Tuesday 2 September 2014

 लाइफ इज ब्युटीफुल,कन्डीशन अप्लाय 

      लाइफ इज ब्युटीफुल,कॅन्डीशन अप्लाय                                                                                                                                                                                                                                                                                               जीव सृष्टी च्या  इतिहासात जणू युद्ध हा एक जीवनावश्यक भाग असावा इथ पर्यंत वारंवार घडत असतो,युद्ध नको शांती हवी हे समजून घ्यायला मात्र आनेक शतके आणि सहंसत्रके जावी लागलीत.समस्त मानव जातीच्या इतिहासात या युद्धानी आपला अमिट  ठसा उमटवला आहे. असेच अनेक कारणांतून निर्माण झालेले दुसरे महायुद्ध हे जागतिक मानवी इतिहासाला वळण देणारे ठरले. ज्वलंत आणि जिवंत वंशवादी आणि हुकुमशाही मानसिकतेने पिळीत झालेल्या काळाचाच तो परिणाम होता. नाझी आणि फासीवादी राजकारणाने जागतिक मानस पटलावर खळबळ माजवली होती.हिटलर,मुसलोनी सारख्या धूर्त शासकांनी आत्त्यान्तिक  राष्ट्रवादाच्या प्रयोगाने आहाकार निर्माण केला होता.ज्यू हेच आजच्या विपरीतास जबाबदार आहेत हा ग्रह करून देत सत्तेवर आलेला हिटलर आज ज्यूंच्या आत्म शुद्धीच्या नावा खाली "लक्ष छावणी" च्या माध्यमातून त्यांचीच कत्तल करत होता . लोकशाही विरुद्ध हुकुमशाही असा रंग या युद्धास देण्यात आला होता मात्र हा होता तो मुळी  सत्ता संघर्ष.

 या  विषयावर अनेक अशा प्रकारचे साहित्य आणि इतिहास लेखन केल्या गेले मात्र ज्या अभीव्यक्तीने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला तो म्हणजे १९९७ साली निर्माण झालेल्या एका हृदय स्पर्शी चित्रपटणे . life is beutiful नावाचा या चित्रपटा चे दिग्दर्शन केले आहे ते रोबर्तो बेन्जीनी यांनी.उत्तम कथानक,इतिहासाची पार्श्वभूमी, हृदय स्पर्शी संवाद, सुरेख दिग्दर्शन,संपादन लाभलेला हा चित्रपट मानवी भाव भावनांची अभिव्यक्ती ठरावा. चित्रपटाचे कथानक हे मुळात एका परिवार भोवती फिरत राहणारे आहे. ग्युडो हा एक स्वछन्दी  माणूस आपल्या एका मित्र सोबत इटली मध्ये फिरत असतो. फेल झालेले ब्रेक आणि त्या मुळे  मिळालेले अनौपचारिक स्वागत हे मोठ्या गमतीदार रीतीने साकारले आहे. १९३९ मध्ये या चित्रपटाची झालेले सुरुवात हि महायुद्धाच्या समाप्तीने संपन्न होते.ग्युडोला प्रवासात झालेली प्रीयसीची भेट हा तर आक विषय ठरावा.दोराचे प्रेम मिळवण्या साठी ग्युदोने उपसलेले कष्ट त्यातून निर्माण झालेला मार्मिक विनोद हा चित्रपटाचा गाभा आहे.पुढे ग्युडो रोजगारासाठी पुस्तकाचा व्यवसाय सुरु करण्या साठी सरकारी कार्यालयाच्या वाऱ्या  घालतो पण तेथे त्याला केवळ सरकारच्या मागृरीलाच सामोरे जावे लगते,मात्र तेथेही आपल्या विनोदाने ग्युडो व्यवस्थेवर मार्मिक असे व्यंग करातो .

