Saturday, 27 February 2016

गावरुढींच्या बळी

पुण्यातच महिलांच्या मंदिर प्रवेशास नकार
महाराष्ट्रात सर्वाधिक महिला गुणोत्तर असलेल्या वरदाडे गावाची गोष्ट

  
          ज्या पुण्यापासून आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्याच पुण्यापासून केवळ 3२ किमी लांब असलेल्या पानशेत रस्त्यावरील वरदाडे गावात मात्र आजही महिलांनाच मंदिर प्रवेश नाही. मुळात गावातील सरपंच, ग्रामसचिव, तलाठी, मुख्याध्यापक अशी सर्व पदे समर्थपणे महिलाच भूषवत असतांना त्यांनाच मात्र मंदिर प्रवेशापासून वंचित ठेवण्यात आले आहे. 

मंदिर व् ग्रामपंचायत एकाच प्रांगणात : महिलांना मात्र प्रवेश नाही 



     टुमदार ग्रामपंचायत असलेल्या वरदाडे गावच्या वंदना शेडे या महिला सरपंच आहेत. दुर्दैवाने मात्र ग्रामपंचायतीतच त्यांना मुख्यदाराने प्रवेश करता येत नाही. आश्चर्य वाटेल पण याचे कारण म्हणजे त्या महिला आहेत हे आहे. मुळात ग्रामपंचायत आणि ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर या दोन्ही वास्तू एकाच ठिकाणी आहेत. अर्थातच महिलांना मादिरातच प्रवेश नसल्याने ग्रामपंचायातमधेही खुद्द सरपंचांनाच मुख्यद्वारातून प्रवेश घेण्यास बंदी आहे. गावरूढी नुसार भैरवनाथ हे वरदाडेचे ग्रामदैवत.या देवाला ‘बाई – बांगडी, हात – बोट’ चालत नसल्याची माहिती गावकरी देतात.


    काही वर्षांपूर्वी देवाला असेच ‘न्हात्या – धुत्या’ बाईचे ‘हातबोट’ लागले आणि त्याचा परिणाम म्हणूनच गाववार अरिष्ट आल्याचे  भोळे गावकरी सांगतात. कुण्या एका भगताकडून या सर्व कारणामुळे देव कोपला आणि गाव सोडून डोंगरात जाऊन बसल्याची माहितीही गावकना मिळाली होती. सुमारे १० ते १२ वर्ष देवाचा हा कोप गावावर असल्याचे बोलले जाते.अर्थातच याबद्दल दोषी धरले गेले ते गावातल्या स्त्रियांनाच. मग होती नव्हती ती देवदर्शनाची स्त्रियांची संधीही काढून टाकण्यात आली. देवाच्या उत्सवात आणि रंगपंचमीला भरणाऱ्या यात्रेत देवाची पालखी निघते यावेळी देव आपली बहिण कळंबजाई देवीच्या भेटीला जातो त्याच वेळी काय ते महिलांना देवदर्शनाची संधी मिळते.
याच खिडकीतून महिला दर्शन घेऊ शकतात 

  वर्षभर मात्र महिलांना मंदिरात प्रवेश नाकारला जातो. मंदिराच्या म्हणजेच ग्रामपंचायतच्या भिंतीला मात्र महिलांसाठी तेवढी एक छोटी खिडकी ठेवली गेली आहे. अगदी काही दिवसांपर्यंत महिलांना मंदिर प्रवेश नसल्याची पाटीही मंदिराच्या दाराशी लावण्यात आली होती मात्र मंदिराचे रंगकाम करतांना ती पुसण्यात आली मात्र लवकरच ही पाटी लावण्यात येणार असल्याची माहिती गावक-यांनी दिली.





ओसाडजाई देवी  
     
      याच वर्दाडे गावापासून २ किमी लांब असलेल्या ओसोडजाई देवीच्या मंदिराचीही हीच कथा आहे. चक्क आदिशक्ती पार्वतीच स्त्री रूप असलेल्या या देवीच्या मंदिरात तर महिलांनी प्रवेशाच करू नये अशी पाटीच गावकरी आणि विश्वस्थांनी गाभाऱ्याच्या दाराशी लावली आहे. अर्थातच या मंदिराचे सर्व नित्यविधी करण्याची जबाबदारीही पुरूषांकडेच आहे. यात देवीच्या स्नानापासून ते नैविद्द्या पर्यंतचे सर्व विधी पुरूषाच करतात. देवी स्त्रीरूप असूनही महिलांनाच मंदिर प्रवेश नसणे हीच मुळात दुर्दैवाची बाब म्हटली पाहिजे. 






वरदाडे : पुण्यापासून ३२ किमी दूर 
      निसर्गाच्या कुशीत वसलेले २४५ कुटुंबाच्या वर्दाडे गावाची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ११८३ एवढी आहे. त्यात ५८४ महिला तर ५९९ पुरुषांचा समावेश होते. संख्यात्मक माहितीचा आधार घेतल्यास अवघ्या महाराष्ट्रातील कोणत्याही गावपेक्षा स्त्री – पुरुष संख्येचे हे प्रमाण दर हजार पुरुषांमागे ९७५ एवढे आहे. निश्चितच ही बाब आपल्या सर्वांसाठीच आशादायक म्हटली पाहिजे. मात्र असे असतांनाही याच गावातील स्त्री पुरुषांना समान संधी उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. शासनाच्या योजनांचा अपरिहार्य परिणाम म्हणून की काय पण गावगाड्याच्या अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणारी वर्दाडे गावाची स्त्री मात्र आजही गावरुढीतच अडकून पडली.


       आजच्या आधुनिक काळात महिला गावाची सरपंचच काय तर देशाची पंतप्रधान आणि राष्ट्रपतीही होऊ शकते. कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स बनून अंतराळात जाऊ शकते मात्र हीच स्त्री गावाच्या मंदिरात जावू शकत नाही. आपल्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी निश्चितच ही दुर्दैवाची बाब म्हटली पाहिजे.


मतमतांतरे


 
तृप्ती देसाई
(अध्यक्ष,भूमाता ब्रिगेड) 
     "आजच्या समाजाला महिलांचे नेतृत्व चालते पण त्याच महिलांनी मंदिरात प्रवेश केलेला मात्र चालत नाही. स्त्रियांना दुय्यम वागणूक देण्याचाच हा प्रकार आहे. आज स्त्रिया जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत एवढेच नव्हे तर यात त्यांनी नवे आदर्शही स्थापन केले आहे. मात्र स्त्री पुरुष समानता निर्माण झाली असे नाही. दुर्दैवाने आजही महिलांना मंदिर प्रवेश नाकारल्या जातो. सर्व क्षेत्रात महिला चालतात तर मंदिरात का नाही ? कोणत्याही मंदिरात स्त्रियांना प्रवेश मिळालाच पाहिजे. मंदिर प्रवेश महिलांचा मुलभूत अधिकार असून समाजाने हा लिंग भेद पाळता कामा नये. अन्यथा हा भारतीय राज्य घटनेचाच अपमान असेल. महिलांना सर्व मंदिरांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी राज्यभरात प्रबोधन परिषडेचे आयोजन आम्ही करणार असून त्यात ‘मुख्यमंत्री जागे व्हा, महिलांसाठी आता तरी निर्णय घ्या’ अशी भूमिका घेणार आहोत."    



     

 
छबन जोरकर
(ओसाडजाई मंदिराचे पुजारी) 
      "ओसाडजाई देवीच्या मंदिराचे आम्ही गेल्या तीन पिढ्यांपासूनचे पुजारी आहोत. ही देवी पार्वती मातेचे रूप आहे. चैत्र पौर्णिमा आणि नवरात्रात देवीचा उत्सव असतो त्यावेळी गावात तमाशा आणि कुस्तीचे फड लावले जातात. देवीला ‘विटाळ – चांडाळ’ चालत नाही. म्हणूनच महीलांना गाभाऱ्यात येण्यास बंदी आहे. आपल्या पूर्वजांनी लावून दिलेली परंपरा आपण                                         पाळलीच पाहिजे."



   
बाळू शेडे (गावकरी)
    "भैरव मंदिर हे आमचे ग्राम दैवत आहे. आमच्या देवाला ‘न्हाती – धुती’ बाई चालत नाही. म्हणूनच महीलांना मंदिरात प्रवेश नसतो. देवाच्या दर्शनासाठी महिलांसाठी बाहेरच्या भिंतीला एक छोटी खिडकी ठेवली आहे. त्यातूनच त्यांनी दर्शन घ्यायचे हीच गावाची रीत आहे."




