Friday, 18 August 2017

आम्ही स्वतंत्र झालो आहोत का ?
'साम टीव्ही' च्या 'आवाज महाराष्ट्राचा' या कार्यक्रमात स्नेहा मगर यांचे विचार





संजय आवटे : ‘आवाज महाराष्ट्राचा’ या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आपण गप्पा मारत होतो, ‘स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेली माणसं आणि आता धुरा तरुणाई कडं …’ खरं तर स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेली माणसं आपण जेव्हा बघतो आणि ज्यावेळी ती बोलू लागतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की, किती वेगळ्या पद्धतीनं ही माणसं बोलतायेत ? किती वेगळ्या पद्धतीनं ही माणसं विचार करतायेत ? मांडतायेत. आणि आपल्याला यापैकी बऱ्याच गोष्टी माहितही नाहीयेत. आणि जेव्हा तरुणाई या सगळ्या संदर्भात बोलू लागते, तेव्हा एकीकडे सत्तर वर्षांचा वारसा आणि त्याचवेळी वर्तमानाचा आरसा या दोन्ही बद्दल आपण बोलतो आहोत. आता माझ्यासोबत स्नेहा आहे. स्नेहा मगर. स्नेहा मगर ही ‘टीआयएसएस’ मधील विद्यार्थिनी आहे, आणि एकूणच या कामामध्ये, चाळवळीमध्ये आणि महाविद्यालयाच्या निवडणुकांमध्ये पुढे असणारी अशी ही स्नेहा आहे. स्नेहा मला सांग, मघापासूनच ही चर्चा तू ऐकते आहेस. की ज्या प्रकारे बाबा आढाव सांगत आहेत किंवा बाबा हुबळीकर सांगत आहेत, ते अनुभव ऐकतांना तूला आत्ता काय वाटतं ?   


स्नेहा मगर : लहानपणी पेढा घेण्यासाठी आम्ही स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जायचो. नवीन, स्वच्छ धुतलेला गणवेश असायचा. एक वेगळा अनुभव होता. स्वातंत्र्य दिनाच्या वेगळ्या व्याख्या होत्या. पण आता तरुण म्हणून मी जेव्हा या सगळ्यांकडे बघते तेव्हा या सर्व संकल्पनांच बदलत असल्यासारख्या वाटतात. 

मुळात, स्वातंत्र्याची नेमकी उद्दिष्ट काय ? आम्ही स्वातंत्र्य नेमकं कशासाठी मागतोय ? जी उद्दिष्ट आम्ही ठेवली होती तीत आम्ही कुठतरी गडबडतोय. त्यासाठी आम्ही भांडतोय. एक, दोन प्रकारची गटं आहेत, असं मला वाटतं. एक, अंतर्गत सुधारणावादी आणि दुसरे म्हणजे तथाकथीत स्वातंत्र्यवादी. या दोघांच्या मध्ये कुठंतरी वैचारिक क्रांती घडतीये का ? की वैचारिकता ही परत पारतंत्र्यात जातीये ? हा एका प्रश्न महत्वाचा आहे, असं मला वाटतं. दुसरं एक असं वाटतं कि, सक्षमीकरणाचा ज्यावेळी आम्ही विचार करतो, महिला सक्षमीकरणाचा किंवा जेव्हा एकंदरीतच सर्व समाजघटकांचा विचार ज्यावेळी आम्ही करतो तेव्हा आपल्या सरकारच्या ‘पॉलिसीज’ तशा प्रकारच्या आहेत का? याचाही विचार आपल्याला करावा लागेल. 

एव्हढच नव्हे तर न्यायपालिका, कार्यपालिका, विधायका आणि प्रचार-प्रसार माध्यमं ही चारही जी स्थंभ आहेत.  त्यांच्या सत्तेचं विकेंद्रीकरण होणं अत्यंत आवश्यक आहे. असं मला वाटतं. आणि जेव्हा आम्ही सामान संधी, सामान शिक्षण या सर्व गोष्टींचा विचार करतो, तेव्हा शिक्षणाच्या संदर्भात शिक्षण आणि सक्षमीकरण या दोन गोष्टी हातात हात घालूनच येतात असा मला वाटत. मग शिक्षणातून सक्षमीकरण होत असेल तर शिक्षणासाठी बजेट आम्ही का कमी ठेवतो ? जेव्हा की, महात्मा फुले ‘हंटर कमिशन’समोर सहा टक्के बजेटचा वाटा शिक्षणावर खर्च करण्याची शिफारस करतात. पण अजूनही आम्ही यापर्यंत पोहचत नाहीये. सत्तर वर्षे झाली तरीही आम्ही तेथे कुठेतरी मागासले आहोत. असं मला वाटतं. 

