‘कोविड १९’ च्या काळात या सेवाकार्यासाठी आम्ही आमचा जीव का धोक्यात घालत आहोत ?
‘ह्युमन डेव्हेलपमेंट सोसायटी ऑफ इंडिया’ द्वारा जनतेस आवाहन
भारतच नाही तर जगभरातल्या महासत्ता म्हणवल्या जाणारे देश सुद्धा आज ‘कोविड १९’ च्या जागतिक महामारी समोर हतबल झालेले दिसत असतांनाच ‘ह्युमन डेव्हेलपमेंट सोसायटी ऑफ इंडिया (एचडीएसआई)’ या आमच्या स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते-स्वयंसेवक सामाजिक मदत आणि सेवाकार्यास स्वतःचा जीव धोक्यात घालून पुढे येत आहेत. आजच्या या महामारीच्या काळात समाजाच्या सर्व स्तरातील शोषित-वंचित-गरीब-पीडित नागरिक दुर्दैवाने परिस्थिती समोर हवालदिल झालेले असतांनाच ‘एचडीएसआई’ चे कार्यकर्ते अत्यंत कठीण परिस्थितीत या नागरिकांना राशन पुरवठ्या सोबतच आर्थिक आणि सर्व प्रकारच्या संभव मदतीसाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. आज ‘एचडीएसआई’चा सर्वसामान्य जनतेच्या हिताचा हा विचार अनेकांना प्रेरणादाई ठरणारा आहे.
समाजातील आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास वर्गाच्या उन्नतीसाठी मा. प्रमोद थोरात यांच्या नेतृत्वात ‘ह्युमन डेव्हेलपमेंट सोसायटी ऑफ इंडिया - (SRA No. MH/81/2002 (CHD); PTR Registration No. F-7666) ची स्थापना सन २००२ मध्ये करण्यात आली. ‘एचडीएसआई’ला सरकारद्वारा मान्यता प्राप्त असून समाजातील अंतिम माणसाच्या हितासाठी स्थानिक तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर नागरिक, समाज, स्वयंसेवी संस्था आणि सरकार या सर्व स्तरांवर संस्था कार्यरत आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या अंतिम माणसाच्या हितासाठी ‘सर्वसामावेशी तथा सर्वांगीण विकास कार्यक्रम’ राबवणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. याच धेय्याने प्रेरित होऊन आजवर ‘एचडीएसआई’ने शिक्षण, आरोग्य, कृषी, आजीविका, पाणी, पर्यावरण, मानवाधिकार, महिला व मुलांचे उत्थान आणि सामाजिक नेतृत्व विकास या व अशा अनेक क्षेत्रात अत्यंत प्रभावी व मूलभूत काम केले.
आज ‘एचडीएसआई’च्या माध्यमातून २००० पेक्षा जास्त शिक्षणापासून वंचित असलेले विद्यार्थी शिक्षणाच्या मूळ प्रवाहात येत आहेत. अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ४५ पेक्षा जास्त गावांमध्ये ३६९६७ पेक्षा जास्त नागरिक समुदाय विकास कार्यक्रमाचा भाग झाले आहेत. पर्यावरण विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून आजवर ५ प्रशिक्षण कार्यक्रमांमधून २००, ‘ग्रीन स्कॉट समर कँप’ मधून ६०० पेक्षा जास्त पर्यावरण साक्षर विद्यार्थी, युवक तथा नागरिकांचे नेतृत्व निर्माण झाले आहे. संस्थेच्या आजीविका विकास कार्यक्रमा अंतर्गत महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी २३० बचत गटांना ‘गोट फार्मिंग’साठी पशु विरतरण तथा ५० पेक्षा जास्त ‘पोल्ट्री फार्मिंग’ उद्द्योगासाठी साहाय्य तसेच या चळवळीस प्रोत्साहन देण्यासाठी सुमारे १२०० पेक्षा जास्त महिला व त्यांच्या १२४ बचत गटांना प्रशिक्षित करण्यात आले. विदर्भातील दुष्काळ जन्य परिस्थिती बघता १३ गावांमधील २६००० पेक्षा जास्त नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हँडपंप सुविधा उपलब्ध करवून देण्यात आली. या व अशा अनेक शाश्वत विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून ‘एचडीएसआई’ कार्यरत असून आजच्या या अत्यंत आणीबाणीच्या काळातही सामान्य माणसाविषयीच्या बांधिलकीचा वारसा जपत आहे.
‘कोविड १९’ च्या महामारी च्या आजच्या या काळात ‘एचडीएसआई’चे कार्यकर्ते अहोरात्र काम करत आहेत. त्यामागची प्रेरणा निश्चितच ‘पे बॅक टू सोसायटी’ ही आहे. ज्या समाजाचा पण भाग आहोत त्याच्या हितासाठी झटणे हे ‘माणूस’ म्हणून आपले कर्तव्य मानून संस्थेचे संस्थापक, कार्यकर्ते आणि स्वयंसेवक कार्यरत आहेत. मात्र, आपण घेतलेला सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा खंडित होऊ नये म्हणून समाजातील सर्व स्तरातील नागरिकांस ‘एचडीएसआई’ आवाहन करू इच्छिते की जागतिक आणीबाणीच्या या काळात दुःखी कष्टी जनतेस यथाशक्ती सहकार्य करावे. यासाठी निश्चितच संस्था आपली ऋणी राहील.
मा. संचालकांच्या वतीने कुणाल रामटेके,
'हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ ऍडव्होकसी अँड रिसर्च',
‘ह्युमन डेव्हलपमेंट सोसायटी ऑफ इंडिया (HDSI)’,
गायस हाऊस, प्लॉट नंबर ८ - ९, मु. पो. धोतरखेडा, ता, अचलपूर, जिल्हा अमरावती, पिन कोड - ४४४८०६.
संपर्क क्रमांक - ९४२२१५२१३८, ८८०६०२४९३८.
ईमेल - hdsi08@gmail.com ; वेबसाईट - www.hdsiindia.org.
No comments:
Post a Comment