सुलाबाई भालेराव (गावकरी)
      "देवी असली तरीही स्त्रीचेच एक रूप आहे. देवीला सारे सारखेच असतात. ओसाडजाई देवीच्या मंदिरात महिलाआजही जावू शकत नाही. याच्यावर विचार करण्याची गरज आहे. देवासाठी नसला तरीही माणुसकीसाठी महिलांना मंदिर प्रवेश मिळालाच पाहिजे." 








---------------------------------------

दि.२७ फेब्रुवारीच्या नवभारत ग्रुपच्या 'दैनिक नवराष्ट्र' मधील 'पुणे प्लस'च्या  पहिल्या पानावर प्रकाशित झालेली माझी ही
'न्यूज स्टोरी' 




 
copyright_kunalramteke_feb.2016

Sunday, 21 February 2016

सुटणार कधी बिडीचा तिढा ?



         भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकांस रोजगाराचा अधिकार दिला आहे. या संविधानाची अमलबजावणी करणे सरकारचे दायित्व असते. मात्र याच कर्तव्यापासून सरकार दूर जात असेल तर मात्र संघर्ष अटळ असतो. असाच संघर्ष निर्माण झाल आहे तो बिडी कामगारांच्या रोजगारावर आलेल्या संकटातून.
       काही दिवसांपूर्वी आपल्या सरकारने एक निर्णय घोषित केला. बिडी आरोग्यासाठी घातक असते ‘हे माहिती व्हावे’ म्हणून बिडीच्या पाकिटावर ८५ टक्के जागेत धोक्याचा इशारा लिहावा व त्यावर तसे चित्र छापावे. उर्वरित २५ टक्के भागात बिडीची जाहिरात असावी. याचा परिणाम मात्र नेमका उलटा झाला. या निर्णयाच्या विरोधात बिडी कारखानदारांनी कारखाने बंद ठेवले आणि त्याचा आपसूकच परिणाम कामगारांवर झाला.
        पुण्यासारख्या विद्द्यानगरीतही त्याचे जोरदार पडसाद उमटले. दि. १५ फेब्रुवारी २०१६ पासून हे कारखाने बंद आहेत. त्यामुळे लाखो कामगारांचा रोजगार बंद आहे. रोजगारावर निर्माण झालेले हे संकट आणि भविष्याचीच नव्हे तर रोजच्या भाकारीचीही निर्माण झालेली अशास्वतता याच्या कात्रीत कामगार सापडला आहे. पुण्यातल्या साबळे – वाघिरे, ठाकूर - सावदेकर, केंची, सावळाराम बिडी यांसह इतरही काही कारखाने बंद आहेत. यावर अवलंबून असलेल्या बिडी कामगारांची संख्या जवळपास ६००० हजार असून अर्थातच या सर्व प्रकरणाचा फटका निर्दोष कामगारांना बसला आहे. मुळातच अल्प रोजगारावर काम करीत असलेल्या या कामगारांसाठी हा प्रसंग म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असाच आहे.
     
         सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम म्हणून पारंपारिक कुटीर उद्योग स्वरूपात चालणार बिडी उद्योग बंद होणार असल्याचे चित्र निर्माण होत असल्याणे कामगार वर्गात चिंतेचे वातावरण आहे. अश्या काळात सरकारनेच मध्यस्ती करून कामगारांना पर्यायी रोजगार देण्यासाठी भूमिका बजावणे गरजेचे आहे. मुळातच या कामगारांचे वेतन किती ? असा प्रश्न एखाद्या सुज्ञ माणसाने विचारला तर सरकार या बाबत काय करत आहे ? असा प्रश्न निर्माण होईल. एक हजार बिड्यांमागे केवळ ७० रुपये बिडी कामगारांना मिळतात. हिशेब काढला तर या कामगारांच्या नशिबी किमान वेतनही येत नसल्याचे दिसेल. आजच्या किमान वेतन कायद्यानुसार दररोज कमीत कमी १७५ रुपये रोजगार हा कामगारांचा अधिकार आहे. मात्र सातवा वेतन आयोग लागू होण्याची चिन्हे दिसत असतानाच मात्र १९४८ सालच्याही किमान वेतन कायद्यानुसार कामगारांना ८०.९५ रुपये मिळण्याच्या धेय्या पर्यंतही आपली व्यवस्था दुर्दैवाने पोहचू शकली नाही, हे दुर्दैवाने नमूद करावे लागते. शासनाच्या बीडी दर धोरणाचा विचार केल्यास आपल्या निदर्शनास येईल की, १९७६ साली बिडीचा दर ४.७२ पैसे होता तर १९९७ मध्ये हाच दर प्रती हजार बिडी मागे ३२ रुपये झाला. पुढे २००२ सालात ५२.५० पैसे दर शासनाने निर्धारित केले. या सर्व प्रकरणाची पूर्व पीठिका बघता १९६६ मधे बीडी कामगार कायदा अस्तित्वात आला त्यानंतर १९८६ मधे लागू करण्यात आलेला बीड़ी-सिगार कायद्याने कामगारांना किमान वेतन, प्रॉव्हिडंट फंड, बोनस अश्या सुविधा लागू करण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र इतक्या वर्षानंतरही या कायद्याचे उपयोजन चांगल्या प्रकार हो शकले नाही. याचाच परिणाम म्हणून मोठ्या संखेत असलेला हा कामगार वर्ग मात्र या सर्व अधिकारांपासून वंचितच असल्याचे निदर्शनास येईल. आज बिडी कामगारांच्या रोजगाराचे संरक्षण करण्यासाठी तातडीने पावले उचलणे काळाची गरज आहे. बिडी आणि बिडीकामगार यांच्यासाठी योग्य ते धोरण ठरवून त्याची अमला बजावणी करणे महत्वाचे ठरते.    
        बिडी, सिगारेटच काय तर सर्वच व्यसने मानवी आरोग्यासाठी घातक ठरतात. व्यसनांचे कोणत्याही प्रकारचे समर्थन कोणताही सुज्ञ माणूस करणार नाही. व्यसनमुक्ती साठी जनसमुदायाचे प्रबोधन करणे काळाची गरज आहे. व्यसंनामुळे सामाजिक हानी होत असते. त्यासाठी प्रबोधनाचा रास्त मार्ग अवलंबणे महत्वाचे ठरते. मात सरसकट सारासार विचार न करता अनाठाई कृती करणे याने व्यसनमुक्ती होणे तर दूरच मात्र त्याचे विपरीत सामाजिक परिणाम होतील हे मात्र नक्की. मात्र कोणत्याही कारणांमुळे का असेना पण गरीब माणसाच्या भाकरीच्या समर्थनात आपण सारेच असू हे निश्चित. सर्व प्रकारच्या व्यसनांचा निषेध करीत सर्वसामान्य नागरिक व कामगारांच्या पर्यायी रोजगारासाठी सरकारने जबाबदार असणे गरजेचे आहे. 

      ‘अच्छे दिन आनेवाले है’ असे म्हणणाऱ्या आपल्या सरकारने आता बिडी कामगारांच्या नशिबात अच्छे दिन आणण्यासाठी प्रयत्न करावे. 





बीडी कामगारांच्या प्रश्नावर 
मान्यवरांचे अभिप्राय -


"देशभरात बिडी कामगारांची संख्या एक कोटी पेक्षा जास्त असून सरकारच्या चुकीच्या निर्णयांचा विपरीत थेट परिणाम त्यांच्या रोजगारावर होतो. देशातील बहुसंख्य राज्यात बिडी कामगार आहेत. कोणतेही व्यसन आरोग्यासाठी घातकच आहे पण त्याबाबत आधी लोकशिक्षण केले जाणे महत्वाचे आहे. बिडी कामगारांचा प्रश्न सरकारी धोरनांमुळे गंभीर बनला आहे. सरकार ‘मेक इन इंडिया’ सारख्या योजनांची घोषणा करीत असतांनाच देशी उद्याग बंद करण्याचे धोरण राबवीत आहे. बिडी कामगारांना मिळणारे रोजचे किमान वेतन २१० रुपये आहे मात्र त्याची अमलबजावणी आजही होत नाही. सरकारचे धोरण बिडी कामगार विरोधी आहे. मात्र असे असेल तर  कामगारांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून देणेही सरकारचेच काम आहे."