         
ग्युडो पुढे हॉटेल मध्ये वेटर चे काम पत्करतो तेथे ही तो आपल्या हजार जवाबी शायली ने रसिकांना खिळून ठेवतो.शाळा तपासणी आणि ग्युडोचे डोरा साठी केलेले नाटक,ओपेरा मधील प्रसंग,ओपेरा नंतर झालेली डोरा ची भेट दिग्दर्शकाने मोठ्या समर्थ पणे मांडली  आहे. ज्या हॉटेल मध्ये ग्युडो कामाला असतो तेथेच डोरा चे लग्न नियोजित असते मात्र या वेळी डोरा ग्युडोला पळून न्यायला सांगते आणि अश्या प्रकारे उभयतांचे मिलन होत नवे  सृजन जन्मास येते ते जोशिवाच्या रूपांने या  प्रसंगी दिग्दर्शकाने मांडणीचा अद्द्भूत नमुना पेश केला आहे. जोसिवा आपल्या बाल सुलभ अभिनयाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतो. "ज्यू  आणि कुत्र्यांना प्रवेश बंद " अशी पाटी  वाचाल्यानानातर छोटा जोशीवा त्या बाबत ग्युडो ला  विचारतो,तेव्हा "ज्याला जे आवडत नाही ते तो नाकारतो" आशी समजूत काढत "तुला कोण नाही  आवडत?" या प्रश्नाचे उत्तर छोटा जोशीवा"कोक्रोच" असे देतो, तर ग्युडो मला "वाईट लोक" आवडत नसल्याचे सांगतो . हा संवाद म्हणजे जोशिवाच्या निरागस मनावर होणारे संस्कार कश्या प्रकार चे व्हावेत याची काळजी घेणाऱ्या बापाचे चित्रण रेखाटणारा आहे.
        पुढे युद्ध काळात मात्र अनेक ज्यू परिवार सोबत ग्युडोचीही जोशीवा सोबत उचलबांगडी केली जते.त्या वेळी डोरा आपल्या अद्भुत प्रेमचा  आदर्श प्रस्तुत करत लष्करी अधिकार्याच्या मनाईला न जुमंतही कॅम्प मध्ये जाणार्या ट्रेन मध्ये जाऊन बसते . झालेली माणसांची  तुटवणूक  प्रेमाची  विन मात्र अधिकच घट्ट करते या वेळी जोशीवा चा बाप म्हणून पार पाडलेली भूमिका प्रत्त्येकाच्या लक्षात राहणारी अशीच आहे. छावणी मधील हाल अपेष्ट , दुक्ख, यातना ,मरण, ग्यास चेम्बर यांचा कशाचाही बोध तो जोशीवाला होऊ देत नाही . विनोद आणि दुक्ख यांचे मिश्रण म्हणजेच का जीवन हा प्रश्न जन मांणसाला  आल्या वांचून राहत नाही.पण मधे एका ओळखीच्या डॉक्टरांच्या मध्यमातुन मुक्त होण्याचा मार्ग ग्युडो ला मिळतो पण तेथेही त्याचा वापराच करून घेण्याची मानसिकता दिसून येते. मात्र युद्धाच्या समाप्तीचा धामधूमित ग्युडो पळून जाण्याचा प्रयत्न करतो पण डोरा च्या प्रेम पोटी तिला शोधत असत्तानाच तो पकडल्या जातो आणि एका सामान्य कुटुंब वत्सल मानसाचा  व्यवस्थेकडून खून करवला जातो. हा केवळ एक खेळ  आहे हे ग्युडो जोशिवाला बोलला असतो आणि त्याचे बक्षीस म्हणजे रांनगाडा हेही त्याने सांगितले असते . युद्ध च्या समाप्ती नंतर सामसूम झालेल्या  छावणी मध्ये रस्त्यावर जोशीवा एकटाच उभा राहतो पण त्या वेळ पर्यंत ब्रिटीश सेना येउन पोहोचली असते.सेनेचा  प्रचंड मोठा रानगाडा  बघून आपण खेळ जिंकल्याची भावना जोशिवाच्या मनात निर्माण होतो. पुढे त्याला त्याची आई हि वाटेत मिळते.  
                                                                                                                                                                 अशा प्रकारे एक चित्रपट तर समाप्त होतो पण प्रेक्षकांना पुढे प्रश्न मांडूनच . la vita e vell हे इटालियन नामाभिधान असलेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांना साद घालतो आहे आणि मानवते समोरील प्रश्नांना वाचा फोडतो आहे. १९९७ पासून ते आज तागायत या चित्रपटा ने अनेक मान सन्मान पटकावले आहेत. त्यात ऑस्कर सोबतच,७१वा  अकादमी पुरस्कार ,बेस्ट द्रमातिक,बेस्ट विदेशी भाषा पुरस्कार आदी सह अनेकांचा समावेश आहे. रोबारतो बेन्जीनी यांनी साकारलेले ग्युडोचे व्यक्ती चित्रण तर अद्भुत आहेच शिवाय डोरा चे काम निकोलात्ता ब्रांची यांनी अप्रतिम साकारले आहे. गिओर्जिओ कातरणी या बाल कलाकाराने साकारलेला जोशीवा चा अभिनय हि काळजाचा ठोका चुकवणारा आहे. शोकात्मक विनोद हा या चित्रपटाचा प्रकार आहे मात्र जीवनाची सर्थाकताच जणू यातून उद्दघ्रूत होत्ताना दिसून येते. जीवन खरच खूप सुंगर आहे पण त्याची किमत ज्याची त्यालाच चुकवावी लागते ,ती ग्युडो ने चुकवली आणि जीवनाची लढाई त्याने जिंकली. आत्ता कदाचित वेळ आपली आहे.खरच लाइफ इज ब्युटीफुल,कॅन्डीशन अप्लाय म्हणतात ते यालाच.      

No comments:

Post a Comment