"आज पर्यंत माहेरच्या माध्यमातून महाराष्ट्रात काम करीत आहोत पण आता मात्र मागे वळून बघताना खूप काही कारायचे बाकी आहे असे वाटते. आजही आपले मुलभुत प्रश्न सुटू शकले नाहीत. समाजातील फार मोठा वर्ग अन्न, निवारा, शिक्षण, आरोग्य या पासून वंचित आहे. समाजातील हेच वास्तव बघून मला 'माहेर' ची प्रेरणा मिळाली होती. पण माझ्या साठी हे काम नाही तर प्रेमाचा विषय आहे."
...आणि काही प्रसंग
एक मनोगत
-हिरा बेगमुल्ला
अध्यक्ष (माहेर संस्था, पुणे.)
copyright_kunalramteke_march_2016
-सिस्टर ल्युसी कुरियन
संस्थापिका,माहेर आश्रम सामाजिक संस्था, पुणे.
---------------------------------------------------------------------------------------------
ज्यांना नाही कुणी...
वंचित निराधारांना 'माहेर आश्रम' चा आधार
माणूस चंद्रावर, मंगळावर पोहचला पण शेजारच्या दाराआडच्या दुखा:पर्यंत मात्र पोहचू शकला नाही. अश्यावेळी रस्त्यावर भटकणाऱ्या अनाथ, अपंग आणि निराधारांचा तर विचारच आपाल्या पैकी किती जणांच्या मनात येईल हा संशोधनाचा विषय ठरावा. समाजातील याच निराधार वंचितांना आधार देण्याचा वसा घेतला आहे ते पुण्याच्या 'माहेर आश्रम' या सामाजिक संस्थेने.
आपण नेहमी ऐकत आलेली न्यूटनची गोष्ट खूप प्रासंगिक आहे. एक सफरचंद न्यूटनच्या डोक्यावर पडलं. आणि त्यातून शोध लागला तो जग बदलणाऱ्या गुरुत्वाकर्षणाचा. आपल्यापैकी सर्वांच्याच जीवनात घडणाऱ्या सर्वसामान्य घटनांपैकी एक अशी ही घटना. आपल्या डोक्यावर सफरचंद नाही तर आणखी काही पडेल इतकाच काय तो फरक. मात्र जीवनाच्या छोट्या प्रसंगातूनही जीवनाची दृष्टी यावी यासाठी असावी लागते ती 'देखणे वाली नजर'. मग त्यातूनच निर्माण होत असतात आपले रोल मॉडल्स आणि आदर्श. अश्याच एका आदर्शाची ही गोष्ट.
आपण नेहमी ऐकत आलेली न्यूटनची गोष्ट खूप प्रासंगिक आहे. एक सफरचंद न्यूटनच्या डोक्यावर पडलं. आणि त्यातून शोध लागला तो जग बदलणाऱ्या गुरुत्वाकर्षणाचा. आपल्यापैकी सर्वांच्याच जीवनात घडणाऱ्या सर्वसामान्य घटनांपैकी एक अशी ही घटना. आपल्या डोक्यावर सफरचंद नाही तर आणखी काही पडेल इतकाच काय तो फरक. मात्र जीवनाच्या छोट्या प्रसंगातूनही जीवनाची दृष्टी यावी यासाठी असावी लागते ती 'देखणे वाली नजर'. मग त्यातूनच निर्माण होत असतात आपले रोल मॉडल्स आणि आदर्श. अश्याच एका आदर्शाची ही गोष्ट.
आज ‘माहेर’ हे वंचितांचे हक्काचे घर बनले आहे. संस्थेच्या माध्यमातून ६ घरांमधून ३०० निराधार महिला, ३० घरांमधून ८८२ बालके तर २ घरांत ५२ निराधार पुरुषांना आश्रय मिळाला आहे. माहेर चा उद्देशाच मुळी रस्त्यावरच्या निराधार माणसाला आश्रय देण्याचा असल्याने त्या कार्याची फलश्रुती म्हणजे आजपर्यंत ४००० महिला, १४० पुरुष व ३८०० बालकांनी माहेरचा आधार घेतला आहे. माहेरच्या २३ विविध प्रकल्पांच्या माध्यमातून समाजाच्या शास्वत विकासासाठी प्रयत्न केल्या जात आहेत. त्यात ५५२ बचत गट, १३ अभ्यासिका वर्ग, ११ बालवाड्या व गंमत शाळा कार्यरत आहेत.