-अडाम मास्तर 
जेष्ठ बीडी कामगार नेते   





"पुण्यातील बिडी कारखानदारांनी सरकारच्या धोरणांच्या निषेध करण्यासाठी काराखाने बंद ठेवले होते. अशा संपांचा विपरीत परिणाम कामगारांच्या रोजगारावर होतो. पुण्यात झालेल्या बंद काळात कामगारांचे जे आर्थिक नुकसान झाले त्याची भरपाई केली जावी अशी मागणी आम्ही सरकार कडे करीत आहोत. बिडी कामगारांच्या प्रश्नाबाबत येत्या १६ मार्चला विधानसभेवर २५००० बिडी कामगारांचा भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय आमच्या संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यात किमान वेतन कायद्याची प्रभावी अमलबजावणी करण्यात यावी ही मागणी प्रामुख्याने मांडण्यात येईल." 
-वसंत पवार 
सचिव 
लालबावटा बिडी कामगार युनियन, पुणे
=================================

दि. १ मार्च २०१६ च्या 
'दैनिक नवराष्ट्र' पुणे मधे प्रकाशित झालेली माझी ही 
बाय लाईन लिड न्यूज स्टोरी 





copyright_kunalramteke_feb.2016 

Friday, 23 October 2015

K.M.R. THEORY AND MODEL OF COMMUNICATION



'FORM THOUGHTS TO THOUGHTS'






 


















COPYRIGHT-KUNLA RAMTEKE OCT.2015

Wednesday, 5 August 2015

मजूराची विकास वारी

मजूराची विकास वारी

`            
विशाल मोहेकर 
           नूकतेच छात्रसंघ सचिवांच्या निवडनुकींचे वारे आमच्या छोट्याशा महाविद्यालयात वाहायला लागले होते.त्यातच आपलाही एक प्रतिनिधी असावा म्हणूण आमच्या मित्रांनी एक नाव मोठ्या उत्साहने पुढे आणलं.कोणत्याही कामात पुढे असनारं,प्रसंगी मदतीला धावनारं, ते नाव म्हणजे विशाल साहेबराव मोहेकर. महाविद्यालयात होतकरु,कष्टाळु अन प्रामाणीक विद्यार्थी म्हणून त्यांची ओळ्ख होती.म्हणुन मग हेच नाव छात्रसंघ सचिव पदाच्या योग्य वाटणं यात काही गैर नव्हतच मूळी.पण व्यक्तिशः मात्र माझा त्यांच्या निवडनूक लढवण्यालाच विरोध होता आणि त्या बाबत स्पष्टपणे मी बोललोही.पण मित्रांचा आग्रह दादा अव्हेरु शकले नाहीत.आणि या निवडनूकीला सामोरे जाण्याचा निर्णय त्यानी घेतला.एक सांस्क्रूतिक प्रतिनिधी म्हनुन त्यांनी निवडनुक लढवली.त्यांच्या प्रेमामुळे मलाही निवडणुकीच्या त्या धामधूमीतून वेगळे रहता आले नाही.शेवटी निवडणुकीचा दिवस उजाळला.आपलीच जागा पक्की आहे हा आत्मविश्वास आमच्या ह्रूदयात धळ्धळत असतांनाच निवड्नुक प्रक्रिया सुरु झाली.पुढे काही काळानंतर निकाल लागला.पण आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर  पसरलेल्या स्मित हास्याने दुःखाची जागा घेतली.'विशाल मोहेकर एका मताने परभुत' अशी ती बातमी ऐकूण खाडकण एक क्षण डोळ्यात अश्रू तराळ्ले.अन त्याच वेळी विशालदादा,राहूल उके आणि मी तिघे जायला निघालो.आम्हा पैकी कुणालाच शब्द फुटत नव्हते.शेवटी विशाल दादाच बोलले, "अश्या छोट्या-मोठ्या गोष्टी सुरुच असतात, त्यात येवढं मनाला लावून घ्यायचं नसतं” त्यांचे ते शब्द आजही आठवता.मात्र दुसऱ्याच दिवशी त्याच पूर्वीच्या उत्साहाने ते कामाला लागले.त्या वर्षी निवडनुक कोण जिंकलं ते आज नाही आठवत आणि महविद्यालयात असतानाही ते नाव फारसं पूढ आलच नाही तो भाग वेगळा.पण त्या वेळी त्याचं महत्व खुप मोठ होतं.आमचा एक मतदार दबावाला बळी पडला,त्यातुन हे सारं घडलं होतं.मात्र त्यावेळी समजलेलं एका मताचं मूल्य आजही चांगलच लक्षात आहे.

         

चंद्रकांत वानखेड़े यांच्या समवेत विशालदादा आणि मी. 

      विशाल साहेबराव मोहेकर या नावाचा माझा परिचय झाला तो २०१० मध्ये 'स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक' या स्पर्धेच्या निमित्ताने.आणि या मैत्रीच रुपांतर घनिष्ट मैत्रीत केव्हा झाल ते मात्र आमच आम्हालाही कळल नाही.पुढे संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही वादविवाद-वक्तृत्व स्पर्धांच्या निमित्तनं फिरलो,सोबत कार्यक्रम केले,भाषणं दिलीत,लेख लिहिलीत,चांगली पुस्तकं,नियतकलिकं वाचत अनेक विषयांवर गप्पा मारल्या.आज ते सारं कसं  काल घडल्यासारखं वाटतं.पुढे मी पुणे विद्यापीठात प्रवेश घेतला आणि त्याच वेळी विशाल दादा अमरावती विद्यापीठातून मराठी साहित्य घेऊन एम.ए. करत होते.मात्र याच काळात त्यांच्यातला कार्यकर्ता घेत होता शोध समाज कार्याच्या संधीची.पडेल ते काम करीत स्वतःला सावरतच इतरांना सावरणारी माणसं तशी दुर्मिळच पण याच परंपरेत मोडणारं ते नाव होतं.


     याच काळात  दादांचा परिचय अश्याच एका प्रेरणादायक व्यक्तिमत्वाशी झाला.अमरावती जिल्ह्यातील अतिदुर्गम अश्या मेळघाट या भागात कोणत्याही प्रसिद्धी पासून दूर राहत अव्याहत काम करणारं ते व्यक्तिमत्व म्हणजे मा.प्रमोद थोरात हे होत. एका धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने विशाल दादा आणि प्रमोद सरांची भेट झाली आणि याच एका प्रसंगाने दादांच्या जीवाणाला कलाटणी मिळाली.प्रमोद थोरात मुळातच एक साधं व्यक्तिमत्व.अत्यंत गरीब परीस्थितीतून येऊन,आपलं शिक्षण पूर्ण करीतच समाज सेवेचा ध्यास घेऊन आदिवासींच्या सुखदुखांशी समरस होत आपल्या 'ह्युमन डेव्हलपमेंट सोसायटी ऑफ इंडिया'या संस्थेच्या माध्यमातून रचनात्मक आणि विधायक कार्याची सुरुवात त्यांनी केली होती.विशालदादांच्या या व्याक्तीत्वासोबत झालेला परिचय मुळातच नवी सुरुवात होती.सरांशी झालेल्या दीर्घ चर्चा,त्यांच्या भोवती असलेला प्रचंड कामांचा डोंगर आणि आदिवासी बांधवांबद्दलची त्यांची असलेली बांधिलकी बघून दादा प्रेरित झाले आणि त्यातूनच नव्या कार्याची दिशाच जणू त्यांना गवसली. 
        याच वेळी 'फिल्डवर्क' सोबतच विविध अभ्यास दौरे,कार्यक्रम आणि परिषदांसाठी राज्यभर फिरण्याचाही अनुभव त्यांना गाठीशी बांधता आला. मागील तीन वर्ष सोसयटीच्या अंतर्गत 'व्हिजन मेळघाट' हेच धेय्य ठेऊन दादा काम करत राहिले यात प्रमोद थोरातांचे लाभलेले मार्गदर्शन आणि प्रेरणा महत्वाची ठरली.मेळघाटच्या दुर्गम भागात इतर रचनात्मक कार्यासोबतच इंग्रजी शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार कार्य जोमाने पुढे नेण्याची आवश्यकता प्रमोदजींना जाणवत होती. त्यातूनच पुढे आदिवासी समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होता येणार होतं. याच कामात विशाल दादा हिरारीने पुढे झाले. आणि शिक्षण हक्कांच्या अमलबजावणी संदर्भात प्रमोदजींच्या वेगळ्या प्रयोगात कार्यरत राहिले. याचा सोबत रोजगार,बचत गट आणि त्याचे संघटन,ग्रामीण विकास,स्वच्छता,पाणी पुरवठा,अंधश्रद्धा निर्मुलन,आरोग्य आदी क्षेत्रात कामाचा अनुभव घेतच आदिवासी संस्कृती आणि कलांचा अभ्यासही दादांनी केला. सुमारे तीन वर्ष प्रमोदाजींच्या मार्गदर्शनात विकासाच्या या चळवळीचा एक वारकरी म्हणून ते काम करत होते.
       
