे कोणीही वाली नहीं हा कल जनतेने दिल आहे.मात्र सम्प्रदायवादाचा न ओसरलेला ज्वर चिंतेचे कारण ठरावा.विकास हाच महत्वाचा मुद्दा असून सत्ताधारी सरकारने हेच आपले धेय ठरवावे.

Sunday, 19 October 2014

बारीपाडयाची गोष्ट… 

                    बारीपाडयाची गोष्ट… 



    
मा.चैतराम पवार 
 भारत म्हणजे खेड्यांचा देश. हे नेहमीच वाचत आणि ऐकत आलेलं घोटीव वाक्य,पण त्याच खेड्यात वास्तव भरतच दर्शन घडत असतांनाही विकासाच्या मार्गापासून कोसो दूर असलेला ग्रामीण भारत म्हणजे अभावाचे मूर्तिमंत प्रतीकच होय. गाव म्हटलं की आठवत ती म्हणजे गावाचे गचाळ रस्ते,गोदार्या,अपुर्या आरोग्य सुविधा,सांडपाणी आणि चिखल.जसा रस्त्यावर तसाच माणसांच्या आयुष्याचाही. म.गांधी म्हणाले होते की,"तुम्हाला जर तुमच्या देशाचा विकास करायचा असेल तर आधी खेड्यांचा विचार करावा लागेल."स्वातंत्र्या नंतर मात्र राजकीय पोळी भाजाण्याच्याच प्रयत्नात असणार्या राजकारण्यांनी गावाच्या समस्यांचा वापर स्वार्थासाठी करून घेतला.गावाच्या सेवेसाठी सर्वस्व अर्पण करणारे निस्वार्थी कार्यकर्ते मात्र विरळाच निर्माण होत राहिली.महापुरुषांचा संदेश सांगणारे पुष्कळ असतात मात्र उपयोजन करणारे महाभाग काही औरच. अश्याच कर्मयोग्यांच्या परंपरेत आजच्या काळात एक नाव आदरानं घ्यावं लागेल ते म्हणजे चैतराम पवार यांचे. बारीपाडा,तालुका सक्री,जिल्हा धुळे या जिल्ह्याच्या  नकाशावरही धड दिसू न शकणार्या गावाने चैतारामजींच्या नेतृत्वात एक नवा मैलाचा दगड रचला आणि देशाच्या विकासात आपल्या गावाचे महत्व उद्घृत केले.
सामुहिक श्रमदान 
                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                            एका सर्वसामान्य गावासारखाच असणार शंभर टक्के आदिवासी असणाऱ्या पाचशे लोकसंखेच छोटस गाव बारीपाडा. समस्यांनी घेरलेल्या गावात माणसे तर होती,पण प्राण मात्र हरवला होत.विहिरी तर विहिरीत्र होत्या पण जीवन मात्र हरवलं होत. होता तो केवळ अभाव आणि अंधश्रद्धा. आपण आपल्या गाव साठी काही करायचं हा भाव होताच तिथल्या तरुणानामध्ये दिशा मात्र मिळत नव्हती.आशा होती पण मार्ग नव्हता.अश्याच तरुणांपैकीच एक चैतराम पवार.गावातील पहिले पदव्युत्तर शिक्षण M.Com मधून पूर्ण केल्या नंतर घर-दार,नोकरी,पैसा,पत्नी आणि कुटुंब या चक्रव्युहात न अडकता आपला  गाव हाच आपला मार्ग हा विचार करून कार्याला लागण्याचा संकल्प करण्याचा निर्धार करणारा तरुण.स्वतः एका गरीब कुटुंबातून येऊनही 'अहं' पेक्षा 'वयं' चा हा विचार त्या काळात त्यांच्या प्रबुद्ध मानसिकतेची साक्ष देतो.आपल्या गावासाठी काही करता येईल का ? या प्रश्नाने चैतारामजींच्या मनात हलकल्लोळ निर्माण केला होता.करायचं पण नेमकं काय?हा प्रश्न 'आ' वासून उभा रहिला.'