मा. मुख्यमंत्री यांसी विज्ञापना
शाळा महाविद्द्यालयांचे प्रवेश होऊन महिने उलटतात पण हॉस्टल मात्र मिळत नाही. काय करायचं विद्द्यार्थ्यांनी ?
मा. मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य, मुंबई.
विषय : समाज कल्याण विभागाच्या वसतिगृह प्रवेशाची दिरंगाई
टाळण्यासाठी योग्य भूमिका घेणे बाबत.
महोदय,
सप्रेम जय भीम,
विनंती विशेष
प्रयोजन कि, महाराष्ट्र
राज्यातील भटके विमुक्त, अनुसूचित
जाती-जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्यांक
तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्द्यार्थ्यांसाठी समाज कल्याण
विभागामार्फत वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करवून देण्यात आली आहे. विद्द्यार्थ्यांचे
शाळा-महाविद्द्यालाय प्रवेश साधारणतः जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होतात.
मात्र, वसतिगृहाच्या
प्रवेशाबाबतची कार्यवाही जलद गतीने होत नाही. त्यामुळे त्याचा मोठा फटका
विद्द्यार्थ्यांना बसतो. गावाकडून शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्द्यार्थ्यांना
तर या काळात राहण्या-खाण्याच्या भीषण समस्येला सामोरे जावे लागते. परिणामतः असे
समस्याग्रस्त विद्यार्थी शिक्षण अर्ध्यावरच सोडून जाण्याचीही उदाहरणे आहेत.
या वर्षीही समाज
कल्याण विभागाच्या वसतीगृहा प्रवेशाबाबत दिनांक ८ ऑगस्ट २०१६ रोजी वसतिगृह
प्रवेशाची पहिली यादी जाहीर करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर दिनांक २१
ऑगस्ट २०१६ रोजी ही प्रवेश यादी जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले. आता, दिनांक
३१ ऑगस्ट २०१६ ही तारीख देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या या शैक्षणिक
दिरंगाईच्या धोरणांबाबत तात्काळ ठोस भूमिका घेत संबंधित विभागाला कार्यवाहीचे आदेश
देण्यात येणे महत्वाचे आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करालच. ही अपेक्षा.
आमच्या मागण्या खालील प्रमाणे...
१)
शिकणाऱ्या प्रत्येक मुली व मुलांना मोफत
वसतिगृहाची व्यवस्था करण्यात यावी.
२)
विद्द्यार्थ्यांच्या शाळा महाविद्द्यालाय
प्रवेशाच्या दिवशीच वसतिगृहात प्रवेश देण्यात यावा.
३)
विद्द्यार्थ्यांच्या शाळा महाविद्द्यालाय
प्रवेशाच्या काळात मोफत राहण्या-खाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
४)
विद्द्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती त्वरित
देण्यात यावीत.
प्रत सादर.
आमदार कपिल पाटील,
आमदार बच्चू कडू,
आपले विश्वासू
आपले विश्वासू
नामा कसबे
सामाजिक कार्यकर्ते
संदीप आखाडे
राज्य संघटक छात्रभारती
अशोक हतागळे
सामाजिक कार्यकर्ते
कुणाल रामटेके
सामाजिक कार्यकर्ते
महाराष्ट्र शासनाशी संपर्क साधल्याबद्दल आणि आपला मूल्यवान सल्ला दिल्याबद्दल आभार.
आपले सरकार पोर्टलवर "माझे सरकार" विभाग आहे, जेथे आपण राज्य आणि राज्याच्या नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या विविध विषयांबाबत सल्ला देऊ शकता. योग्य विषय मंचाकडे आपण आपला सल्ला सादर करावा, ही विनंती. https://maharashtra.mygov.in/
समृद्ध महाराष्ट्र घडविण्याच्या कामी आपण दाखविलेल्या स्वारस्याबद्दल पुन्हा एकदा आभार.
सदिच्छा,
तक्रार निवारण सहाय्य पथक
---------------------------------------------------------------------------
ताजा कलम -
'आपले सरकार' या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आलेला शासकीय अभिप्राय...
प्रिय नागरिक,
महाराष्ट्र शासनाशी संपर्क साधल्याबद्दल आणि आपला मूल्यवान सल्ला दिल्याबद्दल आभार.
आपले सरकार पोर्टलवर "माझे सरकार" विभाग आहे, जेथे आपण राज्य आणि राज्याच्या नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या विविध विषयांबाबत सल्ला देऊ शकता. योग्य विषय मंचाकडे आपण आपला सल्ला सादर करावा, ही विनंती. https://maharashtra.mygov.in/
समृद्ध महाराष्ट्र घडविण्याच्या कामी आपण दाखविलेल्या स्वारस्याबद्दल पुन्हा एकदा आभार.
सदिच्छा,
तक्रार निवारण सहाय्य पथक
( August 26, 2016 6:07 PM )
No comments:
Post a Comment