     
         याच सुमारास फिलिपिन्स मधील मनिला या राजधानीच्या शहरात आशिया खंडात आपला वेगळा ठसा उमटवलेली,अत्यंत प्रतिष्टीत अश्या 'आशियन सोशल इन्स्टीटयुट' या समाज शिक्षण संस्थेत चालवला जाणारा 'समुदाय विकास या विषयातील आंतरराष्ट्रीय पदविका' या अभ्यासक्रमात 'ह्युमन डेव्हलपमेंट सोसायटी ऑफ इंडिया'च्या माध्यमातून सहभागी होण्याची संधी दादांना मिळाली.अत्यंत हलाकीच्या परिस्थितीतून येऊनही एका ग्रामीण तरुणाची ही निवड आंतरराष्ट्रीय स्थराच्या अभ्यासक्रमासाठी होणे हीच मुळात खऱ्या अर्थाने एक 'अचिव्हमेंट' होती. कौतुकाची थाप समाजाकडून पडत असतांनाच अंतर्मुख होऊन काम करण्याचा संदेश मात्र प्रमोदजींनी त्यांना त्या वेळी दिला होता.निश्चितच ही निवड म्हणजे मेळघाट च्या दुर्गम भागात केलेल्या परिश्रमांचीच जणू फलश्रुती होती.हा सारा प्रवास मुळातच सोपा नव्हता. घरची गरिबी,सर्वांगीण आभाव, त्यातच मिळालेली शिक्षणाची संधी आणि महापुरुषांचे विचार सोबत घेऊन केलेला हा प्रवास रोमांचित करणारा आहे.
           
      अमरावती जिल्ह्यातील जसापूर सारख्या अवघ्या हजार दीड हजार लोकसंख्या असलेल्या गावात १ फेब्रुवारी १९८८ रोजी जन्मलेल्या दादांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबी आणि हलाखीची.कोरडवाहू का असेना पण शेती नावाची साधी 'पट्टी'ही हाती धरायला नव्हती. मोडके घर आणि हातमजुरी एवढीच काय ती वाडवडिलांची संपत्ती. याच भांडवलावर 'जिंदगीचा' प्रवास होणार होता. मात्र फुले,शाहू,आंबेडकरांचा शिक्षणाचा विचार घेऊन आपली परिस्थिती कशीही असली तरी आपली मुलं शिकली पाहिजेत हाच विचार दादांच्या वडिलांनी त्या वेळी केला असावा. त्यांचे आजोबा हे धर्मोपदेशक म्हणूनच घरातलं वातावरणही तसं धार्मिकच होतं. म्हणूनच चांदूर बाजार येथील 'बॉईज & गर्ल्स ख्रिश्चन होम' या संस्थेत इयत्ता पहिली पासूनच दादांना दाखल करण्यात आलं, ते इयत्ता १० वी पर्यंत. पुढे लातूर येथे १२ आणि त्या पुढील पदवी शिक्षणासाठी चांदूर बाजार,जिल्हा अमरावती येथे प्रवेश घेतला.तिथेच त्यांची माझे एक सिनियर म्हणून आणि त्याही पलीकडे एक मित्र म्हणून गट्टी जमली. पुढे त्यांनी अमरावती विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए. केल आणि आज 'त्रिवेंद्रम विद्यापीठ कर्नाटक' येथे धर्मसिद्धांत या विषयात उच्च शिक्षण घेत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानत त्यांच्या ''शिका,संघटीत व्हा आणि संघर्ष करा'' या सूत्राची प्रेरणा जागी ठेवत त्यांचा प्रवास अव्याहत सुरु आहे.
फिलीपींस येथे विद्द्यार्थी मित्रांसमवेत 
       महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाच भारतीय युवक विद्यार्थी चळवळीने प्रभावित होऊन आता देश्याच्या राजकारणातच थेट तरुणांनीच सहभागी झालं पाहिजे असा विचार करीत असतानांच त्याची सुरुवात स्वतः पासून आणि स्वतःच्या गावापासून करण्याचा निर्णय विशाला दादांनी घेतला. त्यातही   ८०% समाजकारण आणि १०% राजकारण हे सूत्र घेऊन तरुणांनी आता राजकारणात आलं पाहिजे, हा विचार त्यांनी आमलात आणण्याचा संकल्प गावातल्या काही तरुणांना बोलुन दाखवला. पुढे २०१० मधेच वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी आपल्या जसापूर ग्राम पंचायतीची निवडणूक लढवत ग्रामपंच्यायत सदस्य पद पटकावले. आता मात्र गावकऱ्यांचा आपल्यावरील विश्वास सार्थकी लावण्यासाठी 'ग्राम विकास' हेच धेय्य घेऊन काम करणे गरजेचे होते. तरुणांचे सक्षम प्रतिनिधी आणि अत्यंत कमी वयातील ग्रामपंच्यायत सदस्य म्हणून आपल्यावरील जबाबदारीचे भान तर त्यांना होतेच शिवाय गावासाठी काही तरी करून दाखवायचेच हा संकल्पही होताच.
         जसापूरच्या विकासासाठी भरीव व मुलभुत कामाची 'ब्ल्यू प्रिंट' तयार करत असतांनाच उपसरपंचपदाची माळही त्यांच्या गळ्यात आली. मग गावात विविध शासकीय योजना अंतिम घटकांपर्यंत पोहचवण्याचा ध्यासच जणू त्यांनी घेतला.म्हणूनच पुढे सकारात्मक लोक सहभागातून परिवर्तन हे ग्रामविकासाचे सूत्र ठेऊन अनेक योजनांची प्रभावी आमलबजावणी केली. त्यात ग्रामीण आरोग्य,स्वच्छता,शिक्षण,रोजगार हमी,रस्ते,शुद्ध पाणी, दलित वस्ती विकास, तंटामुक्त गाव, सांडपाणी व्यवस्थापन,जवाहर विहीर योजना या व अश्या कितीतरी प्रकल्पांच्या माध्यमातून विकासकामे करून घेण्यात पुढाकार त्यांनी घेतला. पर्यावरन संरक्षण हा आजचा कळीचा मुद्दा, म्हणून गावात 'वृक्षारोपण मोहीम' तरुणांच्या साथीने राबवतच सुमारे १५०० वृक्ष्यांची यशस्वी लागवड त्यांनी केली.शिवाय ग्रामपंचायतच्या सामान्य फंडातून 'ट्री गार्ड' ची व्यवस्थाही त्यांनी केली. गावात 'रोजगार हमी कायद्या'ची प्रभावी अमलबजावणी व्हावी या साठी सतत पाठपुरावा करून त्यातून अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्याला मदत झाली. याच योजनेतून गावातील विहिरींची पुनर्बांधणी,रस्ते आदी योजनांची अमलबजावणी त्यांनी केली. 'ग्रामपंचायत सदस्य प्रशिक्षण' यशस्वी करण्यातही मोलाचा वाटा उचलतच ग्रामसभेचे प्रभावी उपयोजन करीत ग्रामपंचायतच्या कामात सर्वसामान्य नागरिकांना जोडत 'प्रशासन आणि लोक' असा समन्वय साधण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. गावात दलित समुदायाची परिस्थिती अत्यंत बिकट होती, मात्र असे असतांनाही त्यांचा विकास निधी इतरत्र वळवल्या जात असल्याचे लक्ष्यात येताच त्या विरोधात आवाज उठवत विशालदादांनी 'दलित वस्ती विकास योजनेची' प्रभावी अमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. त्यातच ज्या दलित वस्तीमध्ये स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही रस्ते नव्हते, तिथेच विकासाची वाट निर्माण करण्याचे श्रेय ही त्यांच्याच वाट्याला जाते.
         गावात पाण्याचा प्रश्न बिकट होता.म्हणूनच ही समस्या सोडवण्यासाठी सिंचन योजनेतून पाण्याची सोय त्यांनी केली. गाव स्वच्छ राहिले तरच देश समृद्ध होतो, हे ओळखूनच 'ग्राम स्वच्छता मोहीम' राबवत नाल्या व गटारे दुरुस्ती आणि बांधकाम करीतच कचरा व्यवस्थापनासाठीही काम करण्याचा संकल्प त्यांनी केला. एवढेच काय तर आपल्या कार्यकाळात सर्वाधिक घरकुल योजनांची अमलबजावणी करण्याचे श्रेय ही त्यांनाच जाते. याच सुमारास  जसापुरच्या सिमेअंतर्गत घनकचरा प्रकल्प उभारण्याचा घाट काही मंडळींनी आखला होता. मात्र त्या नागरिकांच्या आरोग्यावरचे विपरीत परिणाम लक्ष्यात घेत या प्रकल्पाच्या विरोधात मोहीम हाती घेत जनमत संघटीत करतच या विरोधात चक्क महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हान यांना घेराव घालण्याची तयारी ही त्यांनी केली होती.