गाव करी ते राव न करी' अशी एक म्हण आपल्या कडे प्रसिद्ध आहे. म्हणूनच गावातल्या समस्यांच्या निर्मुलनासाठी एका माणसाच्या प्रयत्ना पेक्षा रचनात्मक कार्यासाठी संघटन बांधणी गरजेची ठरली. गावात जुगाराचा प्रश्न मोठा त्यातूनच परगावातून जुगारासाठी येणाऱ्या लोकांशी झालेल्या संघर्षातून हे संघटन निर्माण करणं आणि दृढ करणं शक्य झालं. सूरुवातीला गावातल्या चार दोन तरुणांना संघटीत करून चैतारामजींनी आपला मोर्चा संपूर्ण ग्रामसभेकडे वळवण्याचा निर्णय केला.विरोध आणि अंतर संघर्षातून निर्माण झालेला कलह भविष्यात मात्र खरेच एक नाव सृजन ठरेल याचा थांग मात्र त्या काळात त्या भोळ्या जीवांना काही लागला नसेल.परंतु व्यक्ती विकासाची सुरु झालेली ही चळवळ आता व्यक्ती व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचा ध्यासच जणू चैतारामजींच्या अंतःकरणाने घेतला होता.या कामात  डॉ.आनद फाटक यांची लाभलेली साथ आणि प्रेरणा मोलाची ठरली.चैतारामजींच्या कार्याला या व अश्या प्रकारे झालेली सुरुवात बदलांची नांदी ठरली. मा.अण्णा हजारे यांच आदर्श गाव राळेगण सिद्धी बघण्याचा योगही याच काळात चैतरामजींना आला.अण्णांच्या ग्राम परिवर्तनाची प्रेरणा त्यांनी आपल्या गावात ओतली आणि सकारात्मक बदलांची प्रक्रियाच या नंतर जणू सुचारू झाली . 
       शेती हा ग्रामीण अर्थ व्यवास्थेचा कणा.म्हणून शेतीच्या सुधारणांची गरज भासू लागली.सिंचन सुधारनांच्या अभावा मुळे कोरडवाहू शेतीचे रुपांतर बागायती शेती मध्ये करणे भाग होते. त्या साठी शेत तळे आणि बंधारे यांची बांधणी लोक सहभागातून करण्याचा प्रस्थाव गावकर्यांनी सर्वानुमते ग्रामासाभेमध्ये पारित केला.श्रमदानाच्या कृती कार्यक्रमातून काम होणार होते.मात्र या श्रमदानात सहभागी न होणार्यांसाठीही गावाने तरतूद  करून ५० रुपये दंड आकारण्याची योजना केली.हात कामाला लागले.वाहते पाणी अडवल्या गेले.जमिनीतील पाण्याची पातळी वाढली.विहिरी तुडुंब भरू लागल्या.याच श्रमदानाचा परिणाम म्हणून एके काळी केवळ  ११ असलेली विहिरींची संख्या आता ४० वर जाऊन पोहचली.निश्चितच हे श्रेय गरीब सध्या भोळ्या आदिवसिंच्या कष्टांना आणि चैतरामजींच्या प्रयत्नास आहे.या कार्यास पाहून शेती विकासासाठी अनेक अभ्यासाक मंडळी पुढे आली.त्यातूनच या मार्गदर्शनच उपयोजन डोळ्यात भारणार्या पिकांमध्ये होऊ लागलं.ज्वारी,बाजरी,तूर,मुग,सोबतच अनेक प्रकारची कडधान्य तसेच उस,कांदा बटाटा,लसून या नगदी पिकांच्या उत्पादनातून कास्ताकारांची मने आनंदाने भरून गेली. हल्ली तर गावात स्टोबेरीची होत असलेली निर्मिती हा कौतुकाचा विषय ठरला आहे.गावाने निर्माण केलेला इंद्रायणी तांदूळ एक ब्रांड म्हणून पुढे आला असून जे गाव आन्ना - पाण्या साठी इतरांवर अवलंबून होते तेच गाव आज पुरवठादार झाले आहे.