जेव्हा आपण महिलांचा विचार करतो तेव्हा एका महिलेला किंवा एका मुलीला एक माणूस म्हणून स्वीकारण्याची जी भावना आहे त्या भावनेत कुठेतरी कमतरता आहे किंवा त्या जाणिवेत कुठेतरी कमतरता आहे. म्हणूनच आम्हाला खैरलांजी मांडावी लागते, कोपर्डी मांडावी लागते. या सर्वांतून एक दुःखाचा सूर निर्माण होतो. हा दुःखाचा सूर आम्हाला सक्षमीकरणाकडे नेतोय की या दुःखाच्या सुरांतून क्रांती घडून येते, हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे.   


संजय आवटे : स्नेहा तुझे सगळेच मुद्दे महत्वाचे आहेत. हे ठीक आहे. हे प्रश्न असणारच आहेत. गेली सत्तर वर्ष या प्रश्नांबद्दल आपण बोलतो आहोत. क्रांतीसिह नाना पाटील यांचं चरित्र मी वाचत होतो. त्यांच्या गावी गेलो. त्यांच्या कन्येला भेटलो. तेव्हा स्वातंत्र्यानंतर काँग्रेसची राजवट त्यांनी बघितली. नाना पाटलांनी. त्यावेळी नाना पाटील बोलले की काँग्रेसची राजवट इतकी भयानक आहे कि त्यापक्षा ब्रिटिश बरे. त्यामुळे ब्रिटिशांपेक्षाही काँग्रेस वाईट आहे, असं नाना पाटलांना वाटलं होत. त्यामुळे हे ठीक आहे. यात पक्षीय काहीच नाहीये. तेव्हा काँग्रेस काय भाजप काय किंवा काय-काय ? त्यामुळे ज्यासाठी स्वातंत्र्य मिळालं होतं त्या स्वप्नांपर्यन्त पोहचण्यामध्ये यश आलं नाही. (संजयजी इतर मान्यवरांना प्रश्न विचारतात.)


संजय आवटे : स्नेहा, तीस सेकंद… 

स्नेहा मगर : मला असं वाटत की, जर प्रगतीचा हा विचार आपण म्हणतोय किंवा विकसित देशाचा विचार आपण म्हणतोय. तेव्हा विकसित देश म्हणजे काय ? हे मांडण्यासाठी जर विद्यार्थ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळत नसेल तर मला असा प्रश्न पडतो की, खरच आम्ही स्वातंत्र झालो आहोत की नाही ? खरंच आमचा विकास होतोय की नाही ? 



संजय आवटे : हे सगळे मुद्दे महत्वाचे आहेतच. सगळ्याच नामवंतांचे मनापासून आभार. तुम्हाला एक गम्मत सांगतो. एकदा गांधीजीजींना माऊंटबॅट म्हणाले होते की, “अहो आम्ही जावू. पण आम्ही किती शिस्तबद्ध आहोत ! तुमचे लोक हे असे अडाणी. आम्ही गेल्यावर इथे फक्त गोंधळ असेल.”  गांधीजी त्यांच्या खास शैलीत हसले. आणि म्हणाले, “खरंय गोंधळ असेल पण तो आमचा गोंधळ असेल. तुमच्या शिस्ती पेक्षा आमचा गोंधळ आम्हाला अधिक-अधिक प्यारा आहे.”...   

**********
सामाजिक समतावादी पुरोगामी चळवळीतील युवा कार्यकर्त्या असलेल्या स्नेहा मगर पुणे विद्यापीठातुन 'पत्रकारिता' या विषयातील पदव्योत्तर पदवी नंतर सध्या मुंबई येथील 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स' मध्ये समाजकार्याचे शिक्षण घेत आहेत. 
**********


संदर्भ - https://www.youtube.com/watch?v=A3A5j3-ZuQw&feature=youtu.be

(‘साम टीव्ही’च्या ‘आवाज महाराष्ट्राचा’ या दिनांक १५ ऑगस्ट २०१७ च्या ‘स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेली माणसं आणि आता धुरा तरुणाई कडे’ या कार्यक्रमाच्या ‘युट्युब’वरील ‘एपिसोड’ वरून)




No comments:

Post a Comment