भारत भाग्य विधाता
भारत भाग्य विधाता समस्त भारतीय जनमानस आधुनिक कालखंडात महासत्तेच्या संकल्पनेने अत्यंत प्रभावित झाले असतांनाच या नव्या भारताच्या निर्मितीत तरुणाईची भूमिका महत्वाची ठरत आहे. जग जेथे आपल्या तरुणाईचा चेहरा गमावून बसले आहे,तेथेच भारत मात्र अधिकाधिक तरुण राष्ट्र म्हणून उदयास येत आहे.हे भारतीय तारुण्य पुढील शंभर वर्ष जगावर आपले वर्चस्व निर्माण करील. भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात जेथे आपल्या समस्यांचे निर्मुलन करण्या साठी आपण बाह्य जगावर अवलंबून होतो तेथेच आज निर्मिलेले उच्य तंत्रज्ञान आणि आदर्श भारतीय लोकशाही या माध्यमातून भारताने जागतिक पेठ काबीज करण्या साठी प्रयत्न चालवले आहेत . मात्र एकीकडे असलेली अत्युच्य श्रीमंती तर दुसरीकडे पराकोटिची गरिबी भारतीय महासत्तेचे भीषण वास्तव प्रस्तुत करते आहे .
भारताने केलेला लोकशाही मार्गाच स्वीकार जगाच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे . मात्र जेव्हा भारत म्हणजे "गुलामांचे राष्ट्र" ही टीका करणाऱ्या मंडळीना या महान प्रवासाने चांगलेच प्रती उत्तर मिळाले आहे. तरुणांच्या अभूतपूर्व त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य याच तरुणांच्या महान इच्याशाक्तीच्या बळावर टिकले आणि भारतीय संविधानाने दिलेला मार्ग उपयोजित करून केलेली वाटचाल प्रेरक ठरली .सतत्यने होणारी जागतिक स्तिती बदलाची करणे भारतीयांनी आज जाणली आहेत. अर्थव्यवस्थ,शेती,आरोग्य,शिक्षण,उर्जा,दळन वळण ,तंत्राज्ञान आदी क्षेत्रांमध्ये झालेली प्रगती त्याच सुप्त उर्जेचे फलित आहे जी इथल्या तरुणांच्या हृदयांमध्ये जिवंत रूपाने ज्वलंत होती.गरज आहे ती विकास आणि उर्जेचे सार्वत्रीकरण करण्याची . ज्या वेळी इथला श्रीमंत वर्ग चंगळवादाच्या आहारी जाऊन साधनांची उधळण करतो त्याच वेळी इथला गरीब वर्ग मात्र उपाशी राहूत रात्र घालवतो. शिक्षणाचा अधिकार तर मिळाला पण सामान शिक्षनाच ध्येय्य मात्र दूरच राहिले . समतेचे गीत गात विषमतेची बीजे मात्र तशीच राहून त्यातून वाढली जंगले जातीवादीआणि अंध धर्मवादाची.त्यातून होणारऱ्या दंगलींनी तरुणाईला जाळ्यात घेतलं ते विकास मार्गावरून दूर नेणाऱ्या राष्ट्राहीतावरोधी विचारांच्या गर्तेत सातत्यान वाहवत जाण्या साठी .तरुणाईची होणारी दिशाभूल,निवडनुकीच्या बाजारात होणारा पराकोटीचा युवाशक्तीचा वापर आणि तथाकथित विचारधारेची दिली जाणारी अफू यातून तरुणाचा कल गेला तो दंगलवादी मानसिकतेच्या बाजूने त्यातूनही सावरत इथला तरुण लढतो आहे लढाई स्वतःच्या अस्तित्वाची.स्वतःला सावरत धडपडत करतो आहे प्रयत्न देशाला सावरण्याचा आणि उभारण्याचा.घेऊ पाहतो नेतृत्व हाती आधुनिक भारताचे.राजकीय लोकशिक्षण करीत समता,स्वातंत्र्य,न्याय,बंधुतेची चौकट जोडत समस्त मानव जातीस आपण सारे एक म्हणत सर्वांना समान संधी विकासाच्या प्रक्रियेत समील होण्याची.आता सुशिक्षित शासकच चालवू शकेल गाढा नव्या भारताचा. आहे आदर्शवाद इथल्या तरुणाच्या नसानसात वास्तवाच्या भानासह.समस्या असतीलही पण परिस्थितीशी झगडायला आहे तय्यार भारतीय तरुण . " जन गण मन अधीनायक जय हे, भारत भाग्य विधाता …," म्हणत गायलेले राष्ट्र गीत आज इथल्या मना मनातून पेटले आहे आणि भारताच्या भाग्य विधता असलेला तरुण गातो आहे गाणे, भावी सामाजिक क्रांती आणि नाव सृजनाचे!
No comments:
Post a Comment