     अर्थ संपन्नतेसोबतच शिक्षणाच्या सुधारणांसाठीही प्रयत्न करणे गरजेच होते.शाळा हा गावाचा आत्मा,म्हणून शाळेला जाणं प्रत्येक विद्यार्थ्याला सक्तीच करण्यात आलं. वेळेवर न येणाऱ्या गुरुजिंसाठीही दंडाची कार्यवाही करण्याचा निर्णय गावाने घेतला. दंड मात्र वेळेवरच घेतल्या जाण्याची सोयही गावाने केली.रस्त्यावर फिरणाऱ्या मुलांनी या मुळे धरलेली शिक्षणाची वाट प्रौढ शिक्षणासाठीही तेवढीच प्रेरक ठरली आहे.गावातील सुधारणांसाठी लोकांचा मिळालेला सकारात्मक सहभाग हा नव्या बदलास कारणीभूत ठरला.पाण्याचे निर्जंतुकीकरण,मुलांचे लसीकरण, घर तेथे सौचालाय, वृक्षारोपण, स्वच्छता अश्या विधायक कार्याच्या माध्यमातून बारीपाड्याने कात टाकायला सुरुवात केली. ज्या बाबी शहरात दुर्मिळ ठराव्यात त्या खेड्यात घडवण्याचा चमत्कार या गावकर्यांनी प्रत्यक्षात उतरवला.त्यात कुटुंब नियोजनासाठी स्वतः पुरुषांनी घेतलेला पुढाकार म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राच्या वैचारीक भूमोकेचे यथार्त प्रतिबिंबच म्हणावे लागेल.आज सुमारे ९०% पुरुष नसबंदी झाली असून कुटुंब नियोजन क्षेत्रातील एक नवा विक्रमाच गावाने केला आहे.
चैतराम पवार : एक संबोधन 

       गावाच्या प्रगतीत जसा वाटा पुरुषांचा तसाच महिलांचाही.मात्र नैसर्गिक संकोच्याच्या भावनेतून स्त्रियांना वाटच जणू मिळत नव्हती.म्हणूनच चैतरामजींनी क्यानडाहून पी.एच. डी.च्या संशोधना साठी आलेल्या एका विद्यार्थ्याच्या सल्ल्या वरून खास महिलांसाठी 'वन भाजी स्पर्धा' आयोजित करण्याचा निर्णय घेतला.यात महिलांचा आढळून आलेला लक्षणीय सहभाग १००० प्रकारच्या वनस्पती पासून ७०० प्रकारच्या औषधी वन भाज्यांच्या शोधास कारणीभूत ठरला.आज या अनोख्या स्पर्धेची दाखल देशभरातील माध्यमांनी घेतली असून महिलांच्या कमगिरीचे कौतुक अनेक मानाच्या पुरस्कारांनी करण्यात आले आहे.जर तुम्हाला झाडे लावायची नसतील तर किमान तोडू तरी नका,हा साधा विचार घेऊन आदिवासीबांधावांचा प्राण असलेल्या जंगलांकडे लक्ष देणेही गरजेचेच होते.बरीपाडयाचा जंगलच मुळी समृद्ध.मात्र गरज होती ती या वनांच्या संरक्षणाची.त्या साठी एक ठोस कृती समिती गावातील जेष्ठ मंडळींच्या नेतृत्वात आणि तरुणांच्या पुढाकाराने स्थापणकरण्यात येउनमहत्वाचे पूल उचलण्यात आले.बारीपाड्याच्या जंगलात आज गावाच्या सामुहिक सहभागातून ३४५ प्रकारचे वृक्ष,४८ प्रकारचे पक्षी,१० प्रकारचे प्राणी संरक्षित केल्या गेले तसेच ११०० हेक्टर जंगल क्षेत्रही सुरक्षित केले गेले.१९९१ मधेच या कार्याची मुहूर्तमेढ रोवल्या गेली होती ती 'कुऱ्हाड बंदी' करून त्याची मधुर फळे आज चाखायला मिळत आहेत.