     विशाल मोहेकर हे तरुणांचे प्रतिनिधी म्हणूनच त्यांच्या प्रश्नावरही त्यांनी सातत्याने काम केले. रोजगार,समुपदेशन,स्पर्धा-परीक्षा मार्गदर्शन,प्रेरणा कार्यक्रम,महापुरुषांच्या जयंत्या आदी उपक्रमांसोबतच चांदूर बाजार येथील 'कृषी उत्पन्न बाजार समिती' मध्ये स्थानिक तरुणांना ५०% आरक्षण असावे या मागणीसाठी जोरदार आंदोलन उभे केले. शिवाय ग्रामपंचायतचा कर नियमित भरण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीस धडक त्यानी दिली.

      महिला या ग्राम विकासाच्या मुलघटक मात्र तरीही त्यांचा सहभाग आजही प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत फारच कमी असल्याचे दिसून येते मात्र बदलत्या कळानुसार स्त्रियांना समोर आणणे महत्वाचे आहे. याच विचारातून केवळ महिला हाच विचार केंद्रस्थानी ठेऊन अनेक कार्यक्रमांचे यशस्वी  आयोजन त्यांनी केले. त्यासाठी सर्व समाजातील महिला एकत्र याव्यात म्हणून साध्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमापासून सुरुवात करीत विविध रचनात्मक उपक्रम त्यांनी राबवले. गावात महिलांसाठी स्वच्छता गृहाची कमतरता होती म्हणून ही मागणीही त्यांनी ग्रामपंचायती मध्ये लावून धरली.                       
         काही वर्षांपूर्वी २००६ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्रामीण आणि कृषी विकास या क्षेत्रात काम करणाऱ्या 'एम.एस.स्वामिनाथन फौऊन्डेशन'  संस्थेची स्थापना जसापूर मध्ये झाली होती. नंतरच्या काळात या संस्थेच्या कार्यकारिणी समिती सदस्य ही संचालक पदाची जबाबदारी सांभाळत असतांनाच शेतकरी आभ्यास दौरे, मृदा परीक्षण, शेतकरी प्रशिक्षण,पिक पाहणी ,प्रात्याक्षिके कार्यशाळा आदी अनेक उपक्रम त्यांनी राबवले. 
   
आशियन सोशल इन्स्टीटयुटच्या
 अध्यक्षा डॉ.रेमिरेज़ यांच्या समवेत 
    या व अश्या कितीतरी विधायक कार्यातून वेगळा आदर्श वाट चुकलेल्या तरुणाई पुढे ठेवत त्यांनी इतरांचीही काठी होण्याचा प्रयत्न केला. या त्यांच्या साऱ्या कार्याची दखल सामाजिक माध्यमे आणि संस्थात्मक विचारपीठानेही सातत्त्याने घातली आहे.मला अस वाटतं की सातत्त्यान सत्कार्य करणाऱ्यांच्या भाळी सत्काराचं भाग्य असतं. मग हीच कौतुकाची थाप आपली प्रेरणा होते. विशाल दादांना असे अनेक पुरस्कार लाभले आहेत. त्यात २०१२ मध्ये डॉ. बि. आर. आंबेडकर विद्यार्थी रत्न पुरस्कार, २०१३चा विध्यार्थी भूषण पुरस्कार, २०१५ मध्ये 'डॉ.एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फौऊन्डेशन चेन्नई' ची 'जमशेदजी टाटा राष्ट्रीय अकादमी' द्वारे दिल्याजाणारी कृषी आणि ग्रामीण विकास या क्षेत्रातील अत्यंत मानाची समजली जाणारी 'रिसर्च फेलोशिप' त्यांना प्रदान करण्यात आली. २०१५ मध्ये 'जनसेवा कला क्रीडा सांस्कृतिक अभियानाचा 'राष्ट्रीय क्रांतीजोती पुरस्कार' मा.जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला. मनोहर जोशी यांच्या हस्ते २०१५ चा 'संस्कृती वैभव पुरस्कार' मुंबई येथे त्यांना प्रदान करण्यात आला. भ्रष्टाचार निर्मुलन जन आंदोलन समिती यांचा 'आदर्श समाज सेवक पुरस्कार' देऊनही २०१५ मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आलं. 

       एकादा सहजच मी विशालदादांना विचारलं होत "दादा या सगळ्या  कार्याची प्रेरणा तरी तुम्हाला कशी मिळते ?" त्या वेळी मनमोकळं हसत ते मला म्हणाले  होते की, "आपण  ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचे ऋण फेडणेही आपलेच कर्तव्य आहे आणि त्यातूनच काम करत धडपडनं यातच सारं आलं. खरच मोठी माणसं काही एका क्षणातच मोठी होत नसतात. त्यासाठी प्रेरणा लागते, विश्वास आणि ध्यास लागतो. सोबतच लागते ती प्रचंड कष्टाची तयारी आणि बांधिलकीची ओढ. तीव्र समाज जाणीवाही असाव्या लागतात मगच पाय जमिनीवर आणि हात आभाळाला टेकवत विचारांचं अधिष्टान मांडून जन्माला येतो एखादाच विशाल साहेबराव मोहेकर.     
   




copyright_kunalramteke_aug.2015 

Sunday, 21 June 2015

मा.शरद पवार : एक आकलन 



प्रस्तावना- 
         पुरोगामी महाराष्ट्राच्या राज्याकारणात ज्या थोडक्या नेत्यांनी आपल्या कार्य कौशल्याने जनमनावर राज्य केले त्याच परंपरेत एक नाव घेतलं जात ते म्हणजे  शरद पवार यांचे होय.जानता राजा ही उपाधीही त्यांना जनतेने त्यांना मोठ्या उस्फुर्तपणे बहाल केली.पवारांच्या जीवनाचा अभ्यास केल्या शिवाय महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचा अभ्यास अपुराच ठरावा एवढे हे नाव आपल्या व्यक्तित्वाने त्यांनी अधोरेखित केले आहे.मात्र शरद पवार यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाचा केवळ एकाच अंगाने विचार करून चालणार नाही.काहीही झाले तरी महाराष्ट्र आणि देशातील बुद्धिवादी मंडळी मात्र 'शरद चांदणे दुरुनी साजरे' असे म्हणत असतील तर याचा निश्चितच याचा विचार झाला पाहिजे. एके काळी शरद पवार म्हणजेच महाराष्ट्र हेच एक समीकरण होऊन बसले होते मात्र आज तसे नाही. काळ बदलतो तशीच एखाद्या व्यक्तित्वाची होत असलेली पूजा या संदर्भत लोक सारासार विचार लोक करू लागतात. महाराष्ट्राचे केवळ आणि केवळ शरद पवार हेच भवितव्य हा भाव आता जरी मोठ्या प्रमाणात कमी झाला असला तरीही पवार साहेबांचे मोठ्या प्रमाणात समर्थक मंडळी महाराष्ट्रात आहेत. समकालीन संदर्भात जरीही पवारांचे स्थान राजकीय वर्तुळात थोडे मागे-पुढे होत असले तरीही आपल्या मुस्सदी  भूमिकांमधून आपले आणि आपल्या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व त्यांनी जपले आहे.एखाद्या माणसाच्या जीवनात एकीकडे प्रचंड मोठा समर्थक वर्ग आणि मानसन्मान,सत्ता तर दुसरीकडे अनेकानेक आरोप आणि विरोधक हे कॉकटेल मला तरी आज आकलनाच्या पलीकडले वाटते.तरीही एक विद्यार्थी म्हणून त्यांच्या जीवन आणि कार्याचा घेतलेला हा एक आढावा…

शरद पवार : जीवन आणि कार्य-
पवार साहेबांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला.आपल्या कडे एक म्हण प्रचलित आहे 'मुलाचे पाय पाळण्यात दिसतात' याच न्यायाने १९५६ साली ते शाळेत असताना त्यांनी गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला.कदाचित येथूनच त्यांच्या राजकीय जीवनाची सुरवात झाली असे आपणास म्हणता येईल. त्यानंतर काँलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेतृत्वाही त्यांनी केले.एकदा विद्यार्थी संघटनेच्याच एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले.पवारांनी त्याप्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावीत झाले.त्यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला.याच दरम्यान पवार साहेबांना यशवंतरावांचे मार्गदर्शन लाभले.त्याचाच परिणाम म्हणून वयाच्या २४ व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले.यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले.पुढे १९६६ साली पवारांना युनेस्को शिष्यव्रुत्ती मिळाली.त्याअंतर्गत त्यांना पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड इत्यादी देशांना भेट देऊन तेथील राजकीय पक्षांचा आणि त्यांच्या पक्षबांधणी करायच्या पद्धतीचा जवळून अभ्यास करता आला.पवारांची ही जडण-घडण त्यांच्या भावी आयुष्यासाठी महत्वाची ठरली. 
मा.साहेबांशी संवाद साधण्याची संधी दिल्ली अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने मिळाली.

