सुशिक्षित उमेदवाराची महाराष्ट्राला गरज
सुशिक्षित उमेदवाराची महाराष्ट्राला गरज
असं म्हणतात की,"सत्ते पुढे शहाणपण चालत नाही",पण जर शहाण्या लोकांच्या
हातामध्ये सत्ता गेली तर भविष्य काही वेगळच असेल. नुकत्याच झालेल्या २०१४
च्या लोकसभा निवडणुकी नंतर आत्ता शंखनाद झाला आहे तो महाराष्ट्र विधान सभा
निवडनुकीचा. लोकशाही व्यवस्थे मध्ये निवडणुका या महोत्सवा सारख्या असत. या
उत्सवाला मात्र गाल बोट लागू नये म्हणून आपल्या उमेदवाराने आणि आपण
सगळ्यानीच प्रयत्न करायला हव. लाच देऊन मिळवलेली गठ्ठा मते आणि त्या
मतांच्या बळावर निवडून आल्या नंतर स्वार्थासाठी त्याच रयतेला वेठीस धरत
भ्रष्टाचार करून रग्गड पैसा मिळवायाचा हीच मानसिकता असणार्यांची काही कमी
नसत्तानाच हे दृष्ट चक्र थांबवण्याची मात्र गरज आजच्या पिढीला भासते आहे.
आमचा विधायक कसा असावा यावर आपण केलेला विचार अमलात आणण्याची हीच खरी वेळ
आहे. निवडणुकीतील भ्रष्टाचार थांबून स्वच्च वातावरणात व्यक्तिगत
हेव्यादाव्यांच्या पलीकडे जाऊन उमेदवाराने निवडणुकीस सिद्ध होत विकासाचे
राजकारण करावे हीच आम आदमीची अभिलाषा आहे.स्वातंत्र्याच्या प्रदीर्घ कला
नंतरही सातत्याने जाणवणारा लोक शिक्षणाचा अभाव आज गंभीर समस्या बनला
असतांनाच सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन प्रामाणिक,सच्च्या कार्यकर्ता,
ध्येय्य्वादी व कर्तव्यनिष्ठ अश्या सुशिक्षित उमेदवाराची गरज महाराष्ट्रास
आहे.आपल्या समस्या आपलीं कमजोरी नाहीत तर प्रेरणा व्हाव्यात या साठी नेता
हवा आहे सकारात्मक दृष्टिकोनाचा.शिक्षणाचे बाजारीकरण आणि बेरोजगारी ची भीषण
समस्या आज असतांनाच नव्या धोरणांच्या आखानिचीही आज गरज भासते आहे. विकास
पासून दूर असलेल्या रियल आम आदमीस विकासाच्या मुख्य धारेत जोडत आपण सारे एक
या भावनेतून काम कारणरा उमेदवार असावा हीच मनो कामना व्यक्त करूयात.
दैनिक पुण्यनगरी (दि. २६ सप्टे.२०१४-आपलं व्यासपीठ या सदरात प्रसिद्ध)
No comments:
Post a Comment