        बारीपाडा आणि चैतरामाजींच्या या सार्या कार्याची दखल आज आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही घेतल्या जात असून त्यात त्यांना मिळालेला 'आंतरराष्ट्रीय जैवविविधता पुरस्कार','इंटर न्याशनल फंड फोर अग्रिकल्चर डेवलपमेंट'रोम,इटली चा पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याची पावतीच होय.महाराष्ट्र शासनानेही 'शेतीनिष्ठ पुरस्कार' चैतारामजिंना सन्मानाने प्रदान केला.या व अश्या किती तरी देश विदेशातील सन्मानांचे मानकरी ठरलेले चैतराम पवार हे व्यक्तिमत्व म्हणजे बारीपाड्याच्या विकासाचे महान शिल्पकार होत.व्यक्तिगत साधेपणा आणि कार्याची समर्पितता या गुणांमुळे ते आपल्या हृदयात आदराचे स्थान निर्माण करतात.
आबासाहेब गरवारे महाविद्यालय पुणे च्या वतीने घेण्यात आलेला हृद सत्कार 

        नुकत्याच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने चैतरामजींच्या भेटीचा योग पुण्यात आला.त्यांच्याशी बोलतांना जाणवलेला एक निस्सीम माणूस मनात घर करून गेला आहे.त्या वेळी मी त्यांना म्हणालो होतो,''सर,ज्या काळात आमच्या पिढीचा जन्म झाला,त्या काळात आपण कामाची सुरुवात केली आपण  स्वतः उच्च शिक्षित आहात मात्र तरीही मोठ्या पगरची नौकरी न करता आपण ग्रामसेवेस प्राधान्य दिले,पण आजचा युवक ग्रामीण भागात काम करण्यास उत्सुक दिसत नाही्. हे अपयश नेमकं कुणाचं? आमच्या मानासिकतेचं की  शिक्षण व्यवस्थेचं?''त्या वेळी त्यांनी दिलेलं उत्तर मोठ मार्मिक होत,ते म्हणाले होते की,''शिक्षित युवक शहरात जातो,पैसा कमवतो यात वाईट काही नाही पण आपण ज्या समाजात जन्मास आलो त्या समाजाच्या प्रगती साठी प्रयत्न करणं ही त्याच युवाकांची जबाबदारी असते.'' याच वेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असलेले जेष्ठ पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ उभे राहिले या समस्येची आर्थीक कारणेही आमच्या समोर मांडली. समस्या आज कोणतीही असो त्यावर उपाययोजना करता येणे गरजेचे आहे. त्या साठी  मात्र गरज आहे मानसिकता आणि प्रयत्नांची. हाच आदर्श आपल्या जगण्यातून चैतारामजींनी घालून दिला आहे.                                                    खरच बारीपाडा हे चैतरामजींच्या परिश्रमांचे फलीत आहे.बारीपाड्याच्या प्रगतीची ही गोष्ट आशीच पुढेही सुरूच राहिल,जोवर गावातल्या प्रत्येकात चैतराम आणि प्रत्येक गावाचं बारीपाडा होत नाही.                                                                                                        

#chaitrampawar #baripada  

Saturday, 4 October 2014

सुशिक्षित उमेदवाराची महाराष्ट्राला गरज 

                 सुशिक्षित उमेदवाराची महाराष्ट्राला गरज                                                                                                                                                          

             असं म्हणतात की,"सत्ते पुढे शहाणपण चालत नाही",पण जर शहाण्या लोकांच्या हातामध्ये सत्ता गेली तर भविष्य काही वेगळच असेल. नुकत्याच झालेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकी नंतर आत्ता शंखनाद झाला आहे तो महाराष्ट्र विधान सभा निवडनुकीचा. लोकशाही व्यवस्थे मध्ये निवडणुका या महोत्सवा सारख्या असत. या उत्सवाला मात्र गाल बोट लागू नये म्हणून आपल्या उमेदवाराने आणि आपण सगळ्यानीच प्रयत्न करायला हव. लाच देऊन मिळवलेली गठ्ठा मते आणि त्या मतांच्या बळावर निवडून आल्या नंतर स्वार्थासाठी त्याच रयतेला वेठीस धरत भ्रष्टाचार करून रग्गड पैसा मिळवायाचा हीच मानसिकता असणार्यांची काही कमी नसत्तानाच हे दृष्ट चक्र थांबवण्याची मात्र गरज आजच्या पिढीला भासते आहे. आमचा विधायक कसा असावा यावर आपण केलेला विचार अमलात आणण्याची हीच खरी वेळ आहे. निवडणुकीतील भ्रष्टाचार थांबून स्वच्च वातावरणात व्यक्तिगत हेव्यादाव्यांच्या पलीकडे जाऊन उमेदवाराने निवडणुकीस सिद्ध होत विकासाचे राजकारण करावे हीच आम आदमीची अभिलाषा आहे.स्वातंत्र्याच्या प्रदीर्घ कला नंतरही सातत्याने जाणवणारा लोक शिक्षणाचा अभाव आज गंभीर समस्या बनला असतांनाच सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन प्रामाणिक,सच्च्या कार्यकर्ता, ध्येय्य्वादी व कर्तव्यनिष्ठ अश्या सुशिक्षित उमेदवाराची गरज महाराष्ट्रास आहे.आपल्या समस्या आपलीं कमजोरी नाहीत तर प्रेरणा व्हाव्यात या साठी नेता हवा आहे सकारात्मक दृष्टिकोनाचा.शिक्षणाचे बाजारीकरण आणि बेरोजगारी ची भीषण समस्या आज असतांनाच नव्या धोरणांच्या आखानिचीही आज गरज भासते आहे. विकास पासून दूर असलेल्या रियल आम आदमीस विकासाच्या मुख्य धारेत जोडत आपण सारे एक या भावनेतून काम कारणरा उमेदवार असावा हीच मनो कामना व्यक्त करूयात.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                      