शरद पवार आणि महाराष्ट्र विधानसभा-
तारुण्य आणि ऐन उमेदीच्या काळात वयाच्या २७ व्या वर्षी  इ.स. १९६७ च्या राज्य विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले.श्री. वसंतराव नाईक यांच्या मंत्रीमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश वयाच्या २९व्या वर्षी झाला. इ.स. १९७२ आणि इ.स. १९७८ सालच्या निवडणुकीतही ते विजयी झाले.इ.स. १९७८ सालच्या निवडणुकीनंतर वसंतदादा पाटील मुखमंत्री झाले. यशवंतराव चव्हाणांबरोबरच वसंतदादा पाटील हे ही पवारांचे मार्गदर्शक होते. पण काँग्रेस पक्षाचे १२ आमदार फोडून पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि वसंतदादांचे सरकार पाडले. त्यानंतर 'पवारांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला' अशी जळजळीत प्रतिक्रिया त्यांनी दिली..

पवार एक मुख्यमंत्री
१८ जुलै१९७८ रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला.पवारांबरोबर काँग्रेस (इंदिरा) पक्षातून बाहेर पडलेले १२ आमदार, काँग्रेस (स) पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल या नावाने बनली आणि त्याचे नेते पवार झाले.ते राज्याचे सर्वांत तरूण मुख्यमंत्री होते. इ.स. १९८० साली इंदिरा गांधींचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली.त्यात पवारांचे सरकारही बरखास्त झाले. जून इ.स. १९८० मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. काँग्रेस(इंदिरा) पक्षाने २८८ पैकी १८६ जागा जिंकल्या आणि बँरिस्टर अब्दुल रहमान अंतुले राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. शरद पवार विधानसभेतील प्रमुख विरोधी नेते होते.

लोकसभा
महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांनी आपले स्थान बळकट केले होते.पुढे १९८४ साली लोकसभा निवडणुक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत विरोधी पक्ष राज्यातील ४८ पैकी केवळ ५ जागा जिंकू शकले. त्यात पवारांच्या बारामती या जागेचा समावेश होता .मात्र त्यांनी राष्ट्रीय राजकारणात न पडता काही काळ राज्याच्या राजकारणातच राहायचे ठरवले .मार्च १९८५ ची राज्य विधानसभा निवडणूक त्यांनी बारामतीतून जिंकली आणि लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.त्या विधानसभा निवडणुकीत पवारांच्या काँग्रेस(स) पक्षाने २८८ पैकी ५४ जागा जिंकल्या आणि साहेब राज्यविधानसभेतील विरोधी पक्षनेते झाले.
         इ.स. १९८७ साली ९ वर्षांच्या खंडानंतर शरद पवारांनी राजीव गांधींच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे काँग्रेस(इंदिरा) पक्षात परत प्रवेश केला. जून १९८८ मध्ये पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्ष राजीव गांधींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा केन्द्रीय मंत्रीमंडळात अर्थमंत्री म्हणून समावेश केला. त्यांच्या जागी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राजीव गांधींनी शरद पवारांची निवड केली. २६ जून इ.स. १९८८ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यापूर्वीच्या काळात राज्यात काँग्रेस पक्षाला फारसे आव्हान नव्हते. पण बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना हा पक्ष भारतीय जनता पक्षाशी युती करून काँग्रेस पक्षाच्या अनेक वर्षे अबाधित असलेल्या वर्चस्वाला आव्हान देऊ लागला होता. त्या आव्हानाला तोंड देऊन राज्यात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व कायम राखण्याची जबाबदारी पवारांवर आली.
       नोव्हेंबर १९८९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राज्यातील ४८ पैकी २८ जागा जिंकल्या. पक्षाची राजस्थान,मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांत झाली तशी वाताहत महाराष्ट्रात झाली नाही. पण इ.स. १९८४ च्या तुलनेत पक्षाने १५ जागा कमी जिंकल्या. शिवसेनेने ४ जागा जिंकून प्रथमच लोकसभेत प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाने १० जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली. लोकसभा निवडणुकीतील कामगिरी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला.
      पुढे राज्य विधानसभेसाठी फेब्रुवारी १९९० मध्ये निवडणुका होणार होत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज्याच्या कानाकोपर्यात प्रचारसभा घेऊन काँग्रेस पक्षापुढे मोठे आव्हान उभे केले. राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने २८८ पैकी १४१ तर शिवसेना-भाजप युतीने ९४ जागा जिंकल्या.राज्याची स्थापना झाल्यानंतर प्रथमच काँग्रेस पक्षाने विधानसभेतील बहुमत गमावले. तरीही १२ अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर शरद पवार यांनी ४ मार्च इ.स. १९९० रोजी मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली.परंतू जानेवारी १९९१ मध्ये विलासराव देशमुख, सुरूपसिंग नाईक आणि इतर काही मंत्र्यांनी शरद पवारांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी पक्षाध्यक्ष राजीव गांधी यांच्याकडे केली. पण त्याला राजीव गांधींनी नकार दिला.
       १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी काँग्रेस पक्षाचा राज्यात एकहाती प्रचार केला. पक्षाने राज्यात ४८ पैकी ३८ जागा जिंकल्या आणि इ.स. १९८९ च्या निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीची काही अंशी भरपाई केली. निवडणुक प्रचारादरम्यान राजीव गांधींची हत्या झाली. श्री.पी.व्ही.नरसिंह राव आणि अर्जुन सिंग यांच्याबरोबर पवारांचे नावही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहे अशा बातम्या वर्तमानपत्रांत आल्या. मात्र काँग्रेस संसदीय पक्षाने श्री.पी.व्ही.नरसिंह राव यांना नेतेपदी निवडले आणि त्यांचा २१ जून इ.स. १९९१ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला.नरसिहरावांनी पवारांना केंद्रिय मंत्रीमंडळात संरक्षणमंत्री म्हणून नेमले. २६ जून १९९१ रोजी त्यांचा केंद्रिय मंत्री म्हणून प्रथमच शपथविधी झाला.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याजागी सुधाकरराव नाईक यांची निवड करण्यात आली.मात्र राज्य काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे सुधाकरराव नाईक यांना राजीनामा द्यावा लागला. 
    नरसिहरावांनी शरद पवारांना पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात पाठवले. त्यांनी ६ मार्च १९९३ रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा सुत्रे स्वीकारली.

पुन्हा एकदा मुख्यमंत्री : वादांची वादळे-
केंद्रातून पुंन्हा एकदा महाराष्ट्रात येउन चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाची कारकीर्द त्यांनी सुरु केली,मात्रभविष्यात आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे हे मात्र त्यांच्या ध्यानी मनी ही नव्हते. पवारांच्या शपथविधीला एक आठवडा व्हायच्या आतच १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत भीषण बाँबस्फोट झाले.त्यात २५७ लोक ठार तर ६०० हून अधिक लोक जखमी झाले. ३० सप्टेंबर १९९३ रोजी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये भूकंप होऊन दहा हजारांपेक्षा जास्त लोक ठार झाले.या संकंटांबरोबरच राज्यात कमालीच्या वाढलेल्या भ्रष्टाचाराबद्दल मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त गो.रा.खैरनार यांनी पवारांना दोषी धरून त्यांच्यावर अनेक आरोप केले. प्रख्यात समाजसेवक अण्णा हजारे यांनी वनखात्यातील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात उपोषण केले.तेव्हा पवारांचे सरकार भ्रष्टाचारी अधिकार्यांना पाठिशी घालत आहे असा आरोप झाला.जळगाव येथील सेक्स स्कँडल मध्ये अनेक तरूणींवर लैंगिक अत्याचार झाले.त्यात काँग्रेस पक्षाचे स्थानिक नगरसेवक सामील आहेत असा आरोप झाला. २३ नोव्हेंबर १९९४ रोजी नागपूर येथे गोवारी समाजातील लोकांचा शिक्षण आणि सरकारी नोकर्यांमध्ये आरक्षणाची मागणी करण्यासाठी मोर्चा निघाला.त्यात चेंगराचेंगरी होऊन १२३ लोक मृत्यूमुखी पडले. त्यांच्या शिष्टमंडळाची आदिवासी कल्याण मंत्री मधुकरराव पिचड यांनी वेळेत भेट न घेतल्यामुळे चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली असाही आरोप झाला.
     राज्य विधानसभेसाठी फेब्रुवारी-मार्च १९९५ मध्ये निवडणुका होणार होत्या.त्या निवडणुकींच्या तिकिटवाटपात काँग्रेस पक्षात मोठया प्रमाणावर बंडखोरी झाली.अनेक ठिकाणी काँग्रेस नेत्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरूध्द अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.जनतेत सरकारविरूध्द वाढलेली नाराजी आणि मोठया प्रमाणावर झालेली बंडखोरी यांचे प्रतिबिंब मतपेटीत उमटले.काँग्रेस पक्षाचा राज्यात प्रथमच पराभव झाला.शिवसेना-भाजप युतीस २८८ पैकी १३८ जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षास ८० जागांवर समाधान मानावे लागले.राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांचा १४ मार्च १९९५ रोजी शपथविधी झाला.

