महात्मा गांधी शिक्षण व्यवस्था आणि विचार
महात्मा गांधी शिक्षण व्यवस्था आणि विचार
भारतीय स्वतंत्र समरात ज्या अनेक रणधुरिणांनी आपल्या आयुष्याच रणकंदन केललं त्या महापुरुषांमध्ये म. गांधी यांचा नाव अग्रणी ठरत . गांधी यांच्या आंदोलनाने देशाच्या अन्तःकरणात नव तेजोत्पत्ती केली. आपल्या सत्यग्रहत्मक तत्वाद्यानास विधायक कार्याची जोड तर त्यांनी दिलीच शिवाय आरोग्य,शिक्षण, बेरोजगारी, भूखमरी,अभाव आदी राष्ट्रीय प्रश्नांवरही आपले विचार मांडले.शिक्षण हा राष्ट्रे विकासाचा आत्मा त्यांनी मनाला . भावी पिढ्यांच्या सशक्त समृद्ध जीवनासाठी आणि राष्ट्र उभारणीस कारक ठरणाऱ्या जबाबदार नागरिकांची निर्मिती ज्या शिक्षण व्यवस्थेत साध्या ठरेल अश्या व्यवस्थेची आखणी गरजेचे ठरल्याने गांधीनी आपल्या चिंतनाची दिशा जीवन शिक्षण पद्धतीच्या अनुशान्गीकतेने केल्याचे दिसून येते. केवळ कारकून निर्माण करणाऱ्या लॉर्ड मेकोले प्रणीत शिक्षण पद्धतीची मीमांसा भारतीय संदर्भांमध्ये करूनच ते थांबले नाहीत तर संभावनांना सक्षम विचारांचे अधिष्ठान हि त्यांनी दिले. गांधींचा हा प्रयत्न म्हणजे नव्या शिक्षण व्यवस्थेच्या योजनेचा प्रयत्नच होय. "अपूर्णत्व कडून पूर्णत्व कडे जाण्याचा प्रवास मणजे शिक्षण"हि विवेकानंदांची व्याख्या या प्रयोगासाठी त्यांनी प्रमाण मानत "नाई तालीम शिक्षण पद्धती"चे हेच सूत्र म्हणून स्वीकारले. मन, शरीर, आत्मा या सर्वांचे विकास साधन म्हणजे शिक्षण अशी शिक्षणाची व्याख्या करून त्यांनी कवळ परमपरागत शिक्षण आजच्या आधुइक भारताच्या निर्मितीस सहायभूत होणार नाही हे जाणून नाई तालीम ची रचना म्हणजे त्यांच्या शिक्षण विषयक विचारनच्या आत्मीयतेचे उदाहरणच होय . ३१ जुलै १९३७ च्या हरिजन मध्ये गांधीनी आपले शिक्षण विषयक विचार२२-२३ओक्टोंबर१९३७ च्या वर्धा शिक्षण परिषदेच्या धर्तीवर व्यक्त केले.डॉक्टर झाकीर हुसेन हे त्या समितीचे अध्यक्ष होते तर विनोबा भावे सारखे विचारवंत नई तालीम च्या अनुसंधानात निमग्न होते . मातृभाषा शिक्षणा साठी आवश्यक असे मध्यम असा विश्वास या महापुरुषांना होता. महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत साकारन्या साठी हस्त कौशल्याधारित कृषी प्रधान भारताच्या अर्थव्यावास्तेला गती देण्याच्या उद्देशाने निर्माण करण्यात आलेल्या या पद्धतीला "वर्धा शिक्षण पद्धती" असेही संबोधन केले जाऊन एक मुक्त शिक्षण पद्धती म्हणून यांस बघितल्या गेले.भारतीय ,धर्म संस्कृतीस अनुसरुन असनाऱ्या या यावस्थेचे जसे काही गुण आहेत तसेच काही दोषही आहेत. अर्थात प्रत्येकच व्यवस्था हि एका विशिष्ट कालात निर्माण होत असते आणि कालानुरूप परिवर्तनही त्यात गरजेचे ठरते. मात्र गांधी यांच्या द्वारा निर्मित या शिक्षण व्यवस्थेचे समकालीन प्रयोजन नष्ट झाले आहे का याचाही विचार शिक्षण विचारवंतानी करावा लागेल .संगणकाच्या या काळात प्रत्येक काम क्लिक वर आधारित आहे मात्र मानवी नितीमुल्यही याच मातीमध्ये मान टाकून मरत असतानाच या पद्धती मध्ये याची काही उत्तरे आहेत का? याचाही शोध घेणे महत्वाचे ठरेल .असो,पण या शिक्षण पद्धतीचा उपयोजन यत्न स्वातंत्र्योत्तर काळातही होतच राहिला .नितीमुल्याधीष्टीत शिक्षण व्यवस्थेचा प्रयास करणाऱ्या कोठारी कमिशनने ही या पद्धतीची सुत्रे प्रमाण मानली.मग आज जागतिकीकरणाच्या या युगात गांधींची नाई तालीम आज किती प्रासंगिक? आणि कशी? हा जरी एक संशोधनाचा विषय असला तरीही या विषयी चे कुतूहल मात्र लोक माणसात अजूनही जागृत आहे . हल्लीच काही तरुणांनी इयत्ता सातवी पर्यंत हा उपक्रम वर्ध्यात राबून बघितला.मात्र सरकारी धोरणे आणि पालकांची भूमिका यांमुळे मात्र त्यांना हा नाद सोडवा लागला. २१ व्या शतकाच्या या संगणक युगात गांधींचा हा आदर्शवाद वस्तवाच्या धरतीवर कसा योग्य आहे याची मांडणी आजच्या काळाच्या गांधीवादी विचारवन्तांकडून होणे गरजेचे आहे. एके काळी मुस्लिम आणि लीग च्या लोकांकडून होणाऱ्या विरोधातही या पद्धतीच्या उपयोजनाचा झालेला यत्न आणि तुनुसा गुरी माकाकुची सारख्या जपानी विचारवंतानी त्यांच्या देश्यात नई तालीम रुजऊ पाहत आहेत मात्र स्वातंत्र्य पूर्व राष्ट्रीय शिक्षण पद्धती भारतात मात्र रुजू शकली नाही आणि पर्यायाने इतिहासाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या गुणांसाठीच हा विषय घोटावा लागू नये याची काळजी घेणे तितकेच गरजेचे ठरले.
शेवटी एवढेच प्रत्येक व्यक्ती आणि व्यवस्था हि आपल्या काळाचे अपत्य असून गांधीही त्यास अपवाद नाहीत . महापुरुषांच्या कार्याचे मूल्यमापन मात्र येणारा भावी काळच करेल.
No comments:
Post a Comment