   दैनिक पुण्यनगरी (दि. २६ सप्टे.२०१४-आपलं व्यासपीठ या सदरात प्रसिद्ध)                                                                                    

                                         

Thursday, 2 October 2014

युवा प्रेरक सुब्बाराव 

                                        युवा प्रेरक सुब्बाराव 



आदरणीय सुब्बरावाजी

     भारत महासत्तेच्या महामार्गाने प्रस्थान करण्याच्या संकल्पार्थ कटिबद्ध आहे तेथेच भावी भारताच्या नव निर्माणासाठी युवकांमध्ये प्रेरणा निर्मितीचा प्रयत्न करणारे डॉ.एस.एन.सुब्बाराव यांचे कार्य ही त्याच मार्गावर दीपस्तंभ ठरणारे आहे. युवक हाच राष्ट्र निर्माता आणि याच युवकांच्या सक्षम खांद्यावरच महासत्तेची धुरा असल्याचा विचार बरेचदा बोलून दाखवला जातो. मात्र जेव्हा राष्ट्र उभारणी साठी युवकांचे निर्माण या ध्येयाने प्रेरित होऊन सुब्बरावांसारखी एखादी हस्ती कार्य हाती घेते,तेव्हा या कार्याला प्राप्त होणारे चीरंतनाचे मुल्य भावी पिढीला मार्गदर्शन करणारे ठरते.                                                                                                डॉ.एस.एन.सुब्बाराव यांचा परिचय करून देण्याची मुळातच गरज नाही. य़ुवकांचे प्रेरणास्थान असणाऱ्या सुब्बारावजी यांना भाईजी म्हणून होणारे उस्फुर्त संबोधन म्हणजे  त्यांचे आपल्या प्रतीचे नाते उद्घृत करण्यास समर्थ नाहे. आपल्या सुसंस्कृत,सध्या व्यक्तित्वाच्या बळावर चक्क चंबळ च्या डाकूनाही अहिंसात्मक मार्गाची वाट धरायला लावणारा हा ८५ वर्षांचा युवा नेता युवकानाही मोहिनी घालतो आपल्या व्यक्तित्वाची, विचारांची .समाजातील सज्जन शक्ती जेव्हा विपरीत काळातही शांत बसते तेव्हा घडून येणारी हानी ही दुर्जनांच्या वितंडा पेक्षाही भयावह असते.याच विचारातून सुब्बरावांचे कार्य आज सक्षम व रचनात्मक कार्यासाठी विधायक मार्गाचा वापर करून लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निर्माणासाठी होत आहे.भाईजींचा जन्म मुळात कर्नाटक मधील ब्यांगलोर मधला,त्यांचे पूर्वज तमिळनाडूतील सालेम या गावातील म्हणूनच ७ फ़ेब्रु.१९२९मध्ये जन्मलेले सुब्बाराव यांचे नाव ठेवण्यात आले सालेम नान्जूदेय्या सुब्बाराव आपल्या कुटुंबातील संस्कार,तत्कालीन सामाजिक वातावरण,पेटलेले स्वातंत्र्याचे रणशिंग, महापुरुषांचा समाज मनावरील प्रभाव,माध्यमांची ठोस भूमिका आदी सर्वांचा परिणाम सुब्बाराव यांच्या बाल मनावर झाला असावा. त्यातूनच साकार झाले ते देशासाठी चळवळ कर्त्या सुब्बरावांचे क्रांतिकारक व्यक्तिमत्व.वयाच्या १० व्या वर्षी स्वतःच्या शाळेत जुलमी ब्रिटीश राजवटीच्या विरोधात केलेल्या बाल संघटने पासून ते १३व्या वर्षी भारत छोडो आंदोलनाला साथ देत शाळेतून निघून जाऊन गांधींच्या ब्रिटीश शिक्षण व्यवस्थेला त्यागण्याच्या आव्हानाला ओ देत केलेले पलायन त्यातच निदर्शनांमुळे झालेली अटक हाच मुळात रोमांचित करणारा अद्भुत कालखंड वाटतो.ज्या वयात आपण गोटया खेळलो त्याचा काळात सुब्बाराव देशासाठी जेलावाऱ्या करीत होते हेही एक नवलच म्हणावे लागेल.   