पुन्हा एकदा चलो दिल्ली
          १९९६ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पवार राज्य विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते होते. इ.स. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बारामतीतून विजय मिळवला आणि त्यानंतर ते राष्ट्रीय राजकारणात उतरले.जून १९९७ मध्ये त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सीताराम केसरी यांच्याविरूध्द निवडणुक लढवली पण त्यांचा पराभव झाला.१९९८ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राज्यात रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी पक्षांबरोबर निवडणुकपूर्व आघाडी करायचा निर्णय घेतला.त्यामुळे शिवसेना-भाजप विरोधी मतांचे विभाजन टळले आणि काँग्रेस-रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्या युतीने ४८ पैकी ३७ जागा जिंकून जोरदार यश प्राप्त केले.शिवसेना-भाजप युतीला १० जागांवर समाधान मानावे लागले.त्यानंतर शरद पवार १२ व्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाले.

मात्र १२ वी लोकसभा बरखास्त झाल्यानंतर मे इ.स. १९९९ मध्ये पी.ए.संगमा आणि तारिक अन्वर यांच्या साथीने शरद पवारांनी अशी मागणी केली की,१३ व्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींऐवजी भारतात जन्मलेल्या कोणाही नेत्याला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करावे.काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात त्या तिघांनी म्हटले,"उच्च शिक्षण, कर्तबगारी आणि पात्रता असलेल्या अनेक व्यक्ती असलेल्या या ९८ कोटी लोकांच्या भारत देशात भारताबाहेर जन्म झालेली कोणतीही व्यक्ती सरकारचे नेत्रुत्व करणे योग्य होणार नाही.कारण हा प्रश्न देशाची सुरक्षा, आर्थिक हितसंबंध आणि जागतिक राजकारणातील भारताच्या प्रतिमेबरोबरच प्रत्येक भारतीयाच्या अस्मितेशी निगडीत आहे"'त्या कारणावरून काँग्रेस पक्षाने शरद पवार,पी.ए.संगमा आणि तारिक अन्वर यांना ६ वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले.

शरद पवार आणि राष्ट्रवादी
      पक्षाने केलेल्या कार्यवाही नंतर मात्र त्यांनी १० जून १९९९ रोजी त्यांच्या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची' स्थापना केली.१९९९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींनंतर कोणत्याही पक्ष अथवा आघाडीस बहुमत मिळाले नाही.त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होऊन विलासराव देशमुख राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले.२००४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये सामील झाला. २२ मे २००४ मध्ये शरद पवारांनी देशाचे कृषिमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. २९ मे इ.स. २००९ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना कृषी, ग्राहकांशी संबंधित बाबी, अन्न आणि सार्वजनिक वितरण ह्या खात्यांची धुरा देण्यात आली.राजकारणाबरोबरच क्रिकेट हे देखील पवारांच्या आवडीचे क्षेत्र आहे. २९ नोव्हेंबर इ.स. २००५ रोजी ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवडून आले. जुलै २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पक्षकार्याला अधिक वेळ देण्याची इच्छा असल्याचे सांगून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे त्यांनी आपल्यावरील कार्यभार कमी करण्याची विनंती केली आहे.१ जुलै इ.स. २०१० रोजी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. जगमोहन दालमिया यांच्यानंतर हे पद भूषविणारे ते दुसरे भारतीय आहेत.शरद पवार  जीवनाचा हा धावता आढावा पण एखाद्या व्यक्तित्वाचा अभ्यास करतांना बाजू नाही तर पैलूही शोधावे लागतील.आरोप-प्रत्त्यारोपांच्या  आणि मान-सन्मान,पद,सत्ता व प्रतिष्टेच्या व्युहात एखाद्या व्यक्तीला आपले निच्चीत असे स्थान समाजमनासमोर निर्माण करणे यासाठी जी तपस्या लागते त्यापलीकडे जाऊन मोठी मानस राबतात मग विचारधारा,जाणीवां,स्वार्थ,राजकारण,सेवा यानाही शोधन महत्वाच ठरत. 

# sharadpawar  #nationalistcongressparty
(सम्पूर्णतः संकलित लेख.संदर्भ-विकिपीडिया) 



Tuesday, 5 May 2015


मराठीच्या पाऊल खुणा 

         
       दिल्ली अभ्यास दौर्याच्या पार्श्वभूमीवर 'संवाद' चा या वेळचा अंक काढायचं ठरलं आणि पुन्हा एकदा पत्रकारीतेच्या आम्हा विद्यार्थ्यांच्या लेखण्या 'अनुभवांची दिल्ली' लिहायला लागल्या.दिल्ली दौर्यात आठवणींचा अमिट ठेवा आमच्या गाठीशी होता.असेच एकदा अभ्यासाचा भाग म्हणून 'प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया' च्या कार्यालयात गेलो होतो. PTI चे अध्यक्ष विजय सातोकर यांनी "मराठी इतिहासाच्या काय पाऊलखुणा तुम्हाला दिल्लीत जाणवल्या?" या प्रश्नाने थोड चमकुनच का होईना पण दिल्ली आणि मराठी  यांचा धान्दवडा घेण्याचा प्रयत्न झाडून आमच्या सार्यांच्याच मनाने केला होता.खरच 'दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा…' अस म्हणत दिल्लीच काय तर सुदूर अटकेपार झेंडे रोवत परमुलुख महाराष्ट्राने पादाक्रांत केला होता. परकीयांना झुंजत ठेवत मराठी स्वराज्याच्याही पुढे जात इथल्या मर्द मावळ्यांनी 'विश्वासी जडावे अवघे मराठी विश्व' हा संदेश घेऊन मराठीचे गोडवे गात आपल्या पराक्रमाची शिकस्त केली होती.आणि एके काळी लौकिकार्थाने 'लोकल' असलेल्या मराठमोळ्या संस्कृतीस 'ग्लोबल' करण्यासाठी जीवच राण केल होत.खरच काय बर नात असाव महाराष्ट्रच,मराठीच या सार्या प्रदेशांशी? दिल्लीशी? पंजाबशी?             
        दिल्लीची मेख महाराष्ट्राने राखल्याचा इतिहास सर्वश्रुत आहेच आणि आज तर चक्क मराठी साहित्याचा महामेळा असलेले अखिल भारतीय मराठी सहित्य संमेलन दिल्ली नजीकच्या पंजाब राज्यातील घुमान या छोट्याश्या गावी होत आहे. दिल्ली विशेषांकात आता घुमानचे काय काम? हा प्रश्न कोणत्याही चर्चकास पडला तर नवल नाही, पण मराठीच्या पाऊलखुणा शोधतांना एक पायवाट नामदेव नावाच्या महाराष्ट्राच्या सुपुत्रास सुमारे साडेसातशे वर्ष्यांपूर्वी दिल्लीतही सापडली होती म्हणूनच समकालीन  संदर्भ शोधतांना दिल्लीवाटे केलेली ही घुमान वारीही जर प्रसंगीकच वाटते.        
         बाराव्या शतकात महाराष्ट्र ते उत्तर हिंदुस्थान असा प्रवास करत महाराष्ट्र धर्माची संतपताका खांद्यावर घेऊन नामदेव दिल्ली गाठत होते. पुढे पंजाब मधील घुमान याच नामदेवांनी वसवलेल्या गावातून सकाळ मराठी संतांचा संदेश त्यांनी जगाला दिला होता. स्वतंत्र,समता,न्याय,बंधुत्व यांची शिकवण देण्याच्या मराठी संत परंपरेचा वारकरी होत नामदेवांनी आधुनिकतेची मुहूर्तमेढ याच घुमान मधून रचली होती. म्हणूनच कदाचित नामदेवांचे आणि पर्यायाने मराठीचे सीमोल्लंघनाची स्मृती जपन्याकरीताच अ.भ मराठी साहित्य संमेलनाचा हा प्रपंची योजिला असावा.     
               मुळात सामाजिक असमानतेच्या पायावर उभ्या असलेल्या तत्कालीन अविचारधारेस छेद देत संतांनी ज्ञानभाषेचा दर्जा लोकभाषा मराठीला मिळवून देण्याचा अविरत प्रयत्न केला होता. १२०८ मध्ये महिमभटांचा सर्वज्ञ श्री चक्रधारांच्या जीवनाधारित लीळाचरीत्र, मुकुन्दराजांचा विवेकसिंधू, १२१२ मधील ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरी पासून ते संत तुकोबा,चोखोबा च्या वाटेने येत केशवसुत,कुसुमाग्रज करीत अलीकडे अगदी नेमाडपंथापर्यंत वगैरे हा 'मराठीचा वेलू' गगनावरी जातची राहिला.असे म्हणतात की, 'मराठीचा प्रवास रसाळ नामदेवांपासून ते ढासळ नामदेवांपर्यंतचा' मात्र या सकाळ साहित्तीकांच्या स्मृती जनमानसात चिरंतन राहाव्यात याच साठी हा शब्द मेळा नवे पाऊल ठरावा. घुमान या तीर्थक्षेत्री सुदूर महाराष्ट्राबाहेर होणारे हे पहिलेच साहित्य संमेलन कालपरवापर्यंत सुरु असालेल्या ५W-१H च्या वाद-प्रवादान्मधून बाहेर येउन दिमाखाने सम्पन्नतेकडे प्रस्थान करीत असतांनाच मराठी साहित्य,महाराष्ट्र, पंजाब आणि दिल्ली यांचा परस्पर सह संम्बंध गोत्रात्वाचा अगदी 'रुहानी रीश्त्याचा' वाटतो. पंजाब गव्हाचे कोठार तर महाराष्ट्र ज्वारीचे,पंजाब शक्तीचे माहेर तर महाराष्ट्र भक्तीचे,पंजाब शोर्याची कर्मभूमी तर महाराष्ट्र धैर्याची,पंजाब योध्यांची रणभूमी तर महाराष्ट्र संतांची तत्वभूमी. एव्हढेच काय तर महाराष्ट्रातील नांदेळ ही आमच्या तमाम सिख बांधवांसाठी गुरु गोविंदसिंग यांच्या स्मरणार्थ पुण्यभूमीच.खरच जात,धर्म,पंथ,पक्ष,प्रांत,भाषा,यांच्या पलीकडे जात घुमान साहित्य संमेलनाच्या माध्यमातून समतेचे दिवे ममतेने लावण्याचा प्रघात आतातरी पोळलेल्या देश्यात उपयोजित व्हावा,हा आशावाद व्यक्त करूयात.
              मराठी साहित्यातील जेष्ट साहित्तिक सदानंद मोरे हे या वर्षीच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत."विवेकाचा जागर करण्याचे विचारपीठ  म्हणजे साहित्य संमेलन" ही रास्त भूमिका त्यांनी मंडली आहे. ग्रंथ दिंडीची काही वर्षात मोडलेली परंपराही या वर्षीपासून सुरु करण्याची अभिनंदनिय घोषणा संयोजकांनी केली आणि त्यात नामदेव गाथेची ब्रेल लिपीतील प्रतही ठेवण्याचा निर्णयही स्वगातार्यच आहे. मात्र गरज आहे विषमता आणि अंधश्रद्धेचे उसने घेतलेले अंधत्व दूर करत पुरोगामित्वाच्या संत मार्गाने पुढे जाण्याची.घुमनचा हाच संदेश साहित्य पालखीचे भोई 'गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत' जनमानसात पोहचवतील याच आशेसह… ठ्ठल…विठ्ठल…विठ्ठल…       

