Saturday, 6 January 2018

'जय भीम' : आमच्या स्वाभिमानाची घोषणा आहे...!
बाबू हरदास यांच्या जयंती निमित्त एक टिप्पणी 



 

     भारतीय उपेक्षित, वंचित, शोषित, दलित आणि एकंदरीतच पुरोगामी चळवळीचे प्रेरणापूंज तथा सार्वत्रिक सर्वांगीण सकारात्मक क्रांती आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेली 'जय भीम' ही घोषणा आमच्या अखंड स्फुर्तीचा झरा आहे. शोषणाधिष्टीत व्यवस्थेच्या विरोधात उभे ठाकत प्रतिरोधात्मकतेतून समतावादी सिद्धांतांच्या उपयोजनाचा आग्रह या घोषणेतून व्यक्त होतो. 

       आमच्या अस्मितेचा मानबिंदू असलेल्या 'जय भीम' या घोषणेचे जनकत्व जाते ते हरदास लक्ष्मणराव नगराळे उपाख्य बाबू एल. एन. हरदास (१९०४-१९३९) यांना. स्वातंत्र्यपूर्व भारतातील एक दलित पुढारी, कामगार नेते व समाजसुधारक असलेले बाबूजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या 'स्वतंत्र मजूर पक्षा'चे 'मध्य प्रांता'चे सामान्य सचिव होते. त्यांनीच सर्वप्रथम 'जय भीम' या शब्दाचा अभिवादानासाठी उपयोग करण्यास प्रारंभ केला. आज दिनांक ६ जानेवारी २०१७ रोजी बाबू हरदास यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...

No comments:

Post a Comment