           त्या नंतरच्या काळातही सुब्बाराव यांनी आपले कार्य जोमाने सुरुच ठेवत गांधीवादाचे उपयोजन राष्ट्रीय समस्यांच्या निर्मुलनार्थ करण्याचे प्रयत्न केले.  अर्थात कोणतही विचार काळाचे अपत्य ठरावा.सुब्बाराव यांनी आपला वेध हा मुळात युवा निर्माण ते राष्ट्र विकास याच दिशेने ठेवला.सुरुवातीच्या काळात गांधी साहित्य संघाच्या छायेखाली आयोजीत कृती कार्यक्रम आणि राष्ट्रसेवा दल व विद्यार्थी कॉंग्रेस मधील सेवेने केलेला प्रारंभ नव्या कार्याचा पाया ठरावा. भारत स्वातंत्र्या नंतर मात्र जे स्वप्न आपली नेत्यांनी बघितले ते पूर्णत्वास गेले नाही ते दुदैव, मात्र या समस्या ग्रस्त भारता साठी यत्न करणे ही  गरजेचे होते ते आपल्या राष्ट्रीय युवा योजना या युवाचा चळवळीच्या माध्यमातून केले. युवकांचे सकारात्मक विधायक कार्यासाठी संघटन करीत देशाच्या कानाकोपऱ्यात आयोजित शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी अंतर भारतीय राष्ट्रीय एकात्म युवकांची नवी पिढीच निर्माण केली.  

    स्वातंत्र्यानंतर राजकीय लोकशाही भरतात अवतरली मात्र सामाजिक-आर्थिक लोकशाही पासून आजूनही दूर असलेला देश  विषमतेच्या  खाईतच उभा आहे. त्या दृष्टी ने यत्न करतांनाच सुब्बारावांचे लक्ष्य गुन्हेगार समजल्या गेलेल्या चंबळच्या प्रदेशाकडे वेधले गेले त्यातही गुन्हेगारीचा पेहेराव पांघरलेल्या माणसाने त्यांना आकृष्ट केले मदहो सिंग सिंग आणि उधम सिंग सारख्या १०० डाकुंना त्यांनी आत्मसमर्पण करवत राष्ट्राच्या मुख्य धारेत समाविष्ट केले. १९५४ मधील ही घटना आजही आपल्या साठी तेवढीच प्रेराणास्पद आहे. उपरोक्त तथाकथित गुन्हेगारांना त्यांनी मध्यप्रदेशातील गांधी सेवा आश्रमात आश्रय दिला आणि श्रमदान करीत आपले जीवन जगणारी आदर्श माणसे घडविण्याचा प्रयोग करत अनोखे उदाहरण समाजासमोर प्रस्थापित केले. १९७२ मध्ये ६५४ चंबळ खोऱ्यातील डाकू तर १९७४ मध्ये राजस्तानातील १२३ डाकुनीही सुब्बाराव यांच्या मार्गाचा अवलंब केला.