...आणि काही प्रसंग
काही दिवसांपूर्वीची ही एक गोष्ट. एक मनोरुग्ण महिला रस्त्यावर विवस्त्र अवस्थेत माहेरच्या कार्यकर्त्यांना सापडली. त्यांनी तिला माहेर मध्ये आणले. तिची तपासणी केल्यावर ती गर्भवती असल्याचे आढळूण आले. आश्या अवस्थेत ‘माहेर’ ने तिला आधार दिला. काही दिवसानंतर तिची प्रसुतीही माहेर मध्ये पार पडली. तिने एका गोंडस बाला जन्म दिला. कार्यकर्त्यांनी त्या बाळाचं मोठं सार्थ नाव ठेवलं. कबीर. या आणि अश्या किती तरी कथा ‘माहेर’ बरोबर जोडल्या गेल्या आहेत. अश्याच मुलांमधली मुले आता उच्च शिक्षण घेत असून काही मोठ्या पदांवरती काम करत समाजात स्वतःचे आणि माहेरचे नाव करीत आहेत.
अमरनाथ चौधरी या अनाथ मुलाला त्याच्या आजोबांनी वय झाल्याने मुलाची जबाबदारी पेलता येत नाही म्हणून माहेर आश्रमात आणून सोडले. मायेची उब गमावलेल्या अमरनाथला माहेरने सावली दिली. याच मुलाने पुढे १० वीच्या परीक्षेत ८६ टक्के गुण मिळवले. हाच मुलगा आज जर्मनीत उच्च शिक्षण घेत आहे.
अमरनाथ चौधरी या अनाथ मुलाला त्याच्या आजोबांनी वय झाल्याने मुलाची जबाबदारी पेलता येत नाही म्हणून माहेर आश्रमात आणून सोडले. मायेची उब गमावलेल्या अमरनाथला माहेरने सावली दिली. याच मुलाने पुढे १० वीच्या परीक्षेत ८६ टक्के गुण मिळवले. हाच मुलगा आज जर्मनीत उच्च शिक्षण घेत आहे.
आरती सयाम ही तळेगाव ढमढेरेची मुलगी. त्या तीन बहिणी. वडिलांनी घर सोडले. आई मानसिक आजारी. अश्या अवस्थेत माहेरने तिला आधार दिला. माहेरच्या प्रयत्नाचे चीज करीत आरतीनेही १० वीच्या परीक्षेत ७९ टक्के गुण मिळवीत यश मिळवले. आज हीच मुलगी नेदरलँड मध्ये उच्च शिक्षण घेत आहे. एकेकाळी ‘विशेष मुल’ म्हणून गणल्या गेलेल्या दर्शन पाटील या मुलाने एका वर्षात 3 परीक्षा पास करीत लंडन येथील कार्यक्रमात सहभाग नोंदवला. रवीना काटे या मुलीला तीन बहिणी मात्र आई वडिलांची सावली नव्हती. अश्या काळत त्यांना सावरत उभे करण्याचे काम माहेर ने केले. आज हीच मुलगी अमेरिकेत शिक्षण घेत आहे. माहेरच्या विद्द्यार्थ्यांनी जागतिक स्तरावरही बाजी मारली असून तृप्ती शिंदे आणि पूजा बढे या मुली मेक्सिको येथे झालेल्या ग्लोबल लीडरशिप फोरम मधेही सहभागी झाली होती.
एक मनोगत
“मानवता हाच खरा धर्म या तत्वाने समाजातील सर्व जाती व धर्मांच्या नागरीकांसाठी आमची संस्था काम करते. ज्यांना कोणीही नाही त्यांना समाजाच्या मुख्यधारेत आणण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. आजवर याच भावनेने आम्ही काम करीत राहिलो आहोत. त्याचा लाभ हजारो नागरिकांना झाला आहे.”
अध्यक्ष (माहेर संस्था, पुणे.)
-----------------------------------------------------
दि. ३ मार्च २०१६ च्या 'दैनिक नवराष्ट्र' पुणे मधे
प्रकाशित झालेली ही माझी
'अँकर न्यूज स्टोरी...'
==============================
माहेर संस्थेचे उपक्रम
-वात्सल्य धाम-
मानसिक अपंगत्व असणाऱ्या महिलांसाठी हक्काचे घर.
-आधार-
खेड्यातील महिला व तरुणांना रोजगार संधीची उपलब्धता योजना.
-ज्ञानगंगा-
वंचित खेड्यांसाठी वाचनालय प्रकल्प.
-स्वावलंबन-
बचत गटांची चळवळ
-कलासागर-
शाळा सोडलेल्या मुला-मुलींसाठी मुक्त शाळेचा अभिनव उपक्रम.
-प्रगती-
खेड्यांसाठी जाणीव जागृती कार्यक्रम.
-परिश्रम-
व्यावसाईक प्रशिक्षण व उत्पादन केंद्र.
-गंमत शाळा-
वीट कामगारांच्या मुलांसाठी दिवस शाळा प्रकल्प.
-किशोरधाम-
अनाथ व विघटीत कुटुंबातील मुलांसाठी हकाचे घर.
-ममाताधाम-
परित्यक्ता महिलांसाठी घर.
copyright_kunalramteke_march_2016
No comments:
Post a Comment