Tuesday 1 March 2022

सहजीवनारंभ प्रतिज्ञा 
24 नोव्हेंबर 2020

कुणाल - फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा आणि भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील मूल्यांच्या आधारावर, संविधान आणि उपस्थितांना साक्ष ठेऊन आम्ही एकमेकांचा जीवनसाथी म्हणून स्वीकार करत आहोत.

शुभांगी - स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांना आमच्या सहजीवनात महत्वाचे स्थान देत आम्ही आमच्या सर्व सुख - दुःखात एकत्र राहण्याचा प्रयत्न करू.  

कुणाल - संविधानाने म्हटल्याप्रमाणे व्यक्तीची प्रतिष्ठा मनात रुजवून आम्ही एकमेकांच्या विचारांचा नेहमीच आदर करू. एकमेकांना आधार देऊ.

शुभांगी - आम्ही पुरोगामी विचार, विवेकवाद आणि  संविधानातील मूल्ये स्वतःत,  कुटुंबात आणि समाजजीवनात रुजविण्याचा प्रयत्न करु.

कुणाल - आम्ही व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करुन एकमेकांवर कोणतेही अविवेकी बंधन लादणार नाही. कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात समतेने वागू. घरातील कामे स्त्रीची आणि बाहेरील कामे पुरुषाची असा भेदभाव न करता सर्व कामे सोबत करु. आजच्या समाजात स्त्रीचे स्थान दुय्यम असणे आम्ही नाकारत असून, जात, धर्म, वर्ण, वर्ग, लिंग ई. वर आधारीत सर्व भेद व विषमता आम्ही नाकारत आहोत. 

शुभांगी - सांविधानिक विचाराप्रमाणे दर्जा आणि संधीची समानता आम्ही आमच्या सहजीवनात रुजवण्याचा प्रयत्न करू. 

दोघे - सामाजिक मूल्यांच्या जपणूकीच्या प्रतिग्येसह आजपासून आम्ही एकमेकांचा जीवनसाथी म्हणून स्वीकार करीत आम्ही आमच्या सहजीवनास सुरुवात करत आहोत.

No comments:

Post a Comment