 

    

सुब्बारावजींनी आपले विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्या साठी त्यांनी अनेक पुस्तकांचेही लेखन केले.अपना सुख बिसार ज्या हे अलीकडील पुस्तक त्यांच्या महान कार्याची कहाणीच आहे.सुब्बाराव यांनी छोट्या खेड्यांपासून ते देश विदेशातील प्रवासाने युवकांना प्रेरित केले.अनेक नामांकित पुरस्कार प्राप्त सुब्बाराव मात्र या प्रवासातही फळांनी वाकलेल्या वृक्षांप्रमाणे नम्रच राहिलेत.१९९५ चा राष्ट्रीय युवा पुरस्कार भारत सरकार ने त्यांना प्रदान करून युवकांप्रती त्यांनी केलेल्या कार्यांची कृतज्ञताच जणू व्यक्त केली. १९९७  मध्ये त्यांना मानद डी.लिट ने सन्मानित केले गेले.सोबतच २००२ मध्ये विश्व मानवाधिकार प्रोत्साहन पुरस्कार ,२००३ मध्ये राष्ट्रीय संप्रदाय सद्भावना पुरस्कार (भारत सरकार) ,भारतीय एकता पुरस्कार,२००८ साली म.गांधी जीवन गौरव पुरस्कार या व अश्या किती तरी राष्ट्रीय अंतर राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित भाईजी आज वयाच्या ८५ व्या वर्षातही तारुण्याला लाजवेल अश्या उत्साहाने सतत कार्य मग्न असतात.                                                               काही दिवसांपूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्य आयोजित सोहळ्याचे औचित्य साधून भाईजी गुरुकुंज आश्रम मोझरी , ता. तिवसा, जी.अमरावती (महाराष्ट्र) या छोट्याश्या गावात आले होते.अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे गुरुजी यांनी प्रेमाने  करून दिलेला परिचय हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय असाच अनुभव होता. त्या वेळी त्यांच्याशी बोलण्याचे लाभलेले सौभाग्य अनेक दिवसांच्या संकल्पांची जणू सिद्धीच होती.अनेकदा याच ठिकाणी बाल वयात मी त्यांची ऎकलेलि भाषणे आणि भाईजींसोबत खेळलेले सामुहिक खेळ अजूनही स्मरणात होतेच मात्र प्रत्यक्ष भेट ही पहिलीच.त्या वेळी ते मला म्हणाले होते की,"बाळ,काळ बदलतो तशीच परिस्थितीही बदलत जाते महापुरुषांच्या  विचारांचे संदर्भ नव्या काळानुसार शोधत तुम्हालाच आता पुढे यावयाचे आहे... "अनेक भाषा अवगत असणाऱ्या भाईजींचे ते शब्द आजही मनात घर करून आहेत. खरच मोठी माणसेजी बोलतात त्याला चिरंतनाचं मुल्य असतं. त्यातही जे शब्द मुखातून बाहेर येतात ते कानापर्यंत पोहोचतात आणि जे हृदयातून येतात तेच ह्रुदय पर्यंत पोहोचतात. भाईजींचे ते शब्द आज हृदयात आहेत अनामोल अशी शिदोरी बनून. पुढे भाईजींच्या भाषणाची वेळ झाल्याने आम्ही सारे त्यांच्या सोबत कार्यक्रम स्थळी जायला निघालो.वाटेत उस्फुर्तपणे माझ्या खंद्या वर हात ठेऊन ते चालत राहिले. आजही तो हात मायेची उब देत आहे. त्यांच्या या परिस स्पर्शाने आई भेटल्याचा आनंद मला त्या वेळी झाला होता.                                                                                                             

आदरणीय सुब्बरावाजींच्या समवेत (गुरुकुंज आश्रम ,मोझरी )

सुब्बराव म्हणजे दोन स्थितींना जोडणारा दुवा ठरावेत एक अद्भुत नवा भारत आणि दोन आपला ऐतिहासिक वारस्याचा आदर्श.खरच भारतीय युवकांच्या हृदयाचे पोषण करणारे भाईजी  एक जिवंत विद्यापिठाच होत.