महिला राजसत्ता गीत
महिला राजसत्ता आंदोलनात आंतर्वासिता करीत असतांना लिहिलेलं हे गीत खास आपणासाठी...
येणार येणार येणार येणार
तुमच्या राजसत्तेत आमचा वाटा येणारं
।।धृ।।
आजवर होती बघा तुमची झुंडशाही
तुमच्या राजसत्तेत आमचा वाटा नाही
या संविधानाचा पुरावा आम्ही देणारं
।।१।।
जोतिबाच्या संगतील सावित्री आई
आमच्या त्या लेखणीला समतेची शाही
आमचा वाटा आम्ही आता हक्कानं घेणारं
।।२।।
नाही भाऊ आता आम्ही देवी आणि दासी
हाताला देऊ हात जोडू न्यायाच्या राशी
नव्या भारताचं गीत आम्हीच लीवणारं
।।३।।
No comments:
Post a Comment