Sunday, 9 November 2014

मायन घेतलेल्या उधयाची कविता...


माय… 

त्या घेतलेल्या उधयाची कविता 

जल्मान कवाच लिवून टाकली! 

पेरन अन सवंगन 

लागलाच हाय तुया मांग, 

पण पिक हाती येत नाही 

साता जलमा पासून…  


करून जंगल जीवाचा 

गोठून माठून रगत


पायाले चिखल्या पावसायात 

हाताले फोय हिवायात 

उन्हायात आंगाले घाम 

फाटक्या झाम्परावर तुया 

चितारून रायला नकाशा 

माया भारत देशाचा 


'ऋतू हिरवा,ऋतू बरवा'

कवाच तुले दिसत नाई 

रोजनच मानल जात जाय 

थेही एका पारगिन 

पण हाये आठव नवल 

तुई दोनी परागीन जाची कमाल 


माय,

त्या घेतलेलं उधय,

कवा हुइन पूर 

भाकरीच्या चंद्राले इथ गरीबीच गिरान हाय 

थांब आजच्या दिस… 

सुर्यच आनतो सकाय…     

उधयान तुयासाठी… 

No comments:

Post a Comment