Sunday, 12 April 2015

 गप 'घुमान' घरी  
            
          नुकत्याच घुमान येथिल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले अन 'साहित्य वगैरे' च्या गप्पा करून दमलेल्या 'रिकामटेकळ्यांनी' गुमान आपली भली थोरली स्मृतीचिन्हे, पुस्तके, इतरांबरोबरच्या फोटोंच्या आणि सेल्फिच्याही स्वॉप्ट कॉपी घेवून आणि 'जलेबी खाऊन' फुगलेले पोट सावरत घरचा रस्ता धरला. कधी नव्हे ते इतक्या दूर महाराष्ट्राबाहेर आपले साहित्य संमेलन पार पडले. साहित्त्य,सारस्वत आणि रसिकांचा मेळा म्हणून बघितले जाणारे हे साहित्त्य संमेलन अनेक वाद-विवादांच्या भौर्यात पार पडले असले तरीही ती काही आपल्यासाठी नाव्हाळीची बाबा नसल्याने 'रोजचेच मढे त्याला कोण रडे' असाच काहीसा प्रतिसाद या सगळया 'वैचारिक' चर्चांना मिळाला. अर्थातच साहित्य संमेलन म्हटले की वादावादी होणारच,असाही काहीसा सूर या आधीच्या आपल्या मान्यवर साहित्तिक महाभागांचा वगैरे असल्याने जरा 'आता काय नवे?' हे कुतूहल दाखवतच हौसे,गवसे आणि नवसे यांनी या साहित्त्य संमेलनास गोळ करून घेतले. ते असो.     
            अलीकडे साहित्य संमेलने म्हणजे तथाकथित साहित्य आणि साहित्यिकांची 'पिकनिक' स्थळे झाली असल्याची टीका अनेक मान्यवरांबरोबर  तळागाळातील रसिक वर्ग करतांना दिसून येतो. मुळातच 'जीवनासहित चालते ते साहित्य' ही साहित्याची जनमानसात खोलवर रुजलेली भावना. मात्र जनकेंद्रिततेकेडून केवळ आधुनिक 'इव्हेंट' मध्ये रुपांतरीत होणारी अलीकडील संमेलने म्हणजे केवळ काहींची मक्तेदारी होऊन त्यांचाच महोत्त्सव बनू पाहत आहेत. साहित्य संमेलने समाज,साहित्य आणि संस्कृतीच्या चिंतनाची आणि उपयोजनात्मक कार्यक्रमाचीही केंद्रे व्हावीत हा आशावाद इथल्या सर्वसामान्य रयतेचा असतांना साहित्य आणि समाजापासून तुटणारी तथाकथित अभिजात साहित्तीकांची प्रस्थापित संमेलने म्हणजे 'खायला फार आणि भुईला भार' तर नाहीत ना याचाही जाणीव पूर्वक विचार लोक करत आहेत. काल परवा तर भालचन्द्र नेमाडे यांनी 'साहित्या पेक्ष्या यांना जलेब्या महत्वचा वाटतात' असे म्हणून वास्तविकतेचे परखड चीकीत्सन केले. अलीकडे समाज साहित्यापासून तुटणारी साहित्य संमेलने 'आमच्या साहित्य जाणिवांना सामावून घेत नाहीत' हाच भाव तळागाळातील सामाजिक साहित्य वर्तुळात असतांना 'साहित्य म्हणजे केवळ आपले तेच' ही भावनाही प्रस्थापितांमध्ये प्रबळ होत नाही ना? या विषयावर चिंतन होणे महत्वाचे वाटते. साहित्य म्हणजे समाज मनाचा आरसा असतात.समाजमनाला नीटसे वळण लावत साहीत्त्यिक आपल्या प्रतिभेची लेखणी करून मार्ग हीन झालेल्या समाजास वेळोवेळी दिशा दाखवत असतात. अगदी तुकोबांनी म्हटल्या प्रमाणेच  ''भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी…'' ही साहित्त्यीकांची रास्त भूमिका असावी.मात्र ''विवेकाचा जागर'' म्हटली जाणारी हीच साहित्य संमेलने अविवेक्यांच्या गळ्यात पडल्याने आता 'घंटा कोण बांधणार?' हा प्रश्न उपस्थित्र व्हावा.असो.     
              मुळ पदावर येतांना, घुमान साहित्य संमेलन नुकतेच पार पडले आहे. प्रदेश्याच्या सीमा ओलांडत अंतरभारती स्वप्न साकारण्याच्या प्रयत्नचा एक भाग म्हाणावा असां हा प्रयत्न होत असल्याचा देखावा खूप छान साकार करण्यात मा.संयोजक यशस्वी ठरल्याचा कौल आपल्या 'जागृत मिडिया' ने दिला आहे.शेवटी गुमान साहित्यिक-रसिकांना 'धक्का गाडीने' पाठवून आयत्या वेळी आमच्या जाताबंधव पत्रकारांसाठी मात्र साक्ष्यात विमान प्रवास 'म्यानेज' करणार्या  संयोजकांचे परिश्रम शेवटी सार्थकी लागले म्हणायचे.तेही असो.       बरे, साहित्य संमेलनांनी काय कमावले असा प्रश्न ज्या वेळी आपणच आपल्याला विचारतो तेव्हा मात्र हाती आलेले भोपळे वाजवत तथाकथित विवेकाचे गोडवे गात स्वधान्यता मानतच 'मी मराठी' असे म्हणत स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेण्यात कृतज्ञता मानत 'भाषेसाठी केव्हढे हे श्रम' असे म्हणून तमाम महामानावांचे उपकार मानूयात.चला हेही एक कीर्तन संपल.म्हणा पुंडलिक वरदे हरी विठ्ठल…