गप 'घुमान' घरी
नुकत्याच घुमान येथिल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले अन 'साहित्य वगैरे' च्या गप्पा करून दमलेल्या 'रिकामटेकळ्यांनी' गुमान आपली भली थोरली स्मृतीचिन्हे, पुस्तके, इतरांबरो
अलीकडे साहित्य संमेलने म्हणजे तथाकथित साहित्य आणि साहित्यिकांची 'पिकनिक' स्थळे झाली असल्याची टीका अनेक मान्यवरांबरोबर तळागाळातील रसिक वर्ग करतांना दिसून येतो. मुळातच 'जीवनासहित चालते ते साहित्य' ही साहित्याची जनमानसात खोलवर रुजलेली भावना. मात्र जनकेंद्रिततेकेडून केवळ आधुनिक 'इव्हेंट' मध्ये रुपांतरीत होणारी अलीकडील संमेलने म्हणजे केवळ काहींची मक्तेदारी होऊन त्यांचाच महोत्त्सव बनू पाहत आहेत. साहित्य संमेलने समाज,साहित्य आणि संस्कृतीच्या चिंतनाची आणि उपयोजनात्मक कार्यक्रमाचीही केंद्रे व्हावीत हा आशावाद इथल्या सर्वसामान्य रयतेचा असतांना साहित्य आणि समाजापासून तुटणारी तथाकथित अभिजात साहित्तीकांची प्रस्थापित संमेलने म्हणजे 'खायला फार आणि भुईला भार' तर नाहीत ना याचाही जाणीव पूर्वक विचार लोक करत आहेत. काल परवा तर भालचन्द्र नेमाडे यांनी 'साहित्या पेक्ष्या यांना जलेब्या महत्वचा वाटतात' असे म्हणून वास्तविकतेचे परखड चीकीत्सन केले. अलीकडे समाज साहित्यापासून तुटणारी साहित्य संमेलने 'आमच्या साहित्य जाणिवांना सामावून घेत नाहीत' हाच भाव तळागाळातील सामाजिक साहित्य वर्तुळात असतांना 'साहित्य म्हणजे केवळ आपले तेच' ही भावनाही प्रस्थापितांमध्ये प्रबळ होत नाही ना? या विषयावर चिंतन होणे महत्वाचे वाटते. साहित्य म्हणजे समाज मनाचा आरसा असतात.समाजमनाला नीटसे वळण लावत साहीत्त्यिक आपल्या प्रतिभेची लेखणी करून मार्ग हीन झालेल्या समाजास वेळोवेळी दिशा दाखवत असतात. अगदी तुकोबांनी म्हटल्या प्रमाणेच ''भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी…'' ही साहित्त्यीकांची रास्त भूमिका असावी.मात्र ''विवेकाचा जागर'' म्हटली जाणारी हीच साहित्य संमेलने अविवेक्यांच्या गळ्यात पडल्याने आता 'घंटा कोण बांधणार?' हा प्रश्न उपस्थित्र व्हावा.असो.
मुळ पदावर येतांना, घुमान साहित्य संमेलन नुकतेच पार पडले आहे. प्रदेश्याच्या सीमा ओलांडत अंतरभारती स्वप्न साकारण्याच्या प्रयत्नचा एक भाग म्हाणावा असां हा प्रयत्न होत असल्याचा देखावा खूप छान साकार करण्यात मा.संयोजक यशस्वी ठरल्याचा कौल आपल्या 'जागृत मिडिया' ने दिला आहे.शेवटी गुमान साहित्यिक-रसिकांना 'धक्का गाडीने' पाठवून आयत्या वेळी आमच्या जाताबंधव पत्रकारांसाठी मात्र साक्ष्यात विमान प्रवास 'म्यानेज' करणार्या संयोजकांचे परिश्रम शेवटी सार्थकी लागले म्हणायचे.तेही असो. बरे, साहित्य संमेलनांनी काय कमावले असा प्रश्न ज्या वेळी आपणच आपल्याला विचारतो तेव्हा मात्र हाती आलेले भोपळे वाजवत तथाकथित विवेकाचे गोडवे गात स्वधान्यता मानतच 'मी मराठी' असे म्हणत स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेण्यात कृतज्ञता मानत 'भाषेसाठी केव्हढे हे श्रम' असे म्हणून तमाम महामानावांचे उपकार मानूयात.चला हेही एक कीर्तन संपल.म्हणा पुंडलिक वरदे हरी